Sunday, November 1, 2009

एल्गार - सुरेश भट

सुरेश भटांची ही कविता जेव्हा जेव्हा मी वाचतो तेव्हा एका एका ओळीत मी हरवुन जातो. सुरेश भटांच्या शब्दात किती ता़कद असते ते ही कविता वाचल्यावरच उमगतं.

अद्यापही सुरयाला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही

येथे पिसुन माझे काळीज बैसलों मी
आत्ता भल्याभल्यांचा हातात डाव नाही

हे दुख राजवर्खी...हे दुख मोरपंखी...
जे जन्मजात दुखी त्यांचा निभाव नाही

त्यांना कसे विचारू - कोठे पहाट झाली?
त्यांच्यापल्याड त्यांची कोठेच धाव नाही

जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
गावात सज्जनांच्या आता तनाव नाही

झाले फरार कुठे संतप्त राजबिंडे
कोठेच आसवांचा बाका बनाव नाही

गर्दित गारद्यान्च्या सामील रामशास्त्री
मेल्याविन मडयाला आता उपाव नाही

जावे कुण्या ठिकाणी उद्वस्त पापियांनी?
संतांतही घराच्या राखेस भाव नाही

उचारणार नाही कोणीच शापवाणी...
तैसा रुशिमुनिंचा लेखी ठराव नाही

साद्याच माणसांचा एल्गार येत आहे...
हा थोर गान्डूळाचा भोंदू जमाव नाही !

ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही

एल्गार - सुरेश भट

3 comments:

yog said...

khup chhan watla wachun..

Ajay Sonawane said...

योग,
तु पहिला आहेस या कवितेला प्रतिक्रिया द्यायला. मला खरंच खुप बरं वाटलं, विचार करत होतो की लोकांना कविता आवडत नाही की अजुन काही?
सुरेश भटांबद्दल काय सांगु ? त्यांचे शब्द म्हणजे मोरपिस फिरविल्यासारख वाटतं हेच बघ ना

ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही

वा क्या बात है !

-अजय

Yogesh said...

ही कविता नक्कीच मोरपिस फिरवल्यासारखी नहिय
पहिल्या कडव्यातील धारदार सुरयासारखी घाव करणारी आहे
सारेच हे उमाले आधीच योजलेले... ही अशीच एक कविता