Wednesday, November 4, 2009

यंदा कर्तव्य आहे ?

लग्न हे तसं प्रत्येकाच्याच पाचवीला पुजलेलं असतं. लग्न हे अपघातानं कधी होत नाहीत, अपघातानं मुलं होतात. लग्न जर ठरवुन करत असाल तर चॉईस असते आणि जेव्हा चॉईस असते तेव्हा थोडासा संभ्रम निंर्माण होतो. त्यात ज्याला लग्न करायच असतं त्याच्या आजुबाजुचे लोक त्याला उपदेशाचे डोस पाजत असतात,ते पण अगदी फु़कट. आतापर्यंत मी कसा दिसतो/दिसते याचा कधीही विचार न केलेले लोकही मग आरशासमोर तास न तास उभे राहुन स्वत:ला न्याहाळु लागतात. त्यांची रंगाची आवड, चॉईस सुधारते. त्यांच्या आयुष्यात मग रंगीबेरंगी फुलपाखरं उडायला लागतात. 'आभास हा...छळतो तुला, छळतो मला..." सारखी गाणी ओठांवर रेंगाळु लागतात. आपला जोडीदार कसा असावा याचं एक हलकंस चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर असतं पण ते पुर्ण दिसत नसतं. आणि शेवटी मग तो दिवस उजाडतो, त्याला सारेजण 'पाहण्याचा दिवस' म्हणतात. मनात नाना शंका, नाना प्रश्न उभे असतात. अशाच काही प्रश्नांचा, शंकाच केलेला हा ऊहापोह, तो पण अगदी रोखठोकपणे.

या जगात परफेक्ट असं कुणीही नाही. प्रत्येकाच्यात काही ना काही उणीवा आहेत. लग्न म्हणजे थोडीफार तडजोड आलीच. आपल्याला हवा तसाच व्यक्ती कधीच कुणाला मिळत नाही. त्याला तसा बनवावा लागतो.

आपल्या मनासारखीच समोरची व्यक्ती हवी असा अट्टहास कशाला? थोडे इकडे थोडे तिकडे होतच असतं. त्यात विशेष काही नाही. आपल्याला समोरच्यात नेमकं काय हवंय हे नीट ठरविल्याशिवाय पुढे जाउ नये. आपल्याला झेपेल असाच आपला जोडीदार असावा ( वजनाने झेपेल असा अर्थ अपेक्षीत नाही :-)) नाकापेक्षा मोती जड असं काही करु नका.

लग्न म्हणजे खेळ नाही तो दोन जीवांचा मेळ आहे. लग्न म्हणजे एक नवीन नात्याची सुरुवात, आपल्या आयुष्यात एक नवीन माणसाची ती असते एंन्ट्री. अशी सुरुवात खोटं बोलुन कधीही करु नये असं मला वाटत. जे काही असेन ते अगदी खरंखरं. "खोटं बोलुन लग्न जमेन ही पण टिकणार नाही "

मुलाच्या डिग्रीपेक्षा त्याचा प्रामाणिकपणा महत्त्वाचा, डिग्री आयुष्यात कमावता येईन हो पण प्रामाणिकपणा आडातच नसेन तर पोहरयात कुठुन आणणार. मुलगा प्रामाणिक, हुशार आणि प्रेमळ असेन तर तुम्ही लग्नाची अर्धी लढाई जिंकली म्हणूनच समजा. मुलीनी मुलाचं कर्तुत्व पहावं, प्रापर्टी गौण असते. कर्तुत्व असेन तर अशा कित्येक प्रापर्टीज कमावतात येतात. मुलाने मुलीच्या सौंदर्याबरोबरच ती तुम्हाला, तुमच्या घराला किती सुट होते ते पहाव. समंजसपणा हा दोघांनी एकमेकांत पहाणे गरजेचं. तो एक गुण असा आहे जो नेहमीच तुम्हाला एकत्र ठेवायला मदत करतो.

मुलाच्या किंवा मुलीच्या फोटोवरुन ती व्यक्ती दिसायला तशीच असेन असा ग्रह करुन घेऊ नये. आयुष्यभर पॅराशुटचं तेल लावणारी मुलगी सुद्धा लग्नासाठीच्या फोटोमध्ये केस मोकळे सोडतेच. त्यामुळे मोकळे केस दिसले की हुरळुन स्वप्नांचे मनोरे बांधू नये. फोटोवरुन अंदाज बांधावा किंवा कल ओळखावा. खरा चेहरा हा पहाण्याच्या कार्यक्रमातच दिसतो.

मुलींना नाहक अवघड प्रश्न विचारु नका. ती जर सॉफ्टवेअर इंजीनिअर असेन तर ती C++ की JAVA यापेक्षा ती तुम्हाला दोन वेळ जेवण करुन घालु शकेल काय हा प्रश्न जास्त समर्पक आणि महत्त्वाचा. स्त्री ही आतापर्यंत घरातच रहात असे त्यामुळे स्त्रीला बाहेरच्या जगातलं ज्ञान हे तसं पुरुषाच्या तुलनेत मर्यादित असतं. ( समस्त स्त्री वर्गाची माफी अगोदरच मागत आहे ) त्यामुळे तुम्हाला अगदी हवेत तशीच उत्तरांची अपेक्षा मुलींकडुन करु नका. मुलींनी मात्र ही अपेक्षा करावी. मुलगा हा बोलण्या चालण्यात स्मार्ट असलाच पाहिजे.

हिच्यापेक्षा ही जास्त चांगली वाटते किंवा ह्याच्यापेक्षा हा चांगला , असा प्रकार शक्यतो करु नये. एकदा का तुम्हाला वाटला की मला समोरची व्यक्ती जोडीदार म्हणुन पसंद आहे तेव्हा तिथेच थांबाव. एकदाच निर्णय घ्या पण विचार करु घ्या. आवडीनिवडी झाल्यानंतर ही तुम्ही तुलना करायला गेलात की हाती दु:ख आलंच म्हणुन समजा.

असं म्हणतात की मुलीच्या आई वरुन मुलगी कशी असेन हे ओळखावं. त्यामुळे आईच्या बोलण्याकडे लक्ष राहुद्यात. ( म्हणजे तिच्याकडेच पहातच रहा असं मी सांगत नाही ! )

पाहण्याच्या कार्यक्रमात आपल्या बरोबर जे लोक असतात त्यांची जबाबदारी असते ती वातावरणनिर्मिती करण्याची. एक हलकफुलक वातावरण करुन देणे आणि निर्णय घेण्यासाठी मदत करणे एवढंच. निर्णय शेवटी तुम्हाला घ्यायचा असतो. मित्राला उगाचच विचारु नका की मुलगी तुला कशी वाटली. लग्न तुला करायचं असतं. त्याच्याशी आवडलेले आणि खटकलेले मुद्द्यांबाबत जरुर चर्चा करा, निर्णय सर्वस्वी तुमचा असतो.

लग्नाला उभ्या राहिलेल्या सगळ्यांच्या मनातला एक खदखदता प्रश्न - मी १ तासाच्या भेटीत आयुष्यभराचा जोडीदार कसा निवडु ? तो त्या एका तासात चांगलाच वागणार ! प्रश्न बरोबर आहे. त्यामुळे लग्न ठरवायच्या अगोदर किमान एकदा तरी बाहेर भेटुन गप्पा माराव्यात. आपल्या अपेक्षा आणि समोरच्या व्यक्ती च्या अपेक्षा मॅच होणे महत्वाचं. याला मी स्वत: फ्रिक्वेन्सी मॅच होणं अस म्हणतो. माणुस स्वत:चा स्वभाव बदलु शकत नाही त्यामुळे अशा भेटीतुनच समोरच्याचा स्वभाव जाणुन घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. तुम्हीसुद्धा अशा भेटीत तुम्ही जसे आहात तसेच स्वत:ला प्रेझेंट करा, उगाचच ढोंगीपणा काय कामाचा ?

मुली पहायला जाताना अगदी आपल्याला सुट होईन असाच फॉर्मल ड्रेस घालावा. लेंस नसलेले शुज,पायाची तिरकी घडी जरी घातली तरी उघडे पाय दिसणार नाहीत एवढे मोजे, आपल्याला सुट होईन अशा रंगाचा शर्ट आणि परफेक्ट फिटींग ची पँन्ट घालावी. पाहण्याच्या अगदी थोडावेळ अगोदर शेव्हींग करु नये. मनावर दडपण असल्यामुळे कापण्याचा संभव जास्त.
मुलींनीसुद्धा आपल्याला चांगली दिसेन अशाच रंगाची साडी, शक्यतो त्या दिवशी दुसरया कुणातरी अनुभवी बाई कडुन नेसवुन घ्यावी. बा़की मुलींच्या बाबतीत मी जास्त खोलात जात नाही. त्या सुज्ञ आहेतच.

जोपर्यंत 'दिल की तार' वाजत नाही तोपर्यंत कुणालाही हो म्हणु नका. एकदा का तुमच्या मनाने तुम्हाला सांगितल की हीच माझी किंवा हाच माझा भावी जोडीदार तेव्हा मग पुढे जा. तार वाजणं महत्वाच, त्याचबरोबर तार तुटेपर्यंत ही नाही म्हणु नका. मला याच मुलाशी किंवा याच मुलीशी लग्न करायचं असं जेव्हा मनापासुन वाटतं तेव्हा समजावं की आपली तार वाजली म्हणुन.

स्वत: बॅचलर असतानाही लग्नासंबंधीचे उपदेश करणं मला जड जात होतं त्यामुळेच खुप दिवसांपुर्वी लिहिलेली पोस्ट मी नको नको म्हणत शेवटी आज पोस्ट केलीच. पण लग्न करण्यासाठी थोडंच लग्नाचा अनुभव असण गरजेच असतं, नाही का ?

-अजय

--------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे आवडीने वाचले गेलेले पोस्ट वाचा.
१. ब्राईड-हंट
२. ए॑का आणि पोट धरुन हसा
3. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे

43 comments:

Photographer Pappu!!! said...

Bola guru ajay sonawane maharaaj ki jay :) Moulik maahiti dilyabaddal aabhaar, pan ya maahiticha kamit kami mala upayog naahi.. majh agodarach lagn jhaalay.

vishal said...

Mala sarvat jasta avadleli line -
असं म्हणतात की मुलीच्या आई वरुन मुलगी कशी असेन हे ओळखावं. त्यामुळे आईच्या बोलण्याकडे लक्ष राहुद्यात. ( म्हणजे तिच्याकडेच पहातच रहा असं मी सांगत नाही ! )

Mahendra Kulkarni said...

Good one.. छान आहे लिहिलेलं.

भानस said...

शुभेच्छा!:)

Unknown said...

छान लिहिलस अजय....ते C++ वाला मुद्दा जास्त पटला....मला पहायला आलेला पहिल्याच मुलाने मला विचारले होते की नासिकमधल्या ईलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांची नावं सांगा....असा राग आला होता अगदी हेच वाटलं होतं की हा काय रेझिस्टर्स, कपॅसिटर्स खाणार आहे का?
शेवटी सरळ लव मॅरेज केलं ...म्हटल हा उपद्रवच नको....

Ajay Sonawane said...

@प्रविण : माझा कशाला जयजयकार, तुमच्यासारख्या मॅरीड लोकांचा उलट जयजयकार करायला हवा ज्यांनी स्वत: लग्न करुन दुसरयानाही हा मार्ग दाखविला, आम्ही मात्र 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' याला न अनुसरता पुढे चाललोच आहे. :-)

-अजय

Ajay Sonawane said...

@विशालः हो म्हणजे लोक हे वाचुन तिच्याकडेच सारा वेळ पाहण्यात घालवायचे नाही का ?

Ajay Sonawane said...

@ महेंद्र आणि भानस : तुमच्यासारख्यांच्या शुभेच्छा आहेत म्हणुन लिहीण चालु आहे. असेच भेट देत रहा.
-अजय

Ajay Sonawane said...

@तन्वी : ईलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांची नावं विचारणं म्हणजे जरा अतीच आहे. तु लव्ह मॅरेज करुन असले प्रकारच बंद केले हे भारी मला ही यातुन धडा घ्यावा अस वाटु लागलय
अशीच भेट देत रहा
-अजय

मीनल said...

हे सगळ आधि वाचलय, पण परत वाचताना मजा आली.
समस्त होतकरु (अविवाहित)ब्लॉगर मंडळींना ठोस मुद्दे दिलेस. :)

Ajay Sonawane said...

@मीनल : ओह्, म्हणजे माझ्याशी बोलताना ना ? मीनल तुझे मुद्दे कधी मांडणार ?

सिद्धार्थ said...

श्रीमंत अजय पंत, आपल्या लेखाला लोटांगण. ह्या पामराला देखील ह्या सर्व प्रसंगातून लवकरच जावे लागणार आहे. अशा वेळी एका बॅचलरने दिलेल्या टिप्स मलाच नाही तर समस्त बॅचलर जमातीसाठी फार उपयोगी ठरणार. हल्ली ह्या विषयावर बरेच लेख वाचण्यात आले. पण तू एकदम जबरा लिहलं आहेस. मस्तच.

तुमच्या विवाह संदर्भ खटपटीना शुभेच्छा

Ajay Sonawane said...

@सिद्धार्थ : आपल्यासारखे लोक जेव्हा असे चांगले कमेन्ट देतात तेव्हा खरंच खुप बरं वाटत. मला जे मागच्या काही दिवसात जाणवलं, अनुभवलं तेच मी प्रामाणिकपणे लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. माझेच अनुभव विचार मी शेयर केले. त्याचा समस्त बॅचलर लोकांना फायदा व्हावा हाच हेतु. बाकी आपल्या लग्नाच्या कार्याला माझ्याकडुन शुभेच्छा ! अशीच ब्लॉग ला भेट देत रहा.

-अजय

S V AGASHE said...

Blog aavadla.Vinodachi pakharan kartanach bahumulya satye sangitli aahet.vruttapatrantunhi ase lalit lekhan kara,ka kartahi? Jata Jata - Mi nastik,nirishwarvadyansathi 'Vichardhara Vivah Mandal'suru kele aahe.SV Agashe,Thane.Tel.25805800,25594049,9969166607

Ajay Sonawane said...

श्रीपाद,
प्रतिकियेबद्दल आणि ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, सकाळ कडे काही चांगले लेख पाठवले होते पण त्यांनी कधीच ते प्रकाशीत केले नाहीत.

-अजय

Dk said...

Hi Ajay hi dusree post vaachtopy tuzee :) aawdla lekh pan thoda biased vaattlaa! anyway purn blog vaachen ch lavkar :)

Sandhya said...

Sahi lihil ahes.
Baherchya dnyanabaddal tulana karnata Stri vargachi mafi magitalis, he bhari kam kelas! adhich safe side ghetalis.. Good, keep it up..

Ajay Sonawane said...

@दीपः लेख आवडला हे वाचुन आनंद झाला पण बाऐस्ड का वाटला ते नाही सांगितलंस ?
अशीच भेट देत रहा...

-अजय

Ajay Sonawane said...

@संध्या: संध्या,स्त्री वर्गाची माफी मागीतली नसती तर तुझं एखादं खरमरीत मेल किंवा जी टॉक वर मेसेज आला असता :-) मला माहितेय तु त्या विषयावर कशी रिअ‍ॅक्ट करतेस ते...
-अजय

Swati said...

mast blog lihala aahe..mulinpeksha mulana jast upyogi padel..

Ajay Sonawane said...

@स्वाती: असं काही नाही, मुलांचे मुद्दे जास्त असतील पण मी बरेच कॉमन मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. बाय द वे, अशीच भेट देत रहा आणि जमल तर मुलींचे जर काही मुद्दे सजेस्ट करु शकलीस तर खुपच छान, ते मुद्दे नक्कीच मांडेन.

-अजय

Bharati said...

khup chan lihil aahe ...

sarv points cover kele aahet ..

Ajay Sonawane said...

@भारती: मला वाटत अजुन बरेचसे पॉईन्ट्स मी कव्हर नाही केलेले. पण महत्वाचे नक्कीच केलेत. अशीच भेट देत रहा. तुझ्या ब्लॉग वरच्या काही चारोळ्या आता वाचल्या. पण संध्याकाळी नीट वाचेन.
अशीच भेट देत रहा.

-अजय

मी रेश्मा said...

भन्नाट एकदम सही लेख लिहिला आहेस
मला नाही पण समस्त अविवाहित मंडळीना नक्कीच छान छान टिप्स मिळतील ....

Ajay Sonawane said...

@रेश्मा : हो अविवाहीत मंडळींसाठीच आहे लेख,धन्यवाद. अशीच भेट देत रहा.

-अजय

Yogesh said...

खूप दिवासाने तुझ्या ब्लॉगवर आलो म्हणून प्रतिक्रिया देण्यास उशीर झाला. . .तसा हा आपला जिव्हाळ्याचा विषय. . .अन् त्यावर एवढी जबरी पोस्ट!!!

So अजय महाराज आपणास शि.सा.दंडवत!!! समस्त बॅचलर जमाती कडून आपले आभार!!!

Ajay Sonawane said...

मनमौजी: आभार, बॅचलर मंडळीसाठीच पोस्ट होती. बाकी तुझा ब्लॉग बरेच दिवसात वाचायला नाही मिळाला. काहीतर लवकरच नवीन पोस्ट टाक.

-अजय

Unknown said...

Maast blog lihila ahe :):)

snehal said...

Hiii,

You write too good, keep it up.

Ajay Sonawane said...

Ujawala and Snehal - khup khup dhanyawad :-)

ashich bhet det raha.

-Ajay

आनंद पत्रे said...

अजय, नेहमीप्रमाणेच तु खुप छान लिहिले आहेस... मस्त बॅलेंस्ड..
प्रतिक्रिया उशीरा देत आहे...माफ करावे.. :(

स्वप्ना said...

marathi blog surf karta karta ha blog baghayala milala.....
shirshak vachunach blog vachawasa watala (ITI KARTAVYAWAR LIHINARA AJUN EK MAHABHAG KASA AAHE AANI KAAY LIHILAY TE KALAW MHANUN)
blog ekandarit mast aahe.pan aapan ajunahi junya BAGHANAYCHYA PROG mahde ka adakato???dusare upaay suchale tar ajun post kara.....
aamhalahi upyog hoil........
(sudnyas sangane n lage)

स्वप्ना said...

marathi blog chi site surf kartana ha blog wachayala milala.......
shirshak pahunach wachawas watat(YA VISHAYAWAR LIHINARA MAHABHAG KASA AAHE N KAAY LIHILAY TE PAHAYALA KHAR TAR VACHALA)
ekandarit chaan aahe.......
pan arrange marriage chya dakhawanyachya padhdhatila dusare paryay asatil tar nakki suchawa.....
samasta bachelor mandalina (muli-mule)upyogi padtil...

Ajay Sonawane said...

स्वप्ना: स्वागत आहे बेधूंद वर, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. लिहीणारा तो 'महाभाग' मीच आहे :-)
दुसरे पर्याय काय असतात हे सारया जगाला माहीतेय त्याबद्दल माझ्यापेक्षाही मोठे गुरु लोक आहेत. मला वाटलं की अरेज्ड मॅरेज साठी लोकांना चार शब्द सांगावेत म्हणून एक प्रयत्न करून पाहिला.

-अजय

Prakash Ghatpande said...

यंदा कर्तव्य आहे? वाचुन आम्हाला आमच्या यंदा कर्तवय आहे? या पुस्तकाची आठवण झाली. आमच्या ब्लॊग वरील ई ग्रंथालयात ते फुकट उपलब्ध आहे.http://faljyotishachikitsa.blogspot.com/
पुस्तक लेखमाला स्वरुपात वाचायचे असल्यास http://www.misalpav.com/node/7006

अजय लेख आवडला ब्लॊग आवड्ला. स/आवडीने वाचीन

Ajay Sonawane said...

@प्रकाशजी: बेधुंद वर आपलं स्वागत. तुमचं पुस्तक नक्कीच वाचेन मिसळपाव वरचं आणि ब्लॉगला ही आता आर्वजुन भेट देईन. असेच येत रहा वरचेवर.
धन्यवाद.

-अजय

Maithili said...

Khoop ushira comment lihityey pan garajeche aahe.... 'Mulichya aai varun mulgi kashi aahe te olkhave'.... Lahan tondi motha ghaas vaigare pan ase karoo naka ho..plz....!!!
Ase kahihi naste(Generally)
Tension aale mala. Mazya babtit koni he asle prayog kele tar paar vaat laagel rao mazi......!!!
so plz... kalkalichi vinanti.... MULIKADECH lakshya dya..... :)

हेरंब said...

अजय, तुझा हा लेख खालच्या ब्लॉगवर जसाच्या तसा चोरला आहे. मी तिकडेही कमेंटलो आहेच..

http://dhandekiran.blogspot.com/2010/04/blog-post.html

साधक said...

हेरंब च्या चतुरपणा मुळे चोरी कळाली.
इथे प्रतिक्रिया देतोय.

दोन वेळ जेवण करुन घालु शकेल काय हा प्रश्न जास्त समर्पक आणि महत्त्वाचा. स्त्री ही आतापर्यंत घरातच रहात असे त्यामुळे स्त्रीला बाहेरच्या जगातलं ज्ञान हे तसं पुरुषाच्या तुलनेत मर्यादित असतं.

melas tu ya don vaknyan mule

संगमनाथ खराडे said...

Herambh muLe yaa post war aalo....

Mast lihil aahes...anubhawaache bol disataat...:)

THEPROPHET said...

Herambachya chaturyamule midekhil ithe aalo...
mast aahe lekh...

सुसाट said...

अजून एक चोरी

http://my.opera.com/bharatbanate/blog/show.dml/10668841

Nikhil said...

are tuza ha blog aj parat koni tari uchala bhart says marathiblogs.net var