Thursday, January 7, 2010

....

शिकण्याची वूत्ती जर तुमच्यात असेन तर या जगातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला काही ना काही तरी शिकवते. लहान मुलाकडून निरागसता तर आईकडुन माया शिकावी. समुद्राची विशालता तर किनारयाची झेलण्याची ताकद पहावी. मग मला प्रश्न पडतो की एखाद्या मुलीकडून काय शिकावं ? आपल्या मनाचा ठाव समोरच्याला लागू न देणं ही एक कला मुलींकडून शिकली पाहीजे. मनात हो असतानाही तोंडात 'ना','नाही','नको ना' पासुन सुरु झालेली गाडी 'आता नको','कुणी बघेन ना' चा स्टॉप घेत 'इश्य','हम्मम','मी नाही जा' पर्यंत कधी व कशी येते ते पुढच्यालाही समजत नाही. पुढचा मात्र आपला 'मी मैदान मारलं' अशा उत्साहात असतो.

"मी बा़कीच्यांसाठी खुप काही करते पण माझ्यासाठी कुणीच काही करत नाही" हे वाक्य जगातली प्रत्येक स्त्री कधी ना कधी तरी म्हणतेच. 'दुसरयासाठी खुप काही करणं' ही भावनाच मुळी निस्वार्थी असावी, त्यातही जर तुम्ही अपेक्षा ठेवत असाल तर स्वार्थीपणाची सुरुवात तुम्हीच करता. मग दुसरयाने जर तो स्वार्थ थोडाफार जोपासला तर वाईट का वाटायला हवं ?

स्त्री व पुरुषांमधला एक मुख्य फरक म्हणजे म्हणजे स्त्री ही 'मनाने' विचार करते आणि पुरुष हा 'तनाने' विचार करतो. दचकू नका पण हे खरं आहे. या जगातला प्रत्येक नर हा थोडाफार का होईना असाच आहे. कोंबडीला कधी कोंबड्याच्या पाठी पळताना कुणी पाहीलं आहे का? नेहमी आपला कोंबडाच एक पाय ताणून कोंबडीभोवती फेरे मारत असतो. दोघेही भिन्न आहेत म्हणूनच दोघांच्यातलं आकर्षण टिकून आहे.

या जगात समजण्यास अवघड असा कुठला विषय असेन तर तो म्हणजे ' माणूस'. समोरची व्यक्ती एखाद्या क्षणी कशी वागेन याचा उलगडा करणं किंवा अंदाज बांधण हे एक अवघडच काम आहे. त्यात जर ती व्यक्ती स्त्री असेन तर अंदाज बांधण्याची काठीण्य पात़ळी अधीकच वाढते. त्यामुळेच बायकांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेणं प्रत्येक पुरुषाचं स्वप्न असावं.

-अजय

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
. यंदा कर्तव्य आहे ?
. फुंकर
३. मी आणि माझी फिल्लमबाजी
४. मी 'पुरुष' बोलतोय !

---------------------------------------------------------------------------------

12 comments:

Mandar Joshi said...

अग बाई अरेच्च्या !! खरच कि.. !!!
तो सिनेमा आठवला संजय नार्वेकरचा..

अपर्णा said...

अजय कटू असलं तरी एक सत्य तू जाता जाता सांगुन गेलास आणि स्वतः पुरूषवर्गातला असूनही ते म्हणू शकलास याबद्दल खरंच कौतुक...आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्यातच आहे ना?? कधी पुरूषांनीही ’मनाने’ विचार केला की आपसूक कळेल समोरचीच्या मनात काय चाललंय ते....
BTW काही मदत हवी आहे का?? कुणी आहे का तिथं मनातलं ओळखावं असं???

आनंद पत्रे said...

यालाच म्हणतात ’द अग्ली ट्रुथ’ :)

Ajay Sonawane said...

मंदार आणि आनंद : धन्यवाद, अग्ली वगैर आहे की नाही माहीत नाही. माझे विचार लिहीले बस्स !

अपर्णा: ह्म्म तुझं बरोबर आहे. बाय द वे मनातल्या कुणाचं ओळखण्यासारखं आतातरी कुणीच नाही. मदतीबद्दल विचारणा केलीस त्याबद्दल मंडळ आपलं आभारी आहे. :-)

-अजय

आनंद पत्रे said...

तसं "अग्ली" नाही रे...
"द अग्ली ट्रुथ" सिनेमा बद्द्ल म्हणतोय :)
स्त्री मनाने आणि पुरुष तनाने विचार करतात असे तु लिहिलेय ना, म्हणुन हा सिनेमा आठवला...पोस्टर बघ म्हणजे मी काय म्हणतोय ते कळेल :D

Ajay Sonawane said...

ओह..अग्ली ट्रूथ मी पाहीला नाही त्यामुळे तुझ्या बोलण्याचा अर्थ नाही समजला :-)

सिद्धार्थ said...

>> मनात हो असतानाही तोंडात "ना", "नाही"....
>> समजण्यास सगळ्यात अवघड असा कुठला विषय असेल तर तो म्हणजे माणूस.

१००% सहमत.

बाकी पोस्ट नेहमीप्रमाणे वैचारिक. आणि पंत जरा गजालवाडीत पायधुळ झाडून जा की राव.

Ajay Sonawane said...

सिद्धू: सॉरी बॉस तुझ्या गजालवाडीला मी भेट देतो नेहमी पण आता त्याला माझ्या ब्लॉग लिस्ट मध्येच अ‍ॅड करतो. जमलंच तर ऑरकूट मध्ये मला अ‍ॅड कर ना . :-)
-अजय

भानस said...

काय मंडळाच्या मनात काय घोळतयं? आता अपर्णाने विचारलेय आणि तू नाही म्हणालास तेव्हां ... अजय पण मला वाटते पुरूष किंवा स्त्री हा भेदाभेद नसून तू जसे ’ माणूस ’ म्हणालास ना....तेच बरोबर आहे. अगदी जवळच्या आपल्या माणसांच्या मनाचाही थांग लागणे कठिण आहे.
तुझ्या या पोस्टमुळे काही ठिणग्या मात्र पडल्यात. नव वर्षाच्या शुभेच्छा!:)

Ajay Sonawane said...

भाग्यश्रीताई: बरेच दिवसानंतर आलात त्यामुळे स्वागत. माझ्या मनात काहीच चालू नाहीये. फक्त जे वाटतं ते लिहीतो. आता त्यात मुली, स्त्रीयांचा संदर्भ थोडाफार येतोच. तुझं अगदी बरोबर आहे, माणुस हा प्राणीच विचीत्र आहे. मला त्यामुळेच माणसाची आणि त्याच्या तर्हेवाईकपणाचीच भिती वाटते :-)

तन्वी सुद्धा टूरवर गेली होती की काय तुमच्याप्रमाणे ?
-अजय

हेरंब said...

यस. आणि ते स्वप्न कायम अपुरंचं राहतं. इतर बायकांचं सोडा राजे, इथे बायकोच्या मनातलं काळात नाही आम्हाला.. हा हा..

Ajay Sonawane said...

हेरंब : हे बाकी खरं आहे, मला अजुन तो अनुभव नाही पण येईनच लवकर.

-अजय