मला तो दिवस नक्की आठवत नाही ज्यादिवशी मला ही कविता सुचली. कदाचीत त्याल ८-९ वर्ष झाली असतील. माझ्या एका मित्राच्या आग्रहावरुन मी आज ही कविता मराठीत टाइप ( मराठीत काय म्हणतात बरं टाइप करण्याला?) करुन इथे उपलब्ध करुन देत आहे.
हातात पेन...ओठांवर रेंगाळणारे शब्द
लिहू तरी काय...तू नसताना...
थकलेलं शरीर...घाबरलेलं मन...
समजाउ कसं त्याला...तू नसताना...
अनोळखे प्रवासी...न संपणारी वाट...
एकटाच कसा चालू...तू नसताना...
घोंघावणारं वादळ...समुद्राची ओहोटी...
पोचू कसा किनारयाला...तू नसताना...
जमलेला परिवार...गजबजलेला गाव...
तरीही एकाकीपण...तू नसताना...
पौर्णिमेची रात्र...आकाशतला चंद्र...
फक्त हेच सोबतीला...तू नसताना...
तुझं ते हसणं...एकटक बघणं...
सारयाच आठवणी त्रासदायक...तू नसताना...
मनातील घालमेल...डोळ्यांत पाणी...
एकटाच सहन करणार...तू नसताना...
समोरच उभी तू...तू नक्की तूच...
वारंवार असेच भास...तू नसताना...
गुंतलेले धागे...न सुटणारी गाठ...
बंध तरीही बळकट...तू नसताना...
पाण्यावरचे तरंग...क्षणभरचं अस्तित्व...
माझसुद्धा असंच काही...तू नसताना !
-अजय
9 comments:
Chan aahe
@maitreyee : Dhanyawad , Keep visiting !
छान आहे कविता. 'टाईप करणे' - 'टंकलेखित करणे' म्हणू शकतो. :)
@अपर्णा : अभिप्रायाबद्द्ल धन्यवाद , मला मराठीत टाइप करण्याला शब्द्च सापडत नव्ह्ता. :-)
Awesome dude jaaam avadli bua!!!!!!!!!1
chhan aahe kavita...
@स्वाती: धन्यवाद,आजकाल अशा कविता आतुनच येत नाहीत. चारोळ्या अधुनमधुन लिहीत असतो पण.
अशीच भेट देत रहा !
-अजय
Chaan ahe kavita.. Awadali!
पौर्णिमेची रात्र...आकाशतला चंद्र...
फक्त हेच सोबतीला...तू नसताना...
khupach chan aahe mitra...ekdam mazya manatal utravalas ...
Post a Comment