Monday, November 9, 2009

आझमींचे थोबाड रंगवले!

काय चुक काय बरोबर मला त्याच्या खोलात जायचं नाही कारण मी पत्रकार नाही किंवा समीक्षक ही नाही. अबु आझमीच्या भर विधानसभेत कानाखाली मारुन मनसेच्या लोकांनी त्याची खाशी जिरवली आहे. मराठी असो किंवा हिंदी, ती देवनागरीच आहे. मराठीत शप्पथ घेतली असतं तर काही बिघडलं नसतं. प्रश्न मराठीत शपथ घेण्याचा जसा आहे त्यापेक्षा तो मराठी द्वेषाचा आहे. आझमीची गुर्मी पहिल्याच दिवशी उतरवली गेली याचा मला खुप आनंद आहे. भले तुम्ही याला चुक म्हणा किंवा बरोबर म्हणा.

याच्यावर एक मोठा लेख नक्कीच होऊ शकतो, नक्की लिहीन लवकरच.

-अजय

13 comments:

सचिन उथळे-पाटील said...

मला पण खुप खुप खुप आनंद झाला.
बाकि ,झाल ते बरोबर की चुक ते काहि माहित नाहि?

Smit Gade said...

kadachit vidhansabhet asa karana dokyala patat nahi..pan MNS ne apala shabda parat palala...

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

मनसे आपला शब्द नेहमीच पाळते. फक्त इतकंच म्हणायचं आहे की राज हा चांगला नेता आहे. त्याने प्रत्येक पाऊल उचलताना विचार करायला हवा. ही त्याची शेवटची संधी ठरू नये असं मनापासून वाटतंय. पण मला सुद्धा आनंद झाला हं!

Ajay Sonawane said...

हो मनसे आपला शब्द पाळत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शिवसेनेची प्रतिक्रिया नेहमीसारखीच होती की मराठी हा आमचाच मुद्द्द आहे वगैरे वगैरे... राजची ही सुरुवात आहे, अजुन त्याला बराच प्रवास करायचा आहे आणि तो तेवढाच जबाबदार आहे. मला हेच समजत नाही हिंदी किंवा मराठी देवनागरीच आहेत ना म्हणजे वाचताना हिंदीतला माणुस ही मराठी वाचु शकतो त्यासाठी 'मी मराठी शिकत आहे' वगैरे सबब कशासाठी. मराठी द्वेष हे आझमीचं पुर्वीपासुनच धोरण आहे. धन्यवाद !

Mahendra Kulkarni said...

.दोन कानाखाली वाजवणे एवढंच कार्य करायचं आहे कां? बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. तेंव्हा कुठे ? केंव्हा? कधी ? या गोष्टीची समज ठेवली नाही तर हे आमदार विधानसभेच्या या सेशन साठी सस्पेंड केले जातिल.कदाचित पांच वर्षा साठी पण केले जाउ शकतात. माझा कायद्याचा अभ्यास नाही, पण त्याला थोबाडायची जागा चुकली असे मला वाटते.कमित कमी विधान सभेत तरी करायला नको होतं असं - जस्ट विधान सभेच्या बाहेर केलं असतं तर जास्त बरं झालं असतं..
आनंद मला पण झाला, पण सोबतंच थोडी धास्ती पण आहे..

Unknown said...

अरे तो कसला गुर्मीत वागत होता अबु बरं झालं चोपला त्याला ते!!!!आधि चपलेला हात त्यानीच घातलाय...केवळ डिवचण्यासाठी त्याने हे नाटक केलेय. महेंद्रजींची शंका पटतेय मलापण...पण करणार काय आपले कॉंग्रेसी मराठी आहेत ना त्यांच्या दाढ्या कुरवळायला, ते घेणारच ऍक्शन.....असो पण मजा आली पहाताना!!! पुन्हा मनसे वाल्यांनी प्रकट भुमिका घेतली बाहेरही, हमने कियाच नही वगैरे नाटक नाही. तू झी २४ तास वर पाहिलस का...कसं सगळं जनमत राजच्या विरोधात जाईल याची व्यवस्थित काळजी घेत होते ते!!! स्टार वर चांगले कव्हरेज होते!!!

Ajay Sonawane said...

तन्वी: अबुची गुर्मी अशी एक कानाखाली देऊन उतरणारी नाही, पण त्याला मारला ते योग्यच केलं. चार शब्द सुद्धा मराठीत बोलयचे नाही हाच याचा उद्देश. मला उगाच सहिष्णुतेचा झेंडा फडकवित फिरायच नाही. राज त्याच्या मुद्दावर ठाम राहणार हे नक्कीच राजची मुलाकात पहायला मजा येईन झी २४ तास जरा अतीच करत होते अबु आझमी काय संत आहे का की त्याच्या बाजुने हे चॅनेलवाले बोलत आहेत तन्वी तुझ्या भाषेत याच्या एखादी पोस्ट वाचायला मजा येईन

-अजय

भानस said...

एकदम सही जाळ काढला रे.हे मला कळले त्या क्षणाला एकदम मस्त वाटले. परंतु महेंद्र म्हणतो तसेच....एवढेच का आपल्याला करायचे आहे?एखाद्या जाहीर सभेत केले असते तर अजूनच जिरली असती.निदान विधानसभेत तरी नको होते करायला.संस्पेंड तरी झाले नसते.हे तेरा जण विधानसभेत असण्याची गरज आहे ना? ते काही आशादायक कामगिरी करतील म्हणून तर मराठी माणसाने त्यांना निवडून दिलेय ना. मनसे चे बोले तैसा चाले हे वागणे चांगले असले तरी आता आपण जनतेच्या हितासाठी काम करायचा बिडा उचलला आहे हेही लक्षात ठेवायला शिकायला हवे. नाहितर उरलेले नऊही कसे पटापट संस्पेंड होतील याची सोय हे अबु व त्याच्यासारखे घुसखोर करतील.बाकी एकदम सही होती चपराक. त्या मस्तवाल अबुलाही किती मस्ती.....बरे झाले.

Ajay Sonawane said...

@महेंद्र : मी काल तुमच्या कमेन्ट मुद्दामहुन उत्तर दिलं नाही कारण मला कालचा आणि आजच्या दिवसात काय काय घडतय हे पहायचं होतं. तुमचा ही या विषयावरचा लेख वाचला आणि तुम्ही जे काल बोललात ते मला आज पटलं. मारल ते चांगल केलं पण जागा चुकली. नुकसान कुणाच झाल आणि फायदा कुणाचा तो येणारा काळच सांगेन पण एवढं मात्र आता मला जाणवु लागलंय की मनसेची दुसरी फळी याबाबत थोडीफार ढोंगी वाटते मला राज ठाकरेंबद्द्ल अजुन तसं काही वाटत नाही मी त्यांचा निस्सीम चाहता आहे पण मनात आजकाल काही शंकाही येऊ लागल्यात डोंबिबली बंद पुकारण्याचं काय कारण होत ही त्यातलीच एक शंका

Ajay Sonawane said...

@भाग्यश्री: मनसे बोले तैसा चाले हे नेहमीच करत आलेले आहेत, त्यांचे संख्याबळ आता विधानसभेत कमी झालं आहे त्यांमुळे त्याचा नक्कीच परिणाम होईन पण बघु काय होत ते आता विधानसभेत, महेंद्रकाकांचा लेख छान आहे काल लिहिलेला

-अजय

HAREKRISHNAJI said...

same feelings

Unknown said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

watevr it was wrong or right but hats off for their guts.....