Tuesday, November 10, 2009

शिवसैनिक खवळले आणि लगेच निवळले...

आज अबु आझमीने अजुन पुढे जात बाळासाहेबांवर सुद्दा टीका केली. त्याच्या टीकेने बाळासाहेब हे काही लहान बुद्धीचे होणार नाहीत किंवा त्यांच्या ऊंचीवरही काही फरक पडणार नाही. अबु आझमी हा एक साप आहे आणि त्याचं तोंड ठेचल्याशिवाय तो गप्प बसणार नाही. पण प्रश्न असा पडतो की एवढी टीका करुनही शिवसेनेसारखा एके काळी आक्रमक असलेला पक्ष गप्प कसा बसला ? त्यांच्या आमदारांनी अबुला घेराव घातला आणि त्याला समज दिली. अबु हा साबणासारखा आहे; त्याला जे काही करायच आहे ते करतो आणि निसटुन जातो. पण शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या एका दैवताविषयी अगदी घूणास्पद टीका करुन सुद्धा शिवसेनेसारखा पक्ष, त्यांचे नेते हे अबु आझमीला घेराव घालुन सोडुन देतात. शिवसैनिक खवळले आणि लगेच निवळलेही...

--------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे आवडीने वाचले गेलेले पोस्ट वाचा.
१. यंदा कर्तव्य आहे ?
२. ब्राईड-हंट
३. ए॑का आणि पोट धरुन हसा
--------------------------------------------------------------------------------

-अजय

1 comment:

सिद्धार्थ said...

शिवसेनेचे हल्ली काही मनावर घ्यायचे नाही. प्रचाराच्या वेळी त्यांच्या एका सभेची सुरूवात साने गुरुजींच्या कवितेने झाली असे वाचले होते. काय बोलणार? आत्ता सभेची सुरूवात साने गुरुजींच्या कवितेने करण्यास हरकत नाही पण कोणी करावी? तर शिवसेनेने. ह्यातच सगळे आले.