Saturday, October 10, 2009

'राज'कारण(२)

या ब्लॉग वरचे सर्वात जास्त वेळा पाहिले गेलेले पोस्ट वाचा.
१. ए॑का आणि पोट धरुन हसा
२. ब्राईड-हंट
3. हा एक खरा घडलेला प्रसंग आहे



मी माझ्या 'राज'कारण(१) या भागात सांगितले होतं की यावेळेस महाराष्टाच्या लोकांच्या मनात प्रचंड राग, असंतोष असुनही पुन्हा सोनियांबाईंचं आणि शरदबाबुंच्या काँग्रेसचं सरकार येईन. शिवसेना आणि भाजपा मध्ये त्यानंतर फूट पडेन. मनसे ला ६-७ जागा मिळतील. यापेक्षा जर त्यांना जास्त जागा मिळाल्या तर तो त्यांच्यासाठी बोनस ठरेन असा मा़झा अंदाज आहे. मला स्वतःला शिवसेना-भाजपाचा सरकार आलं तर खुप आनंद होईन आणि तेच आतातरी महाराष्ट्राच्या हिताचं असेन. राजची भुमिका मोठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कदाचीत काँग्रेस आघाडीला जर सरकार बनविण्यासाठी काही आमदारींची गरज असेन तर तो ती पुरी करु शकतो. युती आणि आघाडी दोघांकडे समसमान आमदार असतील तर मात्र राजची थोडी गोची होण्याची शक्यता आहे. कारण मराठीचा मुद्दा जर त्याला पुढे हाकायचा असेन आणि स्वत:च्या पक्ष जर सर्वदुर पोहोचावयाचा असेन तर कॉंगेसचे सरकार त्यासाठी पोषक ठरेन. युतीच सरकार मात्र त्याचे लाड खपवुन घेणार नाही याची त्याला पुरेपुर कल्पना असावी.

आज जरी काँग्रेस मनसे चा पाठींबा घेत नसेन तरी त्यांना उद्या त्यांच्याच पाया पडावं लागेन. राज ठाकरे अगदी पहिल्या दिवसांपासुन विधान करत आहेत की महाराष्ट्रात माझ्याशिवाय कुणाचीही सत्ता येणार नाही. हा राज यांचा ओव्हरकॉन्फीडन्स आहे असं काही़जण म्हणतील पण मला मात्र तसं बिलकुल वाटत नाही. कदाचीत राज ने ही गणित किंवा याचे ठोकताळे अगोदरच मांडलेले असावेत. यात विनाकरण तोटा हा शिवसेना आणि भाजपा चा होणार आहे. गेली १० वर्षे ते सत्तेपासुन दुर असुनही त्यांच्यात मोठी फूट पडलेली नाही. राज ठाकरे आणि नारायण राणे सोडुन कुणीही मोठा नेता शिवसेना सोडुन गेलेला नाही. राज ठाकरेंची शिवसेना सोडण्याची कारणे वेगळी होती. नारायण राण्यांनी शिवसेना सोडल्यामुळे शिवसेनेचे बरेच नुकसान झालेले आहे. शिवसेनेचे लोक हे जरी उघडपणे मान्य करत नसतील तरी ती वस्तुस्थिती आहे. मला उद्धव ठाकरे हे खरंच खुप कष्ठाळु नेते वाटतात आणि ते तसेच आहेत. पण त्यांच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या मात्र येत्या निवडणुकीत उट्टे काढल्याशिवाय राहणार नाही. मराठी आणि अमराठी यांच्यामध्ये सगळ्यात मोठी जर कुणाची अडचण झाली असेन तर ती उद्धवचीच. भाजपाचं मात्र ना नुकसान ना फायदा अशी स्थिती असेन. या ठिकाणी जर मी नितीन गडकरींचा उल्लेख केला नाही तर लेख अपुर्ण राहीन. नितीन गडकरींसारखा एक कष्टाळु आणि हुशार नेत्याचा फायदा महाराष्टाला करुन घेता आला नाही याची खंत आहे.

आज महाराष्ट्रात एक ना अनेक समस्या आहेत. सर्वात मोठा म्हणजे वीज. गेली १० वर्षे महाराष्ट्रात १ मेगावॅट सुद्धा वीज निर्माण झाली नाही ही वस्तुस्थिती आहे. आपल्या शेजारचा गुजरात हा त्याच १० वर्षात विजेबाबतीत जर स्वयंपुर्ण होत असेन तर महाराष्ट्रा का नाही? मी स्वत: माझ्या गावात १२-१४ तास लोडशेडींग अनुभवलेलं आहे. लाज वाटली पाहिजे या काँग्रेस आघाडीला. केंद आणि राज्य दोन्ही ठिकाणी यांच सरकार असुनही यांना काहीच करता आलं नाही. यांचा डोळा फक्त जमीनी, भुखंड हडप करणे आणि पैसे खाणे एवढाच आहे. स्वःताची तुंबडी भरण्याशिवाय यांनी काहीच केलेलं नाही. महागाई प्रचंड वाढलेली आहे. डाळी, साखर सर्व जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडलेले आहेत. कमी दरात रेशन देण्याचं आश्वासन पाळलं गेलेलं नाही. रेशनींग ला मिळणारी डाळ ८ शिट्या केल्याशिवाय कुकर मध्ये शिजत नाही ही महिलांची तक्रार खरी आहे. गाई-म्हशी सुद्धा खाणार नाहीत असा गहु रेशनींगमध्ये दिला जातो. हे मी टाईमपास म्हणुन लिहीत नाही. कालच आयबीएन लोकमत मध्ये हे मी पाहिलंय. एकही पाण्याचा प्रकल्प पुर्ण झाला नाही आणि पवारांच्या हातात जोपर्यंत हे सारं आहे तोपर्यंत तो होणार नाही. शेतकरी दररोज आत्महत्या करतच आहेत. पॅकेज वाटली गेली पण ती किती गरजु लोकांना मिळाली हा खरंच चर्चेचा विषय आहे. शेतकर्यांना २४ तास विज, भरपुर पाणी आणि योग्य मोबदला हवा आहे, पॅकेज कसले वाटताय तुम्ही. आमचे मुख्यमंत्री मात्र हे सगळे प्रश्न सोडवायचे सोडुन झोपा काढतात, जुहु चौपाटी वर छट्पुजा साजरी करायला जातात, ज्या हॉटेल ताज मध्य अतिरेक्यांनी लोकांना अर्धनग्न करुन मारल त्याच ताज मध्ये हे रामगोपाल अणि स्वतःच्या मुलाला घेऊन साईट व्हिजीट करतात, जाहीरनामा मध्ये प्रिंटींग मिस्टेक झाली असेन म्हणुन खे खे हसतात, हाच विलास देशमुख स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी जेवढ्या वेळी दिल्ली ला गेला असेन तेवढ्या वेळेस त्याने विदर्भ-मराठवाड्यात आत्महत्या करणारया शेतकरयाना भेटी दिल्यात का हो ? अजुन असे कितीतरी प्रश्न आहेत. हे प्रश्न मी तुम्हाला विचारत नाहीये, हे प्रश्न तुम्ही स्वतःला एकदा विचारा आणि तुम्हीच ठरवा तुम्हाला काय करायच ते. "कानात सांगुन जर कुणी ए॓कत नसेन तर त्याच्या कानफटातच मारावी लागते..." हीच वेळ आहे ­सरकारच्या कानाखाली मारण्याची. अजुन काय सांगु , बाकी तुम्ही सुज्ञ आहातच !

-अजय

No comments: