Monday, October 5, 2009

'राज'कारण (१)

"तुम्ही जर लाठ्या-काठ्यांची भाषा केली तर हा राज ठाकरे संपुर्ण महाराष्ट्रभर तलवार वाटपाचा कार्यक्रम हातात घेईन. तीन-साडेतीन हजार मैलावरुन इथे येउन ही भाषा नाही करायची" असं अबु आझमीला त्याच्याच भाषेत सांगणारा ठणकावुन सांगणारा, "उत्तर प्रदेशात जो उत्तर प्रदेश दिन साजरा होत नाही तो महाराष्ट्रात साजरा होतो, महाराष्ट्रात इथुन पुढे फक्त महाराष्ट्रदिनच साजरा होईन, बाकीचे कुठलेही दिन साजरे करता येणार नाहीत." असं म्हणुन संपुर्ण देशातल्या, विशेषता भैया लोकांचा राग ओढवुन घेणारा, "शांत बसतो म्हणुन काय गांडोंची अवलाद समजु नये यांनी..." असं ठाकरी भाषेत प्रत्युतर देणारा, "माझा दुसरया कुठल्याही भाषेबदद्ल राग किंवा द्वेष नाही, फक्त मराठीबद्द्ल हट्ट आहे" असं म्हणुन लोकंच्या काळजाला हात घालणारा, मराठीत पाट्या लावा म्हणून आंदोलन करणारा, आपल्या प्रत्येक विधानावर ठाम असणारा, कधी मिश्कील तर कधी तेवढ्याच आक्रमकपणे आपला मुदुदा समोरच्याला पटवुन देणारा अशी ज्याची ओळख करुन देता येइन तो म्हणजे राज ठाकरे.

Love them or hate them, But you can not ignore them असं पुर्वी मार्क्सवादी पक्षाबाबतीत म्हटलं जायचं, आता हेच वाक्य राजच्या बाबतीत अगदी योग्य वाटतय. आज प्रत्येक वर्तमानपत्रात मनसे किंवा राज ठाकरे बद्द्ल रकाणे च्या रकाणे भरुन येत आहेत. प्रत्येक चॅनेल वरती दररोज त्यांची मुलाखत होत आहे. स्वतःच म्हणण राज आजकाल खुप ठामपणे मांडत आहे. मागच्या लोकसभेच्या वेळेस त्याच्या पक्षाने जी भरभरुन मतं मिळवली त्याचाच परिणाम म्हणुन की काय राज आजकाल खुप कॉन्फीडन्ट दिसत आहे. राज मध्ये एक करीश्मा आहे, तो म्हणजे त्याचं बोलणं, समोरच्यावर छाप पाडणे आणि तरूण-महीला वर्गाला मोहीत करणे. याच्याच बरोबर तो जे मुद्दे मांडत आहे ते लोकांच्या अगदी जिव्हाळ्याचे आहेत. मराठीच्या गळचेपीचा मुददा, महाराष्ट्राची अस्मितेचा मुद्दा, नोकरयांचा मुद्दा म्हणा किंवा अजुन कुठलाही मुद्दा असो...राज तो मुद्दा प्रभावीपणे मांडतो.

राजचा पक्ष यावेळेस किती जागा मिळवेन याच्यापेक्षा तो शिवसेनेचं किती नुकसान करेन यातच लोकांना जास्त रस आहे असं दिसुन येतंय. राज मतं खातोय हे वरकरणी जरी खरं असलं तरी जर नीट विचार केला तर हे जाणवतय की ही वेळ एका transition ची आहे. लोकांना एक नवीन पर्याय मिळु पाह्तोय. लोक राजच्या personality किंवा राजच्या बोलण्यावर भाळुन मतं देतात असं जर कुणी म्हणत असेन तर त्याला मी नक्कीच विरोध करेन. लो़क कदाचीत अशाच एका तरूण तडफदार नेत्यासाठी डोळे लावुन बसले होते. तुम्ही नायक हा सिनेमा पाहिला असेन, त्यात अनिल कपुर एका दिवसात मुख्यमंत्री बनुन जे काही सिस्टीम बदलुन टाकतो ते बघताना आपण टाळ्या वाजवतो. राज बहुतेक त्याच नायकाच्या पावलावर पाउल टाकुन चाललाय असं कुठंतरी नक्की वाटुन जातं.

मला स्वत:ला असं वाटतं की राजला यावेळेस जास्त जागा मिळणार नाहीत, त्यालाही त्याचा अंदाज आहे. पण त्याचीही ही निवडणुक म्हणजे ट्रायल आहे. २०१४ आणि २०१९ हेच त्याचं लक्ष असेन. माझा अंदाज असं सांगतो की राजच्या जास्तीत जास्त ६-७ जागा निवडुन येतील. आघाडी सरकार विरुद्ध लोकांमध्ये खुप राग असुनही सरकार पुन्हा आघाडीचंच येईन. शिवसेना आणि भाजपा मध्ये निवडणुकीनंतर फाटाफूट चालु होईन. याच्यापेक्षा जर जास्त जागा मनसे ला मिळाल्या तर असं समजायला हरकत नाही की अजुन ही महाराष्ट्रातील लोक मुद्यावर मते देतात आणि कदाचीत अशीच मते महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन अध्याय सुरु करतील.

(क्रमशः)

-अजय

5 comments:

हेमंत आठल्ये said...

अगदी बरोबर आहे. पण राजकारणाने काही बदल घडतात. किंवा त्यानेच बदल घडतात. अस समजण चुकीचे आहे. आणि अस असत तर आतापर्यंत बराच काही घडू शकल असतं

Unknown said...

mi thoda asahamat ahe.
raj thakre sahebanbaddal mala pan adar ahe pan tyanchi padhdhat mala awadli nahi.tyanni apli navin survaat maramarinech ka karavi?amitabh bachchan sarkhya shant pan superstarchich ka madat ghyavi?parprantiyanna marunach ka aplimata mandali?parprantiyanchya netyanna ka nahi marle?(akher ya sarva goshti sathi parprantiyaache nete jawabdar ahe)koni chitrapatat mumbai cha bombey karna yala maramarinech uttar ka dyave?nivadnukit maharashtrachi pragati kashi hoil he sodun mi yala ase maren mi yala ase karen asa ka bolave?

yaa sarva prashnanmule aaj raaj sahebanna gundapravrutti chi vyakti ase janta mhanu lagli ahe.
krupaya ya goshtincha vichar karava

Sudarshan said...

very impressive and real fact nice one sir

Amey said...

Amanyaa!!!

Ajay Sonawane said...

अमेय,
मला माहितेय की राज ची पद्धत किंवा त्याचा अजेंडा तुला आवडत नाही. पण नुसतं अमान्य म्हणुन तु त्याला टाळु शकत नाही. तो काय बोलतो याचा एकदा त्रयस्थ म्हणुन विचार कर, विचारपुर्वक विवेचन कर आणि तुला जे मुद्दे पटले किंवा पटले नाहीत ते समोर आण. अमान्य म्हणुन तु पुढचे दरवाजेच बंद करू नकोस. कानावर
हात ठेवला म्हणुन कुणी बहिरं होत नाही, काही काळापर्यंतच आवाज येत नाही बस एवढच असतं.

ब्लॉग ला अशीच भेट देत रहा ,धन्यवाद !

-अजय