Tuesday, August 4, 2009

ब्राईड-हंट

या १ ऑगस्ट ला मी चकक २७ वर्ष संपवून २८ व्या वर्षात पर्दापण केलं. एम.सी.एस केलं आणी त्यानंतर लगेचच नोकरी लागली. बघता बघता ५ वर्ष कशी गेली ते समजलं ही नाही. मग साहजिकच प्रत्येकाच्या घरात होतात तसं आमच्याही घरात 'माझ्या लग्नाची' कुजबुज सुरु झाली. सुरुवात कशी झाली ते मला निटसं आठवत नाही पण अंदाजे एक वर्षापुर्वी एके दिवशी मी पुण्याहून माझ्या गावी (जे अंदाजे ४० किमी अंतरावर आहे) गेलो होतो. असाच आईशी गप्पा मारत असताना आईने विषयाला हात घातला.

"काय रे ... तु आता २६ वर्षांचा झालास, लग्नाचा काही विचार आहे की नाही, कधी करायचय तुला"...आईने विचारलं
"अगं करु ना, एवढी काय घाई आहे, मी आत्ता तर कुठे २६ वर्षांचा झालो आहे ना..."
"हं...आत्तापासुन सुरुवात केली म्हण़जे चांगलं, तुझं कुठं 'काही' आहे का?"...भितभित आई, 'काही' या शब्द उच्चारताना डोळे बारीक करून.
"नाही म्हणजे..." मी फिल्मी स्टाईल मध्ये सस्पेंस वाढवुन
"म्हणजे आहे...!"
"नाही...म्हणजे असं काही नाही माझं, पण..."
"पण-बिण काही नाही...तुला कशा प्रकारची मुलगी हवी आहे ते सांग म्हणजे आम्हाला तसं शोधायला"
"अगं ते कसं सांगू? मी तर आयुष्यात पहिल्यांदाच लग्न करत आहे. गाडी थोडीच घ्याचही आहे मला की ज्याचं स्पेसिफिकेशन असं लगेच सांगता येईन. एवढी सीसी, एवढं माईलेज, अशी बॉडी, एवढी दणकट !" ...मी हसत हसत
" अरे म्हणजे शिक्षण, रंग, ऊंची वगैरे वगैरे...एक काम कर तू दादाशी बोलुन घे म्हणजे तुला तो नीट सांगेन." इति मातोश्री.

तुम्हाला खरंच सांगतो मुलगी कशी असावी याचा मी त्यावेळेपर्यंत कधीही विचार केला नव्ह्ता. पण आता जेव्हा वेळ आलीच आहे तेव्हा मी याचा विचार करु लागलो. आजुबाजुचेही बरेच लोक होतेच ना ! ते एक एक करुन उपदेश करु लागले.

" तुला सांगतो बघं अजय...मुलगी बघताना भाजीबाजारासमुलगी बिलकुल करायचं नाही, एकदा भाजी पसंत पडली की पुढच्या दुकानात अजिबात जायचं नाही. नाहीतर खुप गोंधळ उडतो."...दादा.
"अरे पण ४-५ दुकानं पालथी घातल्याशिवाय आपण भाजीसुद्धा घेत नाही आणि तु मला एकातच उरकायला लावतोयस..." यावर प्रचंड हशा ! हाच दादा स्वत:च्यावेळेस किती कन्फ्यूज झाला होता हे मलाच माहित.

"अजय...मुलगी पाहिल्या-पाहिल्या जरं तुला 'एक दुजे के लिए' वाटलं ना की बस्स !"...माझा एक चुलत भाऊ, कदाचीत 'एक दुजे के लिए' जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा हा कॉलेज मध्ये असावा :-)

"काहीही झाली तरी ऊंची हवीच रे...कमीत कमी ५.४ तरी..." ...पप्पा,
ऊंचीचा हट्ट कशापायी हे मला अजुन ही नीट समजलेलं नाही.

"मुलगी गोरीपान नसली तरी चालेन पण नाक आणि डोळ्यांत सरस हवी..", मातोश्री,
तिला काय मॉडेलिंग करायचं वा मिस युनिव्हर्स व्हायचंय थोडंच.

"मुलगी शिकलेली हवी, सॉफ्ट्वेअर इंजिनिअर किंवा डॉक्टर हवीच"..आजु बाजुचे...

"बाकी काही असो,९६ कुळी मराठा आणि ते पण आपल्यासारखे देशमुखच हवेत"...पाहुणे-रावळे.

