"माझ्या ब्लॉगला नुकतंच एक वर्ष पुर्ण झाल्याबद्द्ल ही एक छोटीशी पोस्ट !!!"
-अजय
सरळ रस्त्यापेक्षा वळणावळणाचे रस्ते मला आवडतात,त्यांना माहीत नसते रेघ.अशोक किंवा निलगिरी पेक्षा मला आवडतो तो वड, सगळीकडे उभा आडवा पसरलेला.एका रेषेतच जाणारया सुर्यकिरणांपेक्षा मला आवडतो तो वारा, मन वाटेल ति़कडे पळणारा. सरळ पडणारया पडणारया पावसाच्या थेंबापेक्षा जागा मिळेन तिथे वळणारी, डोंगरावरुन खळखळत वाहणारी नदीच मला जास्त वेड लावते. माझं आयुष्यही मला असंच जगायच. उधळलं तर उधळून द्यायचय, बेभान होऊन जसं ते नेईन तस मला त्याच्याबरोबर जायचंय, अगदी मोकाट, सुसाट, बेधुंद होऊन !
Sunday, August 1, 2010
Friday, July 23, 2010
शुन्य
बरयाच वेळा असं होतं की आभाळ भरुन येतं, सोसाट्याचा वारा सुटतो, विजा कडाडतात, पावसाचे सुरुवातीचे चार थेंब पडतात आणि मातीचा सुगंध दरवळायला लागतो. पण एवढं होऊनही पाऊस मात्र येत नाही. काळे ढग न बरसताच तसेच पुढे निघून जातात. आपण त्या ढगांकडे सुक्या सुक्या नजरेने पहात बसतो. कोरडेच ढग ते, त्यांना ओलावा काय समजणार ? माझंही गेले काही दिवस त्या काळ्या ढगांसारखंच होत होतं. विचार डोक्यात भरून यायचे पण लिहिण्याची उर्मीच येत नव्हती. बरसल्याशिवाय मो़कळेपण नाही आणि बरसायला वातावरण साथ देत नाही. मी दर वेळेस असाच ब्लॉग उघडून न बरसताच निघून जायचो. कधी अगदीच खाली तर कधी थोडे फार शिंपडून. मी पण त्या पावसासारखाच, आला आला म्हणून वाट पहायला लावणारा. दोघेही...कधी सुके सुके आणि कधी बरसून ओले. आज मात्र तो बेभान होऊन बाहेर बरसतोय, काळ्या डांबरी रस्त्यावर उतरून तो नाचतोय, खाच-खळग्यात भरून तो ओसंडून वाहतोय, पानां-फुला-झाडावरती थेंब बनून पसरतोय. समोरचा तो डोंगरमाथा काल उघडाबंब होता, आज मात्र तो स्वताचं हिरवं रुपडं सगळ्यांना दाखवत फिरतोय. त्या पावसाचं पाहून मग मी ही ठरवलं की आपण ही आज असंच मनसोक्त, मनमुरादपणे बरसायचं, मनाच्या तंबोरयाच्या तारांना आज हलकंच छेडायचं, कानाच्या पडद्यांना थोडावेळं बंद करून जे काही सुर निघतील त्यांना अलगदच कागदावर उतरावयचंय, शब्दावाटे पसरायचं आणि एक विचार म्हणून रुजायचं. काल तो कुठेच नव्हता, आज मात्र सगळीकडे तोच तो आहे. माझंही असंच आहे, काल माझं काहीच अस्तित्व नव्हतं, आज सुद्धा अगदी ते नावालाच आहे पण असं जरी असलं तरी उद्याच्या दिवसावर फक्त माझंच नाव कोरायचंय. तळपणारया सुर्याला झेलताना धरणी फाटली तरी पावसाची वाट पाहताना ती कधी थकत नाही, ढग इथे येतात तेव्हा ते कधी हजारो मैलांचा विचार करत नाही, वाहणारी नदी कधी समोरच्या अडथळ्यांना घाबरत नाही, मग मी कशाला कुणाला घाबरू ? आव्हानांशिवाय आयुष्याला मजा नाही हे अगदी खरं. देवापुढे मी जेव्हा डोळे मिटून, हात जोडून उभा राहतो तेव्हा मी कधीच मला गाडी, बंगला, ए॑शोआराम असलं काहीच मागत नाही. माझं नेहमीचं एकच मागणं असतं आणि ते म्हणजे देवा मला दररोज नवनवीन आव्हानं दे. प्रगती जर साधायची असेन तर आव्हानांचा मुकाबला करण्याशिवाय पर्याय नाही. मला बाकी काही नको, तू मला फक्त दररोज एक शुन्य दे, त्यातून पुन्हा सगळं काही उभारायचं काम माझं. देवा, ए॑कतोयस ना तू ?
-अजय
(...डायरीच्या पानांतून)
---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?

Saturday, April 3, 2010
सुख की समाधान
बरेच दिवसानंतर लिहायला बसलो आणि कागद पेन एवढंच काय डोक्यातले विचार सुद्धा अनोळखी असल्यासारखे माझ्याशी वागू लागले. कामाचा ताण, भावनांचा कल्लोळ, खांद्यावरच्या जबाबदारया आणि डोळ्यांमधील स्वप्नं या सगळ्यांचा मेळ घालता घालता मी कधी तरी स्वताला विसरुन जातो आणि देहभान विसरुन छाती फुटेपर्यंत नुसता पळत सुटतो. माणसाच्या गरजा त्या किती, पण तो त्यांचंच जास्त दडपण घेतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या साध्यासुध्या गरजाचं रुपांतर मग ३ बीएचके फ्लॅट, फिरायला एक मोठी कार, आठवड्यातून दोन-तीनदा हॉटेलींग आणि वर्षातून कमीत कमी दोन तीन वेळा कुठेतरी पिकनीक एवढ्या मोठ्या लिस्ट मध्ये होतं. माणूस जेवढया प्रमाणात कमावतो तेवढ्याच प्रमाणात तो त्याचे खर्च ही वाढवत असतो, त्याच्या गरजा ही तशाच वाढत असतात. स्वप्न उराशी बाळगणं, ते पुर्ण करण्यासाठी धडपडणं, जिद्दीने मेहनत करून ते पुर्ण ही करणं यात एक आनंद असतो हे मला माहित आहे. पण कुठेतरी हे सगळं करताना आपण आपल्या आजुबाजुचे लोक, मित्र, सगे सोयरे एवढंच काय आयुष्यातले छोट्छोटे आनंद ही विसरून जातो. कित्येक दिवस झालं मी माझ्या जवळच्या मित्रांना फोन करुन अगदी मनमोकळं बोललो नाही, क्रिकेटची बॅट किंवा बॅडमिंटनचं रॅकेट हातात घेऊन खेळायला गेलो नाही, एखादा सिनेमा, नाटक किंवा गाण्याच्या मैफिलाचा प्रोग्राम पाहिलेला नाही. एवढंच काय कित्येक दिवस मी साधा रस्त्यावरुन स्वताच्याच तंद्रीत अगदी शांतपणे एकेक पाऊल टाकत साधा चाललो पण नाही. मी मिस करतोय... मित्रांबरोबर कट्यावर बसून निवांत मारलेल्या गप्पा, टेरेसवर झोपून मोजलेल्या चांदण्या, विमानांचा आवाज ए॑कून लहानपणी केलेला जल्लोष, रात्र रात्र बसून वाचलेली कादंबरी, आठवड्यात एकदाच लागणारा रविवारचा सिनेमा पाहण्यासाठी केलेली धडपड, गल्लीतलं क्रिकेट आणि चोरलेल्या कैरया, गोट्यांचा डाव आणि शाळेतली भांडणं, डब्यातला आईच्या हातचा मलिदा आणि सायकलीवरचं हुंदडणं, पहिलं प्रेम आणि आयुष्यातली पहिलीच कविता आणि असंच बरंच काही...मी खरंच हरवून बसलोय.माणुस पैसा आनंद मिळविण्यासाठी कमावतो की आनंद गमावण्यासाठी हा प्रश्न मग मला सतावू लागतो. सुख मिळवायचं असेन तर ते भोगायला ही शिकलं पाहिजे आणि ते भोगण्यासाठी समाधानी वूत्ती हवी. सुख आणि समाधान या दोन भिन्न गोष्टी आहे असं माझं ठाम मत. पण तरीही सुखी माणसं समाधानी असतात की समाधानी माणसं सुखी हा मला अजूनही न पेललेला प्रश्न...
-अजय
(...डायरीच्या पानांतून)
---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------
-अजय
(...डायरीच्या पानांतून)
---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------
Monday, March 8, 2010
खरंच का "जय महाराष्ट्र"
या वर्षी महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी वर्षे साजरा करतोय पण खरंच "जय महाराष्ट्र" म्हणण्यासारखा आहे का आपला महाराष्ट्र सद्य स्थितीला ?
१. गेली १५ वर्षे मी 'लोडशेडींग' हा शब्द ए॑कतोय. कित्येक सरकारं आली आणि गेली पण हा इतका महत्त्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी एकाही सरकारने ठोस पावले उचललेली नाहीत. गावामध्ये १५-१५ तास वीज नसते आणि आली तर ती रात्रीची येते. शेतकरी आत्महत्या करेन नाहीतर काय. शेतीला पाणी देण्यासाठी वीज नाही तिथे पाणी असूनही काय फायदा ना. देशाचे उर्जामंत्री हे महाराष्ट्राचेच सुपुत्र आहेत आणि गेली काही वर्षे ते उर्जामंत्री म्हणून काम करत आहेत. राज्य आणि केंद्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार असूनसुद्धा हा प्रश्न गेली १० वर्षे का सुटत नाही. लोकांना अंधारात ठेऊन काम करणारयांची हा प्रश्न सोडविण्याची तळमळ दिसत नाही, तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?
२. माझा शेतकरी बांधव हा कधी सावकाराच्या कर्जाखाली दबून तर कधी गरीबीने कंटाळून तर कधी मुलीच्या लग्नाच्या चिंतेने आत्महत्या करतोय. आपलं स्वताचं कुटुंब चालविण्यापुरताही त्याच्या हातात पैसा येत नाही. आपल्या शेतात पिकल्या गेलेल्या मालाला ठोस बाजारभावच जर मिळाला नाही तर तो पुन्हा पिकविण्याचं धाडस कसा करेन. आपल्या कच्च्या बच्च्यांना साधं दोन वेळचं जेवण देणं त्याला महाग होत चाललंय तर त्यांना बाकींच्यासारखी चांगली चुंगली कपडे, शिक्षण तो कुठुन देईन. महाराष्ट्राचा जाणता राजा असं ज्याला म्हणतात तो देशाचा कूषी मंत्री असूनसुद्धा महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढतच चाललयं आणि तो आकडा काही हजारामध्ये आहे ही शरमेची गोष्ट आहे, तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?
३. धान्यांचे भाव गगणाला भिडत असताना, दररोजच्या जेवणाची लोकांना भ्रांत पडत असताना आपलं सरकार धान्यापासून दारू बनविण्याच्या कारखान्याला परवानगी देऊच कसं शकतं. याउपर त्या कारखान्यांना ( जे यांचेच आहेत !) त्यांना सबसिडी पण आणि ती पण थोडीथोडकी नाही तर काहीं करोडोंमध्ये ? वाह...काय अजब कारभार आहे. लोकांना खायला अन्न नाही म्हणून दारु प्या. दारुपायी लोकांचे घरदार उद्धवस्त होत असताना त्याच दारुवर स्वताची पोळी भाजून घ्यायला लाज कशी वाटत नाही या नालायक लोकांना. ज्या गांधीजीनी दारुमुक्तीचा रस्ता दाखविला त्याच गांधीजीच्या कॉग्रेसमधली धेंड गांधी टोपी आणि खादी घालून लोकांना त्याच दारुच्यानादी लावायची काळी कामं करतात, तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?
४. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा फक्त ए॑कण्यापुरता शब्द राहिलाय आजकाल. झेंडा, शिक्षणाच्या आयचा घो सारख्या चित्रपटांना आणि काही नाटकांना विरोध, एका न्यूज चॅनेल वर हल्ला होणं ही सारी कशाची उदाहरणं आहेत. एखाद्याला आपलं मत मांडण्याचा पुर्ण अधिकार आहे. मिडीया हा लोकशाहीचा एक पाया आहे. मिडीयानेसुद्धा सवंग लोकप्रियतेच्या मागे न धावता स्वताची विश्वासार्हता वाढवावी पण मिडीयावर असे हल्ले होणं हे साहजिकच कुठल्याही लोकशाहीला शोभणारं नाही हे ही तितकंच खरं. असे हल्ले करुन गुन्हेगार इथे मोकाट फिरतात तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?
५. २६/११ च्या मुंबई हल्ल्यावरुन आपण खरंच काय बरं शि़कलो ? त्याच्यानंतरपण आमची यंत्रणा तेवढीच ढिसा़ळ आहे हे पुणे हल्ल्यावरुन दाखवून दिलंय. काल मुंबई, आज पुणे, परवा अजुन कुठलंतरी शहर असं किती दिवस चालणार आहे. लोकांचं जीवन खरंच एवढं स्वस्त झालंय का की कुणीही येउन इथ दहशत पसरवुन जावं. आम्ही दुसरया दिवशी कामाला तेवढ्याच विश्वासाने बाहेर पडतो हे आमचं स्पिरीट नाही तर ती आमची गरज आहे आणि तसेही आम्ही निर्ढावलेले गेलोच आहोत. पोलिसांना लोकांच्या रक्षणापेक्षा नेत्यांचंच रक्षण करावं लागतंय. ज्यांच्याकडे दुसरया महायुद्धाच्या काळातल्या जुनाट बंदुका आहेत ते आपलं संरक्षण काय करणार. पोलिस खातं सक्षम कधी होणार, सागरी सुरक्षा बळकट कशी होणार, इथल्याच फितुर लोकांना कधी पकडलं जाणार, कसाब सारख्या अतिरेक्याला शि़क्षा कधी होणार आणि उद्याचा दिवस मला पहायला मिळेल की नाही या भितीपोटी जगणारयाला विश्वास कोण देणार असल्या प्रश्नांची उत्तर माहीत जरी नसली तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?
६. वय वर्षे दहा पासून ते अगदी इंजीनिअरींग, मेडीकल पर्यंतचे कित्येक विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहेत. उद्याचं भविष्य असलेली ही मुलं अशी आत्महत्या का करत आहेत? एवढा का त्यांच्यावरचा ताण असह्य होत चाललाय? त्यांच्या पाठीवरचं आणि डोक्यावरचं ओझं आपण कधी कमी करणार आहोत. एकाही मंत्र्याला निदान शिक्षणमंत्र्याला तरी याची दखल घेऊन काही करावंस का वाटत नाही? शाळा कॉलेजच्या फी, डोनेशन, शिक्षणातली स्पर्धा, नवीन वाटा याबद्दल खरंच काहीतरी करण्याची गरज आहे. जिथे या लहान मुलांची पण कुणाला दया येणार नसेन आणि त्यांचा जगण्या मरण्याने कुणाला फरक पडणार नसला तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?
७. आमची शहरं ही दिवसेंदिवस बकाल होत चालली आहेत. कुणीही कुठेही जाऊन रहावं तो अधिकार सर्वांचाच आहे तरीही या येणारया लोंढ्यांना आवर कुठेनाकुठे घातला गेलाच पाहिजे. स्थानिक व परप्रांतीय यांमधली दरी ही वाढत चालली आहे याचं मुळ कारण आहे ती स्थानिक लोकांच्या मनामधली असुरक्षितता. त्यासाठी स्थानिकांना प्रत्येक गोष्टींमध्ये प्राधान्य मिळालंच पाहिजे यात गैर ते काय. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कुती, मराठी वा:डमय, मराठी कला यांची जपणूक ही जशी लोकांनी तशीच सरकारनेपण जाणीवपुर्वक केलीच पाहिजे. मराठी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे, ओळख आहे आणि ती शेवटपर्यंत टिकलीच पाहिजे अशा गोष्टींमध्ये मतभेद, मतमतांतर असली तरीही माझा "जय महाराष्ट्र" ?

Monday, February 22, 2010
डायरीतला 'मी'
सुरुवातीला माझं लिखाण माझ्या शंभर पानांच्या डायरीपुरतंच मर्यादित असायचं. त्या डायरीमध्ये माझ्या दिवसभरातल्या घडलेल्या नोंदीपेक्षा मनात उठलेल्या तरंगांचंच प्रतिबिंब जास्त असायचं. आपण स्वतंच रुप जसं आरशासमोर तासनतास उभं राहून न्याहाळतो तसंच मग मी ही कधी वेळ मिळाला तर डायरीची पानं पाठीमागे नेऊन माझ्यातल्या हळव्या अशा 'मी' ला शोधायचो. एखाद्या क्षणी एखादी भावना आपल्यावर मात करते आणि मग आपण आपल्या मेंदूच न ए॑कता त्या भावनेच्या आहारी जाऊन ती सांगेन तशी प्रत्येक गोष्ट करतो. कधी ती भावना प्रेमाची असेन तर कधी रागाची. कधी मित्रत्वाची तर कधी सुडाची. जिथून मनाचा वावर सुरु होतो ना तिथेच मेंदूचं राज्य संपलेलं असतं आणि त्या हद्दीच्या पलीकडे आपण फक्त त्याच्याच तालावर नाचत असतो. मी सुद्धा असाच मेंदू आणि मन दोन्ही असलेला एक सामान्य माणूस. मनाचं आणि मेंदूच द्वंद्व मी सुद्धा बराच वेळा अनुभवलंय. असे अनेक द्वंद्व, अशी अनेक वादळं या डायरीच्या पानामध्येच शांत झाली. माझ्यातल्या घोंघावणारया वादळाला शमविण्याची ताकद या काळ्या पांढरया पानांमध्येच आहे. ऑफीसमधल्या कटकटी, नोकरीमधले चढ-उतार, नात्यामधली गुंतागुंत आणि स्वताची तत्त्व अशा प्रत्येक विषयावर मी या डायरीशी बोललो. कधी कुठल्या ट्रेकमधला थरार तर कधी कुठल्या पिकनीकमधल्या गमतीजमती, शिकलेला नवीन विषय तर फसलेली युक्ती मी माझ्या डायरीशी शेअर केली. तिने माझा रागही सहन केला आणि प्रेमसुद्धा अनुभवलं. थकून भागून घरी परतल्यावर चार ओळी काहीतरी नवीन लिहून नवनिर्मीतीचं वेडही तिनेचं लावलं. आयुष्यात प्रत्येकजणच धडपडतो पण अगतिक झाल्यावर उठून उभं राहण्यासाठी मला पुन्हा उद्दुक्त ही तिनेच केलं. मी तसा थोडा अबोलच, पण माझ्या मुखातुन श्रवणीय बोल बोलण्यास भाग मला या डायरीनेच पाडलं. डायरीने मला सुरुवातीला विचार करायला आणि नंतर मांडलेला विचार स्वतामध्ये रुजवायला शिकवलं. मला घडवलं ते माझ्या आई वडीलांनी आणि त्यांच्या संस्काराने पण मला अंर्तबाह्य बदलवून टाकलं ते फक्त माझ्या डायरीनेच. माझ्यामधल्या अनुभवाला आणि आत्मविश्वासाला जर कशामुळे बळ प्राप्त झालं असेन तर ते फक्त त्या दररोज डायरीमध्ये लिहण्याच्या सवयीमुळेच. या डायरीच्या प्रत्येक पानामध्ये मी कालची ढळलेली संध्याकाळ आणि उद्याची येणारी पहाट पाहतो. दमलेल्या जीवाला औट घटकाभर विश्रांतीसाठी मी या डायरीचाच आधार घेतो. हरवलेल्या अस्तित्वाला जपण्याचं काम मी या डायरीतच करतो. मला या डायरीच्या प्रत्येक पानावर माझं स्वताचं विश्व तयार करत जायचंय, पानाचा कोपरा न कोपरा मला माझ्या अस्तित्वाने भिजवून टाकायचाय म्हणूनच समासंच बंधन मी डायरीत पाळत नाही. जळते ती वात, पण प्रकाश देणारा कोण असं म्हटलं तर नाव मात्र दिव्याचं घेतलं जातं. माझ्या डायरीचंही असंच आहे, उजेड माझा पडला तरी कण कण जळणारी ती माझी डायरीच आहे !
(...डायरीच्या पानांतून)
-अजय
---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------
(...डायरीच्या पानांतून)
-अजय
---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------
Monday, February 8, 2010
परीस की सोनं
आई सोडून सर्वात पहिल्यांदा जर मी कुठल्या स्त्रीकडे स्वताहून आकर्षित झालो असेन तर त्या म्हणजे माझ्या तिसरी इयत्तेतल्या बाई. तेव्हा माझं वय ते काय होतं फक्त ८ वर्षे. ते प्रेम नव्हतच मुळी ते होतं फक्त एक आकर्षण. प्रेम वगैरे समजायचं माझं तेव्हा वय ही नव्हतं. मला मात्र त्या बाई फार आवडायच्या. मला अजून ही आठवतंय त्यांच्या पिरीयडला मी अगदी मन लावून वर्गात बसत असे. त्यांचं एकेनएक वाक्य मी कानात साठवून ठेवत असे. त्यांच्या पुढे मागे करणं, पिरीयड संपल्यावर त्यांच्या मागे मागे जाऊन त्यांना उगाचच प्रश्न विचारण, त्यांनी दिलेला अभ्यास वेळेवर पुर्ण करण, त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी मन लावून करणं असे सगळे प्रकार मी त्यावेळी केले होते. अजुनही, खुप वेळा अगदी डोक्याला ताण देऊनही मला त्यांचा चेहरा आठवत नाही. आठवतं ते त्यांचे मंजुळ बोलणं, त्यांची ती शिकविण्याची पद्धत आणि त्यांचं ते प्रेमानं समजवून सांगणं. म्हणजेच मला त्यांच्या चेहरयाने कधीच भुरळ घातली नव्हती, त्यांच्या वागण्या बोलण्यानेच मला खूप इम्प्रेस केलं होतं. त्यामुळेच 'लव्ह अॅट फस्ट साईट' वर माझा कधीच विश्वास नाही. एका नजरेत जे होतं ते खरंच प्रेम असू शकतं का ? प्रेम निर्माण होण्यासाठी सहवासाची आवश्यकता नसते का ? आकर्षण आणि प्रेम या दोन तरल भावनांना वेगळं करणारी अजून एक अशीच भावना असते आणि तिला 'ओढ लागणे' असं म्हणतात. काही लोक या ओढीलाच प्रेम समजतात. माझ्या मते आकर्षणाचं रुपांतर अगोदर ओढीत आणि मग सहवास लाभल्यावर प्रेमात होतं.
या जगात देवाने सर्वात सुंदर अशी कुठली गोष्ट बनवली असेन तर ती म्हणजे 'स्त्री', 'नारी'. या माझ्या विधानावर समस्त पुरुषमंडळी एकसाथ हात वर करुन मला अनुमोदन देतील यात शंकाच नाही. स्त्री म्हणजे सौंदर्य आणि सौंदर्य म्हणजेच स्त्री असं आतापर्यंतच समाजात रुळलेलं समीकरण. पण एखादी स्त्री जेव्हा तुम्हाला आकर्षित करते तेव्हा तिचं शरीर, तिचा चेहरा यापेक्षा अजून काही गोष्टी तुमच्या मनात नक्कीच घर करून बसतात. माणुस हा समोरच्याचा शरीराबरोबर जगतो की विचारांबरोबर ? समोरच्याचं शरीर त्याला आकूष्ट करतं की त्याची विचारसरणी, त्याचा स्वभाव ? चेहरयाबरोबर जगणारे मला माहीत नाही, मी विचारांबरोबर जगतो. ज्याचे विचार सडलेले आहेत त्याचं शरीर कितीही टवटवीत असला तरी काय फायदा ? कडुलिंब कितीही कडु असला तरी तो गुणकारी असतो, कोकीळ कितीही काळी असली तरी तिचा गोड गळाच लोकांना वेड लावतो, चकाकणारं सोनं प्रत्येकानेच पाहिलय पण परीस कसा दिसतो हे अजून कुणालाच माहित नाही. तरी पण त्याच्या अंगी असलेल्या गुणधर्मामुळेच तो सगळ्या जगात ओळखला जातोच ना. माणसाच्या अंगी असलेल्या कलागुणांमुळेच तो ओळखला जातो, ना की त्याच्या बाहयरुपावरुन. समोरच्याला नीट ओ़ळखायचं असेन तर त्याच्या बाह्यररुपावर जाऊच नये, त्याच्या चेहरयामागचा रंग पहावा. उगाचच संत म्हणून गेले का "का रे भुललासी वरलीया रंगा...". अंगभर घालून मिरवायचं असेन तर सोनं घ्यावं आणि आपलं आयुष्यच बदलून टाकायचं असेल तर परीस जवळ बाळगावा. शेवटी चॉईस तुमची, तुम्हाला काय हवंय परीस की सोनं ?

Tuesday, February 2, 2010
२ फेब्रुवारी
कालपासून पोटात फक्त मोसंबी ज्युस, एक कप कॉफी, नाना तह्रेचे प्रश्न व एक हुरहुर यांचंच वास्तव्य होतं. अजूनही त्या उपवासाचा शेवट झालेला नाही. आजचा दिवस हा बराच संमीश्र भावनांनी भरलेला होता. सकाळी पाच पासून मी अगदी आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कुणा ना कुणाशी बोलत होतो. लोकांना उत्तर द्यायची जबाबदारी नेहमी माझ्यावरच का येते ? मी खुप सारं खरं बोलतो हा माझा गुण की वैगुण्य ? पुरुषाला मन, भावना नसतात असं लोकांना का वाटतं ? मनाच्या कुठल्यातरी कोपरयात दडून बसलेले असले प्रश्न मग माझ्या मनाच्या पूष्ठभागावर येऊन हातात हात घालून नाचायला लागतात. मी ही त्यांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत नाही. काही गोष्टी अनुतरीत्तरच राहिलेल्या चांगल्या, उत्तर शोधायचा प्रयत्न केल्यावरच किंवा सापडल्यावरच जास्त त्रास होतो असा माझा अनुभव. या जगात सर्वात मोठं जर कुठलं दु:ख असेन तर ते अपेक्षाभंगाच हे मी कुठतरी वाचलं होतं. पण त्यापेक्षाही जास्त मोठं दु:ख हे सदभावनेने केलेल्या कामावर, घेतलेल्या निर्णयावर शंका घेतली जावी (वपुंनी म्हटल्याप्रमाणे) हेच आहे असं आज वाटून गेलं. समोरच लोक असे चटकन बदलताना, त्यांचे स्वभाव इतक्या लवकर बदलताना पाहिल्यावर मी विश्वास ठेवलेला तो हाच का असं कुठंतरी वाटू लागतं. मी मात्र समोरच्यावरचा माझा विश्वास मात्र कधीच डळमळीत होऊ दिला नाही. ज्याला जीव लावला त्याला शेवटपर्यंत जीवच लावेन, ज्याच्यावर विश्वास ठेवला तेवढाच विश्वास कायम ठेवेन. म्हणूनच मला पराभूत होण्यापेक्षा हतबल होण्याचीच जास्त भीती वाटते. पराभव जिव्हारी लागतो आणि हतबलता माणसाला निराश करते. पराभव जिव्हारी लागलेला चांगला,माणूस जिंकण्यासाठी पुन्हा तयारीला तरी लागतो. पण हतबलता नैराश्य आणते. आणि आज मी असाच हतबल आहे.
(...डायरीच्या पानांतून)
-अजय
(...डायरीच्या पानांतून)
-अजय
Wednesday, January 27, 2010
संध्या
मला संध्याकाळची वेळ तशी फारशी आवडत नाही. सुर्य अस्ताला जात असतो, पक्ष्यांनी त्यांचे घरट्याचे रस्ते पकडलेले असतात आणि रातकिडेही आपल्या कामाला लागले असतात. सुर्याच्या कलण्याने आसमंतात एक विचीत्र पोकळी निर्माण झालेली असते. दुपारी माती उधळून लावणारा वारा ही आता गपगार होऊन कुठेतरी दूर निघून गेला. चंद्रही आता सुर्य जाण्याची चाहूल घेत आकाशात स्वताच रुप दाखवू लागलाय. अशा वेळेस मी जेव्हा दोन घटका म्हणून उशीवर डोकं टेकवतो तेव्हाच माझ मन शांत होण्याच्याए॑वजी सैरभैर होतं. एक वणवा पेटतो उभ्या मनात आणि जाळायला उठतो मला. ज्या वेळी मी माझ्या मनाला विझवायचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस तो जीव खाऊन मला पेटवायचा प्रयत्न करतो. त्याचा हट्ट मला जाळण्याचा आणि माझा स्वताला जळू न देण्याचा. तो ज्वाला बनून पसरतोय आणि मी पाणी बनून त्याला आवरतोय. त्याचा आणि माझा पाठशिवणीचा खेळ असा दररोज सुरु असतो. कधी तो जिंकतो तर कधी मी. दुसरयाची राख करणं याला तो जिंकणं समजतो आणि जिंकणं म्हणजे राखेतून पुन्हा उभं राहणं असं मी म्हणतो. दोघांच्या व्याख्या वेगळ्या, दोघांचे उद्देशही वेगळे. त्याने त्याचं काम कराव आणि माझं मला करु द्यावं.
खरंच सांगतो, आपलं आयुष्य किती तरी खास आहे. मी तर आपल्या आयुष्याला एक मोठा ५५ वर्षाचा सिनेमाच म्हणतो. कॅरॅक्टर नवनवीन येतच असतात एकापाठोपाठ एक. दररोज काही तरी घडतच असतं. काही आपण चटकन विसरुन जातो तर काही काही मात्र मनात घर करुन बसतं अगदी ढेकळात पावसाचा थेंब रुतुन बसल्यासारखं. हीच ती संध्या ज्या वेळी माझ्या डोळ्यापुढुन माझ्याच आयुष्यातले कित्येक प्रसंग असे अचानकच तरळतात. एक आख्खाच चलचित्र कधीतरी डोळ्यापुढुन झर्रदिशी जातो. त्या मध्ये सगळ्या जपून ठेवलेल्या आठवणीच असतील असं ही काही नाही. काही न जुळलेल्या न पटलेल्या किंवा विसरुन जाण्यासारख्या पण असतात. एकेक क्षण मी जपलेला समोर पाहताना मी पुन्हा भूतकाळात जातो. जे माझं आहे फक्त माझंच असं ते एक छोटंस भावविश्व मी अगदी दोन मिनीटात पुन्हा तयार करतो. जे आयुष्य मी अगोदरच उपभोगलंय त्याची पुन्हा एकदा चव चाखतो. जे हरवलंय ते पुन्हा डुबक्या मारत शोधतो. जे गवसलंय ते पुन्हा एकदा घासुन पाहतो. दुखरे-हळवे असे कोपरे मी दुरुनच बघतो. थोड्याच वेळात मी मग तल्लीन होऊन जातो. माझं या विश्वाहूनही वेगळं असं विश्व आहे हेच मी मुळी तेव्हा विसरतो. माझ्या जगण्याला जो खरा अर्थ मिळतो तो या अशा समांतर जगण्यामुळेच. चालु आयुष्यात, या विश्वात कितीही वणवे पेटले तरी मला त्याची फिकीर नाही कारण माझ्या हाताने सजविलेलं ते विश्व संपूर्ण माझंच आहे, तिथे वणव्याला स्थान नाही आणि विझण्याची मला तमा नाही.

