असाच काल-परवाचा प्रसंग असेन, मला बॅंकेतुन एका मुलीचा फोन आला. अमुक तमुक क्रेडीट कार्डासाठी तिने फोन केला होता. तोड्क्या-मोड्क्या हिंदीत ती बोलत होती. मी माझ्या मराठी बाण्याला जागत तिला मराठीत बोलण्याची विनंती केली
आणि काय आश्चर्य ! ती चक्क सदाशिव पेठेतील असल्यासारखी मराठी बोलु लागली. मला याच गोष्टीचा राग येतो. तुम्ही तुमच्या घरात, स्वतःच्या राज्यात दुसरया भाषेचा का आधार घेता? तुमची स्वतःची भाषा मराठी एवढी सम्रूद्ढ असताना, ज्या भाषेला संत ज्ञानेश्वर,संत तुकारामांपासुन ते आत्ताच्या संत गाड्गेबाबापर्यंत वाढवलं गेलं, कवि कुसुमाग्रज आणि बहिणाबाई साररख्यांनी जोपासलं, हीच ती मराठी ज्या भाषेला गेली कित्येक शतकांचा वारसा आहे तिचीच तुम्हांला लाज कसली वाटते. मी हिंदी या भाषेचा दुस्वास करत नाही फक्त स्वतःच्या भाषेचा हट्ट धरतोय आणि का धरु नये तु्म्ही सांगा ना. तुम्ही जपान, चीन, फ्रांस, जर्मनी एवढंच काय कनार्टक, आंध्र, तामिळनाडु यांच्याकडे पहा. बघा कसे स्वत्त:च्या भाषेला घट्ट चिकटून बसले आहेत. स्वत्त:च्या भाषेचा त्यांना सार्थ अभिमान आहे आणि नुसता अभिमान असून चालत नाही तर ते तो पदोपदी दाखवत असतात. अमेरिकेवरुन येताना जेव्हा मी फ्रंकफर्ट विमानतळावर उतरलो तेव्हाच मला समजलं की एखादा देश, तिथले लोक स्वतःच्या भाषेवर किती ठाम असतात. जिकडे जाईन तिकडे फकत जर्मन भाषेतलेच बोर्ड होते.असाच एकदा बेंगळुरु ला गेलो होतो. तिथे आय.बी.एम सारख्या एवढ्या मोठ्या कंपनीवर सुद्धा कन्नड मध्ये नाव लिहलेलं होतं.
आमच्याकडे मात्र सगळंच उलटं. मराठी भाषेतील पाट्यांचा जर आम्ही महाराष्ट्रात, ज्याची मराठी ही राजभाषा आहे, आग्रह धरला तर काही लोक त्याच्याविरूद्ध न्यायालयात जातात. मुंबई महानगरपालिकेत हिंदी भाषेचा ठराव मांडला जातो. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा बोलली जाते. जया बच्चन नावाची बुड्ढी सर्वांसमोर मराठीचा अपमान करते. कित्येक लोक जे वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राह्तात त्यांना मराठी भाषा येत नाही याचा त्यांना अभिमान वाटतो आणि मराठी येत नाही म्हणून काही अडत नाही असंही वर ते अभिमानाने सांगतात. यात चूक कणाची ? चूक आपलीच कारण हिंदीत बोलायला सुरूवात आपणच करतो. रिक्शात बसल्यावर रिक्शावाल्याशी आपण हिंदीतच सुरूवात करतो. कुठ्ल्याही हॉटेलमध्ये गेल्यावर वेटर ला आपण स्वताहूनच हिंदीत ऑर्डर देतो. बोला ना त्याला मराठीत की एक कांदे-पोहे घे. कुठ्ल्याही मॉल मध्ये गेल्यावर तिथल्या काऊंटर किंवा सेल्समनशी मराठीत संवाद साधा ना. अहो आपली संस्कुती, आपली भाषा आपणच टिकवायची असते, ती आपणच जोपासायची वाढवायची असते. त्यासाठी बाहेरच थोडंच कुणी येणार आहे.
मराठी भाषेचा, महाराष्ट्राचा विषय असेन आणि राज ठाकरे चा विषय निघणार नाही असं कसं होइन. कुणाला राज आवडो वा ना आवडो, मला मात्र हा माणुस आवडतो आणि त्याचे विचार ही पटतात. तो ज्या तडफेने मराठी भाषा, मराठी माणुस आणि महाराष्ट्राबद्द्ल बोलतो तसं कुणी बोलताना दिसत नाही म्हणून तो एवढा प्रसिदधी मिळवतोय. जो विचार आपण करत असतो तोच तो बोलून दाखवतो. आणि कुणी तरी हे बोलून दाखवायला नको का? सगळे मूग गिळन गप्प बसलेत. उत्तर प्रदेश, बिहार मधुन भर-भरून लोक येतच आहेत. त्यांना कुणीतरी कुठेतरी थांबवायला नको का? अहो, घटनेत लिहलं आहे की कुणीही कुठेही जावु शकत, कुठेही राहू शकतं, मान्य आहे. पण या येणारया लोकांची मग्रुरी पाहिली ना की मग कळेन तुम्हाला. कोण बरोबर आणि कोण चूक ते. एकदा काही दिवस मुंबई मध्ये रहा मग समजेन.
अजुन ही असं बोलण्यासारखं बरंच काही आहे पण खरंच सांगतो त्रास होतो ह्या गोष्टींचा. हे सगळं बघितलं ना की माझी तळपायाची आग मस्तकात जाते, प्रचंड राग येतो आणि मराठी माणसाची कीवही येते. आपण काय करतो आहोत , कुणाचा बळी देतो आहोत आणि कुणाला मोठे करतो आहोत याचा विचार करुन माझं डोकं जड होतं आणि हात नकळतचं लॅपटॉप कडे जातात..."जय जय महाराष्ट्र माझा..." हे गाणं एकण्यासाठी. कमीत कमी गाण्यात तरी महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा, नाही का ?
आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियाचं स्वागत आहे !
-अजय
3 comments:
मराठी भाषेची जपणूक महाराष्ट्रामधे जाणीवपूर्वक केली गेली पाहीजे.
@ Ajay - 'तळपायाची शीर मस्तकात जाते' हा चुकीचा वाक्प्रचार वापरलेला आहेस.
मूळ वाक्प्रचार - 'तळपायाची आग मस्तकात जाणे' असा आहे.
Thanks a lot ! let me correct it.
.भाषा अर्थातंच महत्वाची , पण भाषेबरोबर इथली संस्कृतीपण टीकली पाहिजे. आपण फक्त भाषा भाषा करतोय, पण संस्कतीचं कायं? मराठित बोर्डस , आणि मराठी बोलणं हे समजा सगळ्यांनी मान्य केलं तरिही त्याचा पुढे काय फायदा? जो पर्यंत रुलिंग पार्टी -- जी असेल ती.. इन्क्लुडींग शिवसेना, मनसे, भाजपा, सगळ्य़ांना झोपडपट्य़ा लिगलाइझ करण्याची घाई सुटली आहे. हे राजकिय नेते केवळ व्होट बॅंक तयार करण्याच्या मागे आहेत, एकिकडे ऊ.भा. विरोध करायचा, दुसरिकडे त्यांच्या झोपड्या रेगुलराइझ करायच्या. एका पेपरमधे आलंय, की शिवसेनेने पहिला झोपडपट्टी रेगुलराइझ करण्याचा निर्णय १९९६ मधे घेतल्यापासुन जवळपास दिड लाख झोपडपट्टीवासियांना फुकट घरं ( त्यांच्या बापाचा तर माल आहे ना.. वाटा फुकट!) देण्यात आले आहेत.
या अशा भाषिक प्रश्नांचं राजनैतिक मायलेज करता उपयोग करुन घेणं हे आता थांबवलं पाहिजे... !! नुसता राजकिय फायद्या करता मराठी लोकांचा उपयोग, नुसत्या घोषणा करा, मराठी लोकांचा पुळका आहे असं दाखवा, मराठी मतं पक्की, नंतर झोपडपट्ट्या रेगुलराइझ करा, भैय्या लोकांची मतं पण पक्की.. भिकारड्या नेत्यांना आता सांगायची वेळ आलीआहे की मराठी लोकं तुमचं मराठी प्रेम समजले आहेत...
राज ठाकरेंच्या मराठी मुद्यावर भाळून लालबाग , परळचे बरेच मराठी मुलं तडीपार झालेले आहेत.. त्या सगळ्यांनी भैय्या बॅशिंग मधे भाग घेतला होता. त्यांचं तर कॉलेज ,शिक्षण, सगळंच संपलं.. आता.. एखाद्या तडीपार गुंडाप्रमाणे जगावं लागतंय.. म्हणजे सरकारी नौकरी चा चान्स गेला आयुष्य भराकरता... जाउ द्या, या विषयावर माझी मतं जरा जहाल आहेत, म्हणुन आता इथेच थांबतो..
Post a Comment