सरळ रस्त्यापेक्षा वळणावळणाचे रस्ते मला आवडतात,त्यांना माहीत नसते रेघ.अशोक किंवा निलगिरी पेक्षा मला आवडतो तो वड, सगळीकडे उभा आडवा पसरलेला.एका रेषेतच जाणारया सुर्यकिरणांपेक्षा मला आवडतो तो वारा, मन वाटेल ति़कडे पळणारा. सरळ पडणारया पडणारया पावसाच्या थेंबापेक्षा जागा मिळेन तिथे वळणारी, डोंगरावरुन खळखळत वाहणारी नदीच मला जास्त वेड लावते. माझं आयुष्यही मला असंच जगायच. उधळलं तर उधळून द्यायचय, बेभान होऊन जसं ते नेईन तस मला त्याच्याबरोबर जायचंय, अगदी मोकाट, सुसाट, बेधुंद होऊन !
Wednesday, July 29, 2009
एक चारोळी
किती वेळ उभा मी पण तू वळून नाही पाहिलस बहुधा...लक्षात नसेन राहिलं... का...मुद्ददामच नाही ठेवलस ?
चारोळी आवडली तर आपला अभिप्राय जरूर कळवा आणि नवीन चारोळयासाठी प्रोत्साहित करा, नाही आवडली तर पुढच्या चारोळी साठी वाट पहा :-)
No comments:
Post a Comment