Tuesday, August 11, 2009

हा एक खरा घडलेला प्रसंग आहे...

हा एक खरा घडलेला प्रसंग आहे. हा प्रसंग जेवढ्या वेळेस मी माझ्या भावाच्या तोंडून ए॓कतो तेव्हा तेव्हा मी सुन्न होउन जातो. प्रसंगच तसा आहे... दरोडेखोर, चोर, पारधी फक्त मी न्यूजपेपर, सिनेमा किंवा बाबा कदमांच्या कादंबरी मध्येच पाहिले किंवा ए॓कले होते. पण जेव्हा कुणाच्या तोंडुन अशा प्रकारचे घडलेले किस्से ए॑कायला मिळतात तेव्हा मात्र "आपण जर त्या जागेवर असतो तर ?" हा एकच प्रश्न मनात उभा राहतो. अशी ही कहाणी माझ्या भावाच्याच जुबानी...

"७-८ वर्षापुवीची गोष्ट, एप्रिल महिना होता. एप्रिल म्हणजे लाही लाही करणारं ऊन, त्यात शेवटचा आठवडा होता. आमच्या गावची यात्रा येऊन ठेपली होती. सगळया परगावी राहणारया लोकांचे पाय गावाकडे वळले होते. मी त्यावेळेस फलटणला होतो. मी ही त्या दिवशी स्वत:चा काम उरकून टू-व्हीलर वर गावाकडे येण्यासाठी निघालो होतो. संध्याकाळची वेळ होती, अंधार लवकर पडला होता. गावापासून १० किमीच्या अंतरावर एक निर्जन आणि डोंगरातुन जाणारा रस्ता आहे. शक्यतो त्या रस्त्याने अंधार पडल्यावर कुणी येत नसे. पण मला त्या दिवशी उशीर झाला होता आणि घरी लवकरही पोचायचं होतं म्हणुन मग मी तो रस्ता पकडला.

सात-साडेसात वाजले असतील. सगळीकडे बरयापैकी अंधार पडला होता. रातकिडे नुकतेच बाहेर पडुन किर्र-किर्र असा आवाज करायला लागले होते. रस्त्याच्या एका बाजूला नीरा नदी तर दुसरया बाजूला डोंगर. भयाण शांतता पसरली होती. त्या शांततेत नदीच्या पाण्याचा आवाजसुद्धा खुप भेसुर वाटत होता. रस्ता तसा वळणा-वळणांचा होता. एक चढ उतरून मी जेव्हा सपाट रस्त्यावर लागलो तेव्हा गाडीने चांगलाच वेग पकडला होता. आता फक्त काही मिनीटांचं अंतर बा़की होतं. पण मला माझ्या पुढे, अगदी १ किमी वर काय घडणार आहे याची बिलकूल ­कल्पना नव्हती. घरी लवकर गेलं पाहिजे हा एकच विचार त्यावेळी डोक्यात चालू होता आणि तेवढयात मला हेडलाईट च्या प्रकाशात एक माणुस दिसला. हा माणुस रस्त्याच्या कडेला उभा होता आणि हात दाखवून गाडी थांबवण्याचा इशारा करत होता. मी गाडीचा वेग थोडा कमी केला. अजुन जवळ गेल्यावर मला दिसलं की त्या माणसाने धोतर आणि शर्ट घातलेला आहे. मी ब्रेक लावणार तेवढ्यात एवढया उशीरा इथं कोण आलं असावं हा विचार मनात आला. थोडंस विचीत्र वाटलं. झटदिशी मी गाडीचं वेग वाढवला. गाडीचा वेग वाढलेला पाहून त्या माणसाने बोंब ठोकली. विचार करायलाही वेळ नव्ह्ता. काय होत होतं हे कळतच नव्ह्तं पण कुठल्याही परिस्थीतीत तिथे थांबणं धोक्याचं आहे हेच समजून गेलं होतं. मी तेवढयाच वेगात गाडी त्याच्या अंगावर घातल्यासारखी केली व त्याला चकवून पुढे आलो. मागच्या माणसाची बोंब बहुतेक पुढ्च्यांसाठी इशारा होता कारण पुढे ४ हट्टे-कट्टे लोक रस्त्याचा कडेला असलेल्या खड्ड्यातून वर येत होते. त्यांच्या हातात काठ्या होत्या. एव्हाना माझ्या गाडीने बराच वेग पकडला होता. मी त्याच वेगात गाडी त्यांच्या अंगावर घातली. त्यांनी माझ्यावर काठ्या उगारल्या, काहींनी मारल्या देखील. त्यांना ही मी सही-सलामतपणे चकवण्यात यशस्वी झालो होतो. पुढे एक वळण होतं. तिथे ३-४ लोक उभे असलेले मला दिसले. त्यात १-२ स्त्रिया असाव्यात. एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं की गाडी अंगावर घालणं हेच माझं शस्त्र आहे. मी पुन्हा त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चूकवलं. त्यातली एक बाई मोठमोठ्याने बोंब मारु लागली. तिची मी बोंब ए॑कुन मी प्रचंड घाबरलो. हे सगळं फक्त १०-१५ सेकंदात झालं होत. मला विचार करायला ही वेळ नव्हता.

मी आता सरळ रस्त्यावर आलो होतो. पुढे एक अरूंद पुल होता. एकावेळेस एकच चार-चाकी गाडी जाउ शकते इतका अरुंद. गाडीच्या प्रकाशात त्या पुलावर मला एक माणुस, एका हातात कुह्राड उगारून व दुसरया हाताने थांबण्याचा इशारा करत उभा असलेला दिसला. आता मात्र परिस्थीती आणीबाणीची होती. एक तर रस्ता अरूंद, त्यात त्याच्या हातात कुह्राड. आता मी थोडा कुठे शुद्धीत आलो होतो. एवढा वेळ जे चाललं होतं ते सगळं मा़झ्या हातातून होत गेलं. पण आता मला हे सगळं काय चाललंय हे समजत होतं. माझ्या डोळ्यांसमोर माझा साक्षात म्रूत्यु उभा होता. आता जर थांबलो तर काही खैर नाही. मागचा-पुढ्चा सगळाच मार बसणार. कदाचीत जीवे मारतील सुद्धा. विचार करायला फक्त ३-४ सेकंदच होते. ठरवल जे काही होइन ते...तेवढ्याच वेगात गाडी पळवली. समोरचा माणूस काहीतरी ओरडत होता. सरळ त्याच्या अंगावर गाडी घातली. तो बाजुला सरला. कुह्राडीचा सर-सर करत वार झाला...मी थोडासा वाकलो. वार झाला होता पण मला कुठेच काही लागल्याचं जाणवत नव्हतं. म्हणजे मी सही-सलामत होतो. मी त्याला यशस्वीपणे चकवून पुढे आलो होतो. वार बहुतेक चुकला होता. मी अगदी थोडक्यात, नशीबानेच बचावलो होतो.
आता पुढे एक वळण होतं. त्या वळणावर मला गाडीचा वेग कमी करावाच लागणार होता. पण माझ्या नशीबाने त्याठिकाणी कुणीही नव्हतं. आता मला समजलं होतं की मा़झी किती मोठ्या संकटातून सुटका झाली होती. देव माझ्या पाठीशी उभा होता म्हणुनच मी वाचलो. त्याच्यानंतरचं अंतर मी अगदी ६-७ मिनीटांमध्येच कापलं. घरी येऊनच मी गाडीचा ब्रेक दाबला. छाती धडधडत होती. कपाळावर घाम आला होता. समोर पप्पा काहीतरी म्हणत होते. त्यांचे शब्द नुसतेच कानावर पडत होते पण ते समजण्याइतका मी शुद्धीवर नव्हतो. गाडीवरून उतरलो आणि घडलेली हकीकत सर्वांना सांगितली.

अजुनही जेव्हा जेव्हा हा चित्रपट मा़झ्या डोळ्यांपुढुन जातो तेव्हा तेव्हा माझ्या मनात काही प्रश्न उभे राहतात. समजा, पहिला माणुस दिसला होता तिथे जर मी गाडी थांबवली असती तर? चुकुन एखाद्या माणसाची काठी गाडीला लागुन गाडीचा वेग कमी झाला असता किंवा गाडीवरुन मी पडलो असतो तर? त्या शेवटच्या माणसाच्या कुह्राडीचा वार जर माझ्यावर झाला असता तर ? त्या शेवटच्या वळणावर जिथे गाडीचा वेग अगदी कमी होतो तिथे जर कुणी असतं तर ? मी जर त्यांच्या हातात सापडलो असतो तर ?

या जर तरला काहीच उत्तर नाहीत. कुठेतरी माझं नशीब जोरावर होतं आणि सा़क्षात परमेश्वरच माझ्या पाठीशी होता म्हणुनच मी बचावलो !"

-अजय

10 comments:

Paanthastha said...

Aflatoon.

साधक said...

जबरी रे. आयला जाम फाटली वाचताना.

Yawning Dog said...

Na ghabarta hanlees kee gaDi, sahee bharee re !

vishal said...

Jabaradasta !!dusra shabdach nahi !

नसती उठाठेव said...

साला वाचताना आमची तंतरली होती तर ज्याने हे स्वत: अनुभवलं त्याची काय अवस्था झाली असेल...

भानस said...

प्रसंग तर मोठा बाका ओढवला होता. प्रसंगावधान,धाडस व दैवाची साथ या बळावर वाचलास.:) आमची आई नेहमी म्हणत असे,'बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको ’ तू जर ती आडवाट घेतलीच नसतीस तर घरी पोचायला उशिर झाला असता पण शांत मनाने पोचला असतास, अन आता...... असो. शेवटी आपण सारे hard way नेच शिकत असतो.:)

Harshal said...

शाब्बास तुमची ! आणिबाणिच्या प्रसंगात तुम्ही जसे वागलात...लुटारुन्च्या अंगावर गाड़ी घातलित त्याला तोड़ नाही ... जबरदस्त धाडसीपणा ... लिहिलय पण मस्त ! मला तर वाचताना असे वाटत होते की मी तुमच्या मागच्या सीट वर बसून सगळे अनुभवतो आहे :)
ग्रेट पोस्ट !

tanvi said...

Baap re vachatana angavar kata aala.....daiv balvattar mhanayache tujhe....

Tanvi
www.sahajach.wordpress.com

Ajay Sonawane said...

प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद !

-अजय

Amey said...

Aaaishappath!!! tujhya bhavachya prsangavdhanala salam ahe...