Monday, January 18, 2010
काटकोन
"उठा आता. झोपायला काय वेळ काळ असतो की नाही. पाहूणे येतील आता, निदान त्यांच्यासाठी तरी थोडी आवराआवर कर.", मातोश्री.
डोक्यावरची उशी काढून, तोंड वासून मी आळस दिला आणि गेले ३ तास तोंडात अडकून पडलेल्या सहस्त्र कीटाणूंचा या जगातला प्रवेश निश्चीत केला. डोळे किलकिले करून दिशांचा अंदाज घेतला. झोपण्यापूर्वी माझ्या डाव्या बाजूला असलेली खिडकी आता उजव्या बाजुला कशी आली, अंगावरची चादर खाली का वर सरकली, बेडशीटने गादीची साथ सोडून कडेलोट कसा केला आणि माझी लाडकी बिप्स आजही स्वप्नात कशी नाही आली या नेहमी पडणारया प्रश्राचं ओझं घेऊन मी उशीवरून मान वर केली. समोर आई ब्लॅक अॅड व्हाईट मध्ये आई काहीतरी बोलताना दिसत होती.
"आवराआवर कशासाठी आई. त्यांच्याघरी काय पसारा नसतो का गं. आणि एवढं सारं आवरल्यानंतर परत हे पुर्वीच्या जागेवर ठेवण्यासाठी मला किती त्रास होईन. माझी रुम कशाला कोण पहायला येतंय आणि आले तर आले. आय डोन्ट केअर".
मी माझं सारं काही १५ मिनीटांत आवरून खाली जातो.
"अरे इस्त्री का नाही केला शर्ट ला मागून ? "
"अगं टेकल्यावर तसाही चुरगळतोच ना !"
"आणि पुढूनही का नाही केलास ? "
"इनशर्ट करणार आहे म्हणजे दडला जाणार ना तो भाग :-)"
"आणि हो बाह्या दुमडणार आहे म्हणून बाह्या सुद्धा नाही केल्या आणि पॅन्टची मागची बाजूही नाही केली कारण ती बसल्यावर चुरगळतेच. मला नाही आवडत असं कडक राहणं. मी आहेच असा विस्कटलेला, चुरगळलेला."
असं सगळं कसं पद्धतशीरपणे करणं आपल्याला नाही बुवा जमत. सगळं कसं अगदी नीटनेटकं, कडक, करकरीत, नियमाला धरून. मी भानगडीत नाही पडत असल्या साचेबद्ध जगण्याच्या. आपल्याला तर प्रश्नच पडतो की लोक एवढं सारं साचेबद्ध आयुष्य कसं जगतात. यांचे नियम सुद्धा सुरु होतात अगदी भल्या पहाटेपासुनच, पहाटे ५.५ लाच उठणं, व्यायाम करणं, मग काहीतरी वाचन, मग १० मिनीटांत आंघोळ, मग एक सफरचंद, त्याच्याबरोबर कारल्याचा ज्युस, दोन ब्रेड, त्याला लावलेला बटर-जाम. सगळं कसं काटेकोर, नियमांत बसविल्यासारखं, एकदम शॉलीड अॅक्युरेट. झोप ६ तास, ऑफीस ८ तास, व्यायाम १ तास. रेष आखल्यासारखं लोक आयुष्य जगतात. नाही म्हणजे नाही, मुळीच जमणार नाही मला असलं काही. त्यामुळेच मला भूमिती हा विषयही कधीच नाही आवडला. लाईन या शब्दाला मी मुली वगळता बाकी कुठल्याही प्रांतात आणायचा प्रयत्न नाही केला. पोरींवरही लाईन मारली ती पण आडवी तिडवीच. प्लॅनींग वगैरे करण्याच्या बाबतीत त्या मुळेच मी कच्चा. लग्न केलं तर ते ४.३७ मि, पाहुणे बोलावले तर मोजून ५०० चं, आहेर दिला तर मोजून १०१, हनीमून केला तर तो पण ६ दिवस आणि ७ रात्रच, मुलं जन्माला घातली तर ती पण समान अंतरानेच, नावंही ठेवली तरी एकाच अक्षरावरून किंवा एकाच सुरातली. माझ्या ओळखीच्या एकाच्या मुलींची नावं आहे शर्मिष्ठा,उर्मिष्ठा आणि कनिष्ठा. बरं झालं चौथी नाही झाली नाही तर मंगलाष्ठाकाच होती. मंगलाष्ठाका मध्ये 'ष्