Monday, January 4, 2010

धन्यवाद

चार गोष्टी चा एवढा प्रभाव आणि तो पण एवढ्या लवकर होईन असं मला वाटलंच नव्हतं पण आज जेव्हा मी माझं इनबॉक्स उघडलं तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. बेधुंद ब्लॉग आवडल्याची कमीत कमी २५-३० इमेल माझ्या इनबॉक्स मध्ये होती. ब्लॉगवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा इमेल लिहीणंच बरयाच जणांनी पसंद केलं. काही लोकांना यंदा कर्तव्य आहे तर काहींना मी आणि माझी फिल्लमबाजी हे लेख आवडले. काहींना फुंकर ने हळवं केलं तर काहींना च्या आयला ने खुप हसवलं. मला असे इमेल अधूनमधून येतच असतात पण गेले दिवसांतले आलेले इमेल पाहता असं दिसून येतंय की मागच्या काही दिवसांत ट्रॅफीक जास्तच वाढलय. इमेल पाठविणारया मध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे ही एक आनंदाची गोष्ट. अशा या मुलींच प्रेम (?) उत्तरोत्तर वाढत जावो हीच अपेक्षा :-). भारताबाहेर राहणारे लोकांचे मराठी ब्लॉगवर जरा जास्त प्रेम आहे एक छोटंसं निरीक्षण. अचानक एवढे मेल पाहून मला खरं तर आनंदच वाटला पण त्यापेक्षा जास्त मी एका जबाबदारीने झुकला गेलो. इथुन पुढे ही असेच लेख/विचार/भावना मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन.

आपल्या प्रतिक्रियांबद्दल खुप खुप धन्यवाद !!!

-अजय

14 comments:

सिद्धार्थ said...
This comment has been removed by the author.
सिद्धार्थ said...

नवीन वर्षातले नवीन सेलेब्रिटी. तुमचा चाहता वर्ग लहान मुलांपासून एकदम तरुण मुलींपर्यंत जाऊन पोहोचला. अहो त्या मेल करतील नाहीतर काय? आपल्या "भावना" तुमच्या पोस्टला कॉमेंट देऊन जगजाहीर करण्याएवढ्या त्या काही "ह्या" नाहीत. :-)

ई-मेल्स वाढली असली तरी आमच्यासारख्या चाहत्यांसाठी ब्लॉगवर लिखाण सुरू ठेवा. लगे रहो लिहते रहो. नूतन वर्षाभिनंदन.

आनंद पत्रे said...

म्या सुद्दा तुमचा पंखा हाय बरका... फिल्लमबाजी लय झ्याक व्हती...लई ग्वाड लिवता ...

pravin said...

Hey Ajay,

Please keep up the good work. Currently, I m in Italy-Rome and I keep half an hour daily to read Marathi Blogs. Unfortunately, there is no Marathi speaking community here, so bloggers like you keep me in touch with Maharashtra.

Looking forward to read lots of new things from you.

Ciao,
Pravin

Anonymous said...

असच बेधुंद लिखाण सुरू राहू दे मित्रा, माझ्या शुभेच्छा

Ajay Sonawane said...

सिद्धार्थः मी आणि सेलिब्रिटी, काहीही काय. मी आपला गरीब बापडा, जमेल तसं लिहीत असतो. प्रतिक्रिया आल्या की लिहायला हुरूप येतो. बाकी तुमच्यासारखे लोक आता जवळचे मित्रच बनले आहेत. माझ्या प्रत्येक पोस्ट ला तू, आनंद , अपर्णा आणि बरेच जण न चुकता रिप्लाय देता. हे प्रेम असेच राहू द्या. येत्या काही दिवसांत कामाच्या व्यापामुळे लिहणं जास्त जमणार नाही तेवढं मात्र सांभाळून घ्या.

-अजय

Ajay Sonawane said...

आनंदा:व्हय रे आनंदा, मेरे बिछडे हुए भैया , समधं ध्यानात हाय माज्या. असच येत जा अधून मधून. :-)

-अजय

Ajay Sonawane said...

प्रविणः तू इटली मध्ये आहेस हे ए॑कूनच मी खुश झालो. मला एकदातरी इटली रोम ला भेट द्यायची आहे. जमल तर फोटो पोस्ट कर किंवा आठवणीने शेअर कर. येत्या काही दिवसांत कामाच्या व्यापामुळे लिहणं जास्त जमणार नाही तेवढं मात्र सांभाळून घ्या.

Ajay Sonawane said...

सुहासः मी जे काही करेन ते अगदी बेधुंद होऊनच. आपल्या शुभेच्छा पाठीशी आहेतच ना !

-अजय

pravin said...

Ajay: Photos tuzya gmail chya id var send karato aahe..!!

हेरंब said...

वा वा.. मुलींचे इमेल्स.. मजा आहे बाबा.. ब्लॉगिंगचे हे सुप्त फायदे (hidden benefits) माहित नव्हते रे ;) .. जोक्स अपार्ट.. असाच मस्त लिहीत रहा..

Ajay Sonawane said...

हेरंब : सुप्त कुठले रे, सगळ्यांशी शेअर केले ना मी हे फायदे. :-)

-अजय

हेरंब said...

अरे हो. पण तू शेअर करेपर्यंत ते आमच्या दृष्टीने सुप्तच होते. आता मला पण ब्लॉग लिहायला हुरूप यायला लागलाय.. हा हा हा .. LOL

Ajay Sonawane said...

हेरंब : मॅरीड लोकांना कितपत फायदा होईन माहीत नाही :-) , बायका मुलांचा उल्लेख ब्लॉग मध्ये टाळा आणि मुलींना खुश करणारी वाक्ये टाका. प्रेमळ सल्ला ! :-)

-अजय