एवढया साय्रा गोंधळात मला काय हवंय हे मी माझ्या मनाला विचारुन पाहिलं. मला फक्त सुसंस्कॄत, समंजस व जबाबदार मुलगी हवी. आणि त्या वेळेस पासून सुरु झाला आमच्या घरात माझ्यासाठी ब्राईड-हंट ( bride-hunt ).

त्यानंतर काही दिवसांत माझी काही महीन्यांसाठी अमेरीका वारी घडली. येईपर्यंत या लोकानी ३-४ स्थळ माझ्यासाठी पाहून ठेवली होती. त्यातली एक मुलगी सर्वांना खुप आवडली. रितीरिवाजा प्रमाणे कांदे-पोहेचा कार्यक्रम झाला. आयुष्यात मी पहिल्यांदाच एका मुलीच्या घरी जाऊन मुलीच्या वडीलांसमोर मुलीकडे डोळे वर करुन बघणार होतो. तसं कॉलेज मध्ये असताना मुलींकडे बघणे हा माझा व माझ्या मित्रांचा आवडता छंद होता, पण एकडे गोष्ट थोडी वेगळी होती. मनातुन थोडासा घाबरलो होतो पण उगाचच वाघ असल्याचा आविभार्वात वावरत होतो.

" कधी आलात तुम्ही अमेरिकेवरुन..."..मुलीचे वडील, 'तुम्ही' हा शव्द ऐकून मी चार फुट वर उडालो. अहो ज्याला गेली २६ वर्षे 'छोट्या' या नावाची सवय झाली होती त्याला 'तुम्ही' हा शब्द जड वाटणारच ना !
"@@@ ...गेल्याच आठवडयात"... उगाचच हसत मी :-).
पहिल्यांदाच बघायला जात होतो म्हणून मी आणि माझा 'एक दुजे के लिए' वाला चुलत भाऊ असे दोघंच होतो. हाच भाऊ एकदा माझ्या सख्या भावाच्या कांदे-पोहे साठी गेला असताना, तिथली मुलगी मान खाली घालुन बोलत होती, त्यावर हे महाशय तिला म्हणाले की "ताई ...आम्ही तुम्हाला खास पाह्ण्यासाठी म्हणून इथे १०० किमी वरून आलो आहोत आणि तुम्ही मान खाली घालून काय बोलता ?" त्यानंतर म्हणे त्या मुलीने जाईपर्यंत मान काही खाली केली नाही. असे हे आमचे बंधू महाशय.
"इकडे कुठे जॉब करता ? " ...मुलीचे मामा.
"माहित असलेल्या गोष्टी काय विचारता" मी मनातल्या मनात :-)
"मी बाणेर ला अमूक-तमूक कंपनी मध्ये गेल्या दीड वर्षापासुन सिनीअर सॉफ्ट्वेअर इंजिनीअर म्हणुन जॉब करतो. त्याच्या अगोदर मी अमूक-तमूक या कंपनीमध्ये एवढेएवढे वर्ष काम केलं आहे. माझं काम हे अमूक-ढमूक टेक्नॉलॉजी मध्ये आहे. मी गरवारे कॉलेज मध्ये एम.सी.एस केलं. त्यानंतर कॅम्पस इंटरव्हू सिलेक्शन झालं. आणि आता मा़झ्या करिअर ला ५ वर्षे पुर्ण झाली आहेत."....मी एका दमात सगळं उरकून टाकलं. सगळे अवाक !
"पगार किती मिळतो ?" मुलीचे वडील.
हा प्रश्न मला कुणी विचारला तर खुप ऑकवर्ड वाटतं. कारण पगार सांगणे आणि विचारणे मला कधीच आवडत नाही. पण मुलीच्या वडीलांनी विचारणं गरजेचंच असतं हे ही मला माहित होतं.
"'X' हजार..."
चेहरयावर हसु आणून मी पुढचे प्रश्न टाळले. थोड्याच वेळात मुलगी काहीतरी खायला घेऊन आली. बघा-बघी,बोला-चाली झाली आणि अशा प्रकारे माझा आयुष्यातला पहिला कार्यक्रम उरकला.
आजकाल मी कांदे-पोहे प्रकरणात बराच सरावला गेलो आहे. माझे दोनाचे चार हात होईपर्यंत माझे आई-वडील काही शांत बसणार नाहीत आणि मला ही बसू देणार नाहीत. तूर्तास तरी मी इथे थांबतो, पुन्हा येईन असेच काही अनुभव घेऊन.

-अजय


---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

14 comments:

Photographer Pappu!!! said...

