Monday, August 3, 2009

मी आणि माझं पुणे

गेले कित्येक वर्षांपासून मला पुण्याच्या वाहतुकीबद्दल व एकंदरच चमत्कारीक कारभाराबद्दल खूप सारे प्रश्न पडलेले आहेत, ते असे...

१.पीएमटी ही नेहमी प्रवासी घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला न थांबता मागून येणार्‍या गाडयांचा विचार न करता मध्येच का उभी राहते ?
२.पुण्यातले ट्रॅफिक पोलीस हे भकाभक धूर सोडणारया रिक्षा व पीएमटी ला सोडून सिग्नलवर शांतपणे उभे असणारया बिचारया टू व्हीलर वाल्यांनाच का बरं पीयूसी सर्टिफिकेट मागत असतात, मला सांगा धूर जास्त कोण सोडतं ?
३.ज्या दिवशी आपल्याकडे स्वताची गाडी नसते व आपण बससाठी स्टॉप वर उभे असतो तेव्हाच सार्‍या बसेस आपल्यावर सूड उगवल्यासारख्या न थांबता का जातात ?
४.स्वारगेट ते कात्रज ( म्हणजे सातारा रोड ) या रोडवर "बीआरटी" करुन महानगरपालिकेने काय साध्य केले ? एका संपुर्ण लेनमध्ये बस बादशाही थाटाने चालते. एक लेन साइकल, एक लेन फू्टपाथसाठी, एक लेन गाड्या पार्किंग आणि त्यातुन राहिलेल्या जागेतून मग गाडया अंग चोरुन हळु हळु चालत असतात, असं का लेकाहो. अहो स्वारगेट चौकात पालिकेने रोडवर चक्क गोलाकॄती लॉन बनवले आहे, जिकडे गाडया चालवायण्यासाठी वा चालायलाही जागा नाही तिकडे एवढ मोठं लॉन कशासाठी?
५.साइकल वाले हे साइकल ट्रॅक मोकळा सोडून मुख्य रस्त्यावरूनचं का बरं साइकल चालवतात, अरे तुमच्यासाठी खास पालिकेने साइकलट्रॅक तयार केला आहे ना...तिकडे *कलमडा* ना !
६.पुण्यात सगळीकडे, गरज असेन नसेन तिकडे ओव्हरब्रिज उभारले आहेत, पण मला सांगा की स्वारगेट किंवा कात्रज चौकात गरज असतानाही ओव्हरब्रिज न उभारुन तिकडे सोयीस्करपणे दुर्लश केले जात आहे, असं का?
७.रिक्शावाले हे नेहमी अचानक साक्षाक्तार झाल्यासारखे हात न दाखवता, मागच्याचा कसलाही विचार न करता का बरं वळतात ? मला तर रिक्शा या वाहनाच्या डिझाइन इंजिनिअरची किव येते. हे असे एकच वाहन आहे ज्याचा वाहन चालक नककी काय करणार आहे हे पाठीमागच्या गाडीवानाला ( म्हणजे ड्रायव्हर ) कळत नाही, कारण ही पाठीमागे रुंद व पुढे निमुळती होत गेलेली असते.
८.रिक्शावाले हे नेहमी रस्त्यावर रिक्शा उभी करुन लोक (passenger) का भरत असतात ? बस स्टॉप वर उभं राह्ण्याचं सोडुन लो़क रस्त्यावर उभे राहुन ट्रॅफिक जाम करण्यात धन्यता का मानतात?
९.ज्या वाहनांना उजवीकडे वळायच असतं ते डावीकडच्या लेन मधुन का चालत असतात आणि हळु चालणारी वाहने फास्ट लेन वरुन का जात असतात?
१०.झेब्रा क्रॉसींग हा पादचारर्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असतो, तिकडे लो़क सिग्नलला थांबल्यावर पुढे पुढे का करतात? रस्ता ओलांडणारया लोकांच्या अंगावर गाडी घालण्यात किंवा त्यांना घाबरवण्यात मोटारसाइकलवाल्यांना काय बरं आनंद वाटतो?
११.रस्त्याची कामं ही ३६५ दिवस का चालु असतात, एवढं करुनही ती कधीच पुर्ण होत नाहीत वा पुर्ण झाली तरी नीट केली जात नाही. एकच रस्ता पुन्हा पुन्हा खोदुन बनवला जातो. सिमेंन्ट चे बॉक्स काढुन नवीन बसवले जातात. रोड वाढवुन ती जागा पार्किंगसाठी वापरली जाते, मग रोड वाढवायचा तरी कशासाठी?
१२. महानगरपालिकेचा "town planning" नावाचा विभाग कु्ठल्या ******* हाती दिला गेला आहे ज्याला साधं हे ही समजत नाही की शहर उभारताना बागा, खेळाची मैदानं व इतर अशा अनेक गोष्टींसाठी जागा सोडावी लागते. जिकडे पहावं तिकडे नुसत्या बिल्डिंग उभारल्या गेल्या आहेत.

अजुन ही असे बरेच चीड आणणारे प्रश्न आहेत, गरज आहे उघडे डोळे ठेउन आपल्या आजुबाजुला बघण्याची. अहो आपण अजुन किती दिवस असं आंधळ्याचा चष्मा लावुन बसणार आहोत. मुग गिळुन बसणं एक दिवस आपल्या अंगलट येईन पण तेव्हा आपल्या हातातुन कदाचीत सारं निसटलं ही असेन !

-अजय

4 comments:

Pravin said...

अजुन थोडेसे
1. पी एम टी च्या बस बरोब्बर दोन लेन च्या मधोमध चालतात.
2. रस्ता क्रॉस करण्यासाठी कुठलेतरी आजोबा आपल्या हाताचा पंजा दाखवून उजवी आणि डावीकडे न बघता रस्ता क्रॉस करतात.
3. पी एम टी बसच्या खिडकीमधून लोक पान सुपारी तंबाखू खाऊन पचा पचा थुंकतात.
4. मोटरसायकल वाले कसे फूटपाथ वर मोटरसायकल चालवतात आणि पादचारी कसे फूटपाथ सोडून रस्त्यावरून चालतात.

Ajay Sonawane said...

खुपच छान प्रविण , धन्यवाद !

-अजय

Harshal said...

Mumbait pan kahi paramanat hech haal ahet. Lokach mhanje aapanach yala jababdar ahot... aapan sadhi complaint karat nahi... aaplyala aplya vibhagache nagarsevakache nav pan mahit naste...jo paryant aapan chidun jab vicharat nahi tovar konihi aaple bhale karnar nahi.

Amey Jambhekar said...

"रिक्शावाले हे नेहमी अचानक साक्षाक्तार झाल्यासारखे हात न दाखवता, मागच्याचा कसलाही विचार न करता का बरं वळतात ?"

- याला आम्ही "जानेमन टर्न" म्हणतो