Thursday, July 23, 2009

अगदी ...सहजचं !

गेले दोन-तीन दिवसांपासून डोक्यात विचार चालू होता की ब्लॉग साठी काहीतरी लिहायच. खर तर मी दररोज (?) डायरी लिहण्याचा प्रयत्न करतो, पण ब्लॉग आणि तो पण मराठीत लिहण्याची प्रेरणा मला 'प्राजक्त' नावाच्या एका सुंदर ब्लॉग वरुन मिळाली , धन्यवाद ...'प्राजक्त' च्या लेखिकेला ! :-)
अडचण एकच होती ...मराठीत टाइप करणे...जे खूप वेळखाऊपणाचं काम आहे. मी त्यावर ही उपाय शोधून काढला आहे. डायरीची पानं स्कॅन करून ब्लॉग वर पोस्ट करायची...बघू..सुरूवात तर मोठ्या उत्साहात केली आहे ...उत्साह किती दिवस टिकतो ते पाहू.
आज दिवसभर डोक्यात खुप विचारांची गर्दी झाली होती. खूप कोलाहल माजला होता, वाटलं की जाता जाता सारसबागेतल्या गणपतीचं दर्शन घ्यावं. पाय आपोआप तिकडे वळले. मागच्या वेळेस जेव्हा मी गणपतीला गेलो होतो तेव्हा माझा नवाकोरा नायके चा शूज (खुप महागडा होता हो..उगी उगी) कुणीतरी उचलून नेला. असं म्हणतात की मंदिरात पाद्त्रने जाणं म्हणजे एक कटकट गेली असं होत आणि खरं सांगतो ते मला माझ्याबाबतीत तरी पटलं माझ्यामागची एक कटकट दूर झाली.
गणपतीचं दर्शन घेतलं ...मनं अगदी प्रसन्न झालं. येताना थोडं पावसातही भिजलो. एकाच वेळेस माझ्या मनात कितीतरी विचार चालू असतात. नाना प्रश्न मला सतावत असतात. काही प्रश्नांची उत्तर मिळतात...काही प्रश्न आपोआप सुटले जातात...पण काही प्रश्न मात्र अनूतरित्त राहतात. अनूतरित्त प्रश्न हे अनूतरित्त राहण्यासाठीचं जन्माला आलेले असतात, तुम्ही ते कितीही सोडवायचा प्रयन्त केला तरी ! आपल्या हातात काही नसतं कारण आपल्या दोरया कुणाच्या तरी हातात असतात...तो आपल्याला खेळवित असतो, त्याला कुणी 'परमेश्वर' तर कुणी 'नियती' म्हणतं. मी फक्त एक प्यादा...एकावेळेस एकच घर चालणारा...नाही का ?

6 comments:

Mugdha said...

kharay..:)
-mugdha
www.mugdhajoshi.wordpress.com

Ajay Sonawane said...

Dhanywad mugdha ! Keep visiting !

-Ajay

मीनल said...

पूर्णपणे सहमत!
बाकी डायरीच्या स्कॅन पानांची वाट पाहतो आहोत.

Ajay Sonawane said...

धन्यवाद ! लवकरच पोस्ट करेन.

- अजय

Aparna said...

माझ्या ब्लॉगवर टाकलेल्या तुझ्या टिप्पणीवरुन इकडे..
'प्राजक्त' वरुन प्रेरणा घेऊन तू मराठी ब्लॉग लिहायला सुरु केलास हे वाचून छान वाटल. पण मला अस वाटत की मुळातच लिहीण्याची तुझी इच्छा आणि आवड महत्त्वाची आहे, आणि त्या आवडीला मिळालेला हा एक धक्का(push) आहे. लिहीत रहा. :)

Ajay Sonawane said...

@अपर्णा : प्रत्येक शब्द मराठीतच असला पाहिजे हा तुझा अट्टहास कौतुकास्पद ! जसं प्रातःचलन, आतला कप्पा (Inbox) : हा शब्द तर आता माझा आवडता आणि दररोजच्या बोलण्यातला झाला आहे

टिप्पणीबद्द्ल खुप खुप धन्यवाद !