Mastach.. :) hope soon you ll join us in the elite group of married people. BTW, belated happy birthday :)

Mugdha said...

best wishes...
mugdha
mugdhajoshi.wordpress.com

Meenal said...

:)
ब्राईड-हंट पूर्ण झाल्यावर त्याची नविन पोस्ट टाकशील ना?
belated Happy B'day!! :)

Ajay Sonawane said...

@photographer pappu - Thanks mitra,

@mugdha - dhanywad !

@meenal - nakki taken , agodar miludet tar khar...

भुंगा said...

मस्त अनुभव आणि लेखही झक्कासच!
बाकी "पाहिल्यानंतर - एक दुजे के लिये" असं वाटण्यालाच आम्ही "घंटी" वाजणं असं म्हणतो..!

मित्रांना मुली बघायला जायचो तेंव्हा असे कांदे - पोहे भरपुर खाल्ले.. मात्र स्वतः उमेदवारी जाहिर केल्यावर मात्र एकच मुलगी पाहिली तीच्याशीच लग्न केलं!

गावचा एक मित्र नेहमी म्हणायचा " लोकाच्या लेकराला कशापायी नावं ठेवायची!"

शुभेच्छा!

अपर्णा said...

माझं फ़ायनली ज्या मुलाशी लग्न जमलं आणि झालं त्यांच्या घरी for change मीच जाऊन कांदे-पोहे (अर्थात त्याच्या आईने बनवलेले) खाल्ले होते त्याची आठवण आली. बाकी सर्व बाबतीत कितीही पुढे गेलो तरी काही काही बाबतीत सगळं कसं पुर्वीसारखंच आहे ना? हा लेख झक्क जमलाय. आणि हो आता या विषयावर update टाकत राहा आणि शुभेच्छा.

Ajay Sonawane said...

@aparna - Dhanywad , Will keep you all updating. Keep visiting !

-Ajay

http://ajaysonawane1.blogspot.com

नसती उठाठेव said...

यार तू तर एक दम माझ्या मानातलेच सगळे लिहून काढले. मुलगी कशी हवी हे साला काही केल्या मी सांगू शकत नाही आणि माझ्या मनात जी काही प्रतिमा आहे ती दुनियेला समजावू सांगणे हे अशक्य कोटीतले आहे. गंमत म्हणजे आजपर्यंत मी एकदाच मुलगी बघायला सॉरी सॉरी मुलीला भेटायला गेलो आहे. ते देखील रक्षाबंधनाच्या दिवशी. का तर मी नेमका त्यावेळी मुंबईला होतो आणि तिला देखील त्या दिवशी हाफ डे होता. आत्ता बोला. ते म्हणजे "नवरोजी-दादा-भाई" असं उलट प्रकरण होतं. बाकी मुलीच्या घरी जाऊन फुल्ल कांदे-पोहे हाणून मुलगी पहाणे वैगरे मला अजुन ही पटत नाही. अवधूत गुप्ते चे "कांदे पोहे" गाणे लग्नाळु मुलीच्या मनातल्या भावना अचूक व्यक्त करते. असो तर मित्रा तुला (आणि मला पण) ब्राईड-हंट साठी शुभेच्छा...

Jidnesh said...

Hi Ajay.
Tuza lekh vachu khup chan watale.
ar chan lihile aahes. Pudhache anubhavhi aikayala aawadel.

Deep said...

:D sahi likha hai bhidu :) are yaar he as bagha baghee karnyapekhsaa sarl love myarage karaaych na :P

Ajay Sonawane said...

@दीपः लव्ह मॅरेज, त्याची तर मला जास्तच भीती वाटते त्यामुले तो ऑप्टन केव्हाच मागे टाकलाय. पण अशा पाहण्याच्या मुळे जे किस्से घडतात ते एकंदरीतच मजेशीर असतात.

अशाच प्रतिक्रिया देत रहा.

-अजय

zehra said...

mast he ekdum!!!!
muze marathi jyada nahi samajti fir bhi padh kar bahot maza aaya...keep on writing such hilarious blogs...kisse to sab ke sath hote he ..per bahot kam log hote he jo unhe itni ache se..VYANG me convert karte he....by the way all the very best for ur bride hunt....keep on updating us...take care!!!

yamini said...

ha ha ha
mast lihilays
96 kuli maratha havi he tar saglyat adhi
mast
keep it up !!!

yamini said...

mastch lihilayes
ek duje ke liye
aani 96 kuli maratha wagere
mastach