Friday, November 13, 2009

व्यावहारीक

कधीही ट्रॅफीक चे नियम न तोडणारा मी, एकदा माझ्या हातुन चक्क सिग्नल तोडला गेला. सिग्नल तोडल्या तोडल्या मला जाणवलं की लाल दिवा असुनही मी गाडी दामटतोय आणि पोटाची टाकी झेपत नसुनही मामा माझी गाडी थांबविण्यासाठी धापा टाकत माझ्या दिशेने पळत येतोय. सगळेच मामा हे टरटरुन फुगल्यासारखे असतात आणि त्यांच्या पोटाच्या आकारावरुन त्यांची पोलिस 'खात्यात' किती वर्ष सर्व्हिस झाली असावी याचा अंदाज बांधणं अवघड नाही. मामा धावत धावत आले आणि मोठं सावज सापडल्यासारखं त्यांनी माझी गाडी थांबवली. रस्त्याच्या मधोमध मी, माझी गाडी आणि मामा असे तिघेचजण. मी चांगलाच हडबडलो.

"ल्ये हुशार बनतोयस काय .." , मामा.

"चुक झाली साहेब.पुन्हा नाही करणार.".. मी,

मामाने माझ्याकडे अगदी तुच्छपणे पाहत गाडीची चावी काढली आणि मोठ्या तोरयात पुन्हा एका झाडाखाली जिकडे तो थांबला होता तिकडे निघुन गेला. गाडीची चावीच घेऊन गेला म्हणजे मला त्याच्यापाठोपाठ जाणं भागच होतं. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे गाडीची अजुन एक चावी आहे. मी चावीच्या बाबतीत थोड विसरभोळा असल्यामुळे नेहमीच एक चावी जवळ बाळगतो. मी लगेच ती चावी काढली, गाडीला लावली, किक मारली आणि छु मंतर. जाता जाता मामाकडे पहायला विसरलो नाही. तो बिचारा हातात पावती पुस्तक काढुन माझ्या येण्याची वाट पहात होता. डुप्लीकेट चावी बनवायला १५ रु खर्च येतो, मामाने मला कमीत कमी १०० रु ला तरी कापलं असतं.

बिचारा मामा ...!!!

त्या दिवशी मालकंस वर मामाची पोस्ट वाचुन मला हा किस्सा आठवला.

- (व्यावहारीक) अजय

--------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे आवडीने वाचले गेलेले पोस्ट वाचा.
१. यंदा कर्तव्य आहे ?
२. ब्राईड-हंट
३. ए॑का आणि पोट धरुन हसा
--------------------------------------------------------------------------------

13 comments:

सचिन उथळे-पाटील said...

हा हा हा.....
मामा ला मामा बनवल.

रोहिणी said...

हा हा हा हा.... मस्त रे...त्या बिचार्‍या मामाचा चेहरा बघण्यासारखा झाला असेल :)...

सिद्धार्थ said...

हा हा... बिचारा मामा!!! मला दया येते आहे मामाची. तुमच्यासारखे (व्यावहारिक) लोक चुका करून दंड न भरता पळून जातात आणि मग बिचारे मामा कोटा पुरा करण्यासाठी चुक न केलेल्या (अव्यावहारिक) लोकांकडून दंड वसूल करतात.

छोटा डॉन said...

हा हा हा, एकदम मस्त किस्सा !
डबल किल्लीची ही आयडिया कधी डोक्यात आलीच नाही राव.

- छोटा डॊन

Photographer Pappu!!! said...

he he sollid.. Nice idea. Thats what they do. I too will keep a duplicate key with me :)

Ajay Sonawane said...

@सचिनः मी जर मामाच्या हातात सापडलो असतो तर मामाने मला 'मामा' बनवलं असतं, त्याच्याअगोदर मीच त्याला मामा बनवलं.
अशीच भेट देत रहा.

-अजय

Ajay Sonawane said...

@रोहिणी: त्याचा चेहरा तर नाही त्यावेळेस नीट दिसला , नीटसं आठवत नाही, बरेच दिवस झाले या प्रसंगाला. पण घरी जाऊन त्याने माझा नक्कीच उद्धार केला असणार हे निश्चीत !

-अजय

Ajay Sonawane said...

@सिद्धार्थ : आजकाल मामाच्या हातात म्हणे दंडुक असतं, मागे एक पुण्यात भयंकर किस्सा घडला होता त्यामुळे सर्व मामा लोकांना ते दंडुक वापरण्याचाही अधिकार दिला आहे. त्यामुळे आता तसं पळुन जायला लागलो तर ते दंडुक फेकायलाही मामा मागेपुढे पाहणार नाही. त्यामूळे मी ही आजकाल काही आघावपणा करत नाही. अशीच भेट देत रहा.

-अजय

Ajay Sonawane said...

@ छोटा डॊन : डबल किल्ली ठेवा पण फक्त गाडीचीच नको. बर्याच वेळा गाडीच्या किल्ली बरोबर घराची सुद्धा असते. त्यामुळे त्या सेट मध्ये ज्या किल्ल्या असतील त्याची एक डुप्लीकेट असलेलीच बरी, नाही का ?
अशीच भेट देत रहा आणि प्रतिक्रिया देत रहा.
-अजय

Ajay Sonawane said...

@प्रविणः हो हो जरुर एक किल्ली बाळग तुझ्याजवळ पण भारतात आल्यावरच तुला त्याचा फायदा होईन. :-)

-अजय

Sandhya said...

ha ha ha.. sahi ahe.. changali idea dilis.! pan thode ch divas.. Camera system zalyavar mama chavi ghyayla dhavanarch nahit, direct gharich pochatil tumachya..

Ajay Sonawane said...

@sandhya : idea changali ahe pan dandukapasun savdhan bar ka !

Amey said...

I hope ki tujhya gadicha number tyane note kela nasel.. pan extra killi ani licence chi xerox copy thevana uttam!!!
Mala watta jya policani tula adavla tyachi police khatyat saha mahinyapeksha adhi service zali nasavi.. nahitar tyane adhi tujhyakade licence magitla asta.. Licence chi pan ek copy sobat thevat chal
- Ek fukat salla :)

Amey (Ek Punekar)