Tuesday, October 20, 2009

ठोश्यास ठोसा

प्रसंग अगदी साधा, स्थळः पुणे सेंन्ट्रल, वेळ: शुक्रवार, संध्याकाळचे ४ वाजले असतील, मी जिन्स ट्रायल साठी ट्रायल रुमच्या बाहेर उभा. आत कुणीतरी होतं त्यामुळे तो बाहेर येण्याची वाट पहात मी उभा होतो. एक मुलगा हातात जीन्स आणि टी-शर्ट घेउन माझ्या समोर माझ्या पुढे येउन थांबला.
"दोस्त, प्लीज फॉलो द क्यू", मी त्याला अगदीत शिस्तीत म्हणालो."
"अरे यार एक ही जीन्स और एक शर्ट ट्राय करना हे, दो मिनीट लगेंगे सिर्फ", अगदी बेफिकीरपणे. कदाचीत कॉलेजकुमार असावा.
"मुझे भी दो ही मिनीट लगनेवाले है, और मै तेरे पहले से यहा खडा हूं.",माझा आवाज थोडा करडा झाला होता. तसा मी भांडणाच्या प्रवूत्तीचा नाही.माझ्या आजुबाजुच्या कुणालाही विचारा.
"खालीपिली तकतक क्यु कर रहा है".
"तकतक तु कर रहा है या मै"..मी एव्हाना पुरता गरम झालो होतो. कारण नसताना पुढचा मला डिवचत होता.
"जा नही हटुंगा इधरसे ,जो करना है वो कर"
आतापर्यंत बोलाचालीवर असलेली भांडण आता मारामारीवर येणार हे मी समजुन चूकलो होतो. समोरुन आव्हान मिळालं होतं. मी जर आता मागे हटलो तर मी पळपुटा ठरणार होतो.
"देख मै तुझे प्यार से बोल रहा हूं, लाइन मे मै तेरे से पहले आया हू", मी
"जा..नही पिछे हटता, जो करना है वो कर, तेरे बाप का मॉल है क्या"
त्याने माझा बाप काढला आणि क्षणार्धात माझा हाताची एक सणसणीत त्याच्या कानाखाली पडली. कानाखाली एवढ्या जोरात होती की तो दरवाजावर जाऊन आदळला आणि माझ्या हातालासुद्धा मुंग्या आल्या. त्याच्या डोक्याला दरवाजा लागला असावा. माझा हात लगेच बेल्टकडे गेला. बेल्ट काढणार तेवढ्यात आवाज ए॑कुन आजुबाजुचे चार लोक धावत आले. त्यात एक बाई सुद्धा होती. त्या मुलाला उठायचंसुद्धा समजत नव्हत. एकाने त्याला हात दिला. मला दोन लोकांनी धरलं.
तो मला वाटेल त्या शिव्या देत होता. मला ही जोर आला होता. मला धरलेल्या दोन लोकांना बाजुला सारुन मी त्याला लाथा मारायला सुरुवात केली. एखादी लाथ बसली असेन त्याला. त्याची ही एक लाथ मला बसली. आजुबाजुच्या लोकांमूळे
प्रकरण आवरलं गेलं. त्याने तुला दाखवतो अशी धमकी दिली. मी त्याला उभा कापेन असं प्रत्युत्तर दिलं. आजुबाजुचे लोक काय झालं म्हणुन विचारु लागले. एव्हाना मी थोडा शांत झालो होतो. सगळा रागरंग ओळखुन त्या मुलाने काढता पाय
घेतला. मी ही मग जास्त ताणुन न धरता माझ्या खाली पडलेल्या जीन्स उचलल्या. मुड पुरता खराब झाला होता. जीन्स ट्राय करुन मी ही तिथुन निघालो. आयुष्यात कदाचीत पहिल्यांदाच कुणावरतरी मी हात उचलला असेन.
लहानपणी एकदा माझ्या अंगावर एका पुढ्च्या वर्गातल्या मुलाने( सिनीअर ) शर्टवर शाई उडवली होती. त्याच्यावरुन माझी व त्याची भांडण झाली होती. त्यानंतर एवढ्या वर्षानंतर माझी कुणाशी मारामारी झाली असावी. मी जेव्हा होस्टेलला रहायला होतो तेव्हा माझा एक रुम पार्टनर मुस्लिम होता. एकदा आमची कशावरुन तरी भांडण झाली. त्याने माझं अवसान ओळखुन मला दम टाकला होता.
"साला मी मुसलमान आहे, हड्डी मांस खाउन बडा झालोय. कापाकापी मला नवीन नाही. बघायचय का तुला एकदा."
" तु मुसलमान असशील तर मी ९६ कुळी मराठा आहे. आणि मराठा एवढ्या दिवस काय करत होता हे तुला ही माहितेय. एकतर स्वत: तरी मरेन नाहीतर तुला तरी मारेन." हे उत्तर ए॑कुन नावाचा मुसलमान सुदधा नंतर माझ्याशी जपुनच
वागायला लागला होता.
मी आयुष्यात कधीही कुणाशी आपणहुन भांडण केलेली नाहीत, पण पुढुन जर आव्हान मिळालं तर मात्र माझं रक्त खवळल्याशिवाय रहात नाही हे ही तितकंच खरं.


--------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे आवडीने वाचले गेलेले पोस्ट वाचा.
१. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे
२. ब्राईड-हंट
३. यंदा कर्तव्य आहे ?
४. ए॑का आणि पोट धरुन हसा
--------------------------------------------------------------------------------

-अजय

15 comments:

FAQ said...

Ek number. BHayya asel tar mazyakadun Ajun ek lath ghalat ja Ajun. :)

मनमौजी said...

अरे ला कारे केलच पाहिजे . . .आपण जर माघार घेतली तर त्यांना तो पळपुटेपणा वाटतो. . . तो आयुष्यात परत कधी असा वागणार नाही. .

Ashish said...

best kaam keles tu he...
aani jar punha he ase kahi ghadale tar tujhe uttar hi asech rahu de.. ani jar he sale kon delhi kadche kinvha UP Bihar wale astil tar amchyashi kontya hi shivsena shakhevar yeun madat mag..
maharashtrache pabni kay aste he dakhwu salyana

www.MaharashtraMajha.com

मीनल said...

Jashyas tase!
BTW, tu navin kapade ghetles ki nahi? :)

अपर्णा said...

khara sangu ka shant dokyane wichar karun bagh asa maramari karun aapan nakki kiti prashna sodwau shakato?? mhanaje kadhich bhandu naye ase nahi pan worth aahe ka fakt ek jeans try karayala kunala tari chop dene?? next time wichar kar..ani ho mag tya jeans pasant padlya ka???

Ajay Sonawane said...

@FAQ and मनमौजी: मला मारामारी करणं स्वताला आवडत नाही किंवा तसा मी माणुसच नाही. पण माझी चुकी नसताना जर कुणी माझा बाप काढत असेन तर मात्र मी कसा शांत बसु ? प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! अशीच भेट देत रहा.
-अजय

Ajay Sonawane said...

@Ashish Kulkarni: मदतीचा हात पुढे केल्याबद्दल आभार , तुमची महाराष्ट्र माझा वेबसाईट आवडली. मला माझे काही पोस्ट आणि कविता तुमच्या साईट वर टाकता येतील का ?

Ajay Sonawane said...

@मीनल : अग मुड खराब झाल्यावर कसले कपडे, काहीच न घेता परत आलो.
-अजय

Ajay Sonawane said...

@अपर्णा: अगं सारेच प्रश्न मारामारी करुन सुटणार नाहीत या विचाराचा मी ही आहे. पण म्हणुन हातावर हात ठेवुन पुढच्याची दादागिरी सहन करायची का? त्याने माझा बाप काढल्यावर मी हसुन जर गप्प बसलो असतो तर त्याला अजुनच जोर चढला असता. माझ्या जागेवर तु जरी असती तरी तु त्याला दोन-चार शब्द सुनावले असते. मी फक्त एक कानाच्या खाली लगावली. कानात सांगुन जर एखाद्याला समजत नसेन तर त्याच्या कानाखालीच मारावी लागते. भले सगळे प्रश्न मारामारी करुन सुटत नसतील पण काही प्रश्न सोडविण्यासाठी बाह्या मागे साराव्याच लागतात. भारत भले शांतताप्रिय देश असला तरी बांग्लादेशाचा किंवा काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी त्याला ही हातात शस्त्र घ्यावेच लागले ना ? सगळ्यांनाच प्रेमाची भाषा नाही समजत असं माझं म्हणण आहे. तिथे जर माझी चुक असती तर मी खरंच शांत बसलो असतो. पण माझी चुक नसताना जर मला कुणी डिवचत असेन तर मात्र मी कसा शांत बसु ? तुच सांग.

-अजय

vishal said...

तू जे काही केलेस ते अगदी योग्या आहे मित्रा. तसा मी पण शांत वृत्तीचा आहे पण कोणी आई-बापवर गेला तर मी त्याला सोडत नाही. एकदम साही वाटला वाचून.

Ajay Sonawane said...

विशालः मी बरोबर केलं का चुक याचा मी नंतर नाही विचार केला. त्यावेळेस मला जे बरोबर वाटल तेच मी केलं. आपण शांत लोक आहोत पण कुणी याचा गैरफायदा घेत असेल तर त्याला वठणीवर आणावंच लागत. अशीच भेट आणि प्रतिक्रिया देत रहा.

-अजय

Harshal said...

barobar ahe tu je vaglas te....

chyayla konihi yave ani aavhan dyave...aapli chuk nastana aapan ka mhanoon gappa basave. Ya prasangat kay vataghati karnar hotas tyachyashi shant rahun?

It is all about situation... jashi paristithi tase vagne asave.

Mi nehmi shivaji rajancha vichar karto ( ashya thatur matur goshtit tyana anu naye pan aapan chhoti manse shevti)tyani kase husharine yudh kele, prasangi maghar ghetli... ti sarv vel pahunch.

I hope you got my point :)

asach raqt salsalate rahu de...ashya mirchya zomblyach pahijet anyayaviruddh...tich jivant aslyachi nishani aste... aso...

Ajay Sonawane said...

@harshal : kharach shivaji rajacha itihas vachyahac to kai pustak raddit viknysathi ? rajacha itihas khup prerena deto, pretyke prasangat apan kasa vagava te sangato. mala tyaveles je yogya vatla tech mi kelaa. tujha point mala samjala harshal.
mala nehmi balasaheb thackeray cha ek vakya aathavat..."kaanaat saagun jar ekadhyala samjat nasen tar tyachya khanakhalich mara"

-ajay

Deep said...

hahaha maramaree nanntr tya jeans che kaay zaale? ;)

Ajay Sonawane said...

@दीपः अरे जीन्स नाही घेतल्या नंतर, परत एकदा जाईन पुन्हा जीन्स घ्यायला, धन्यवाद !

-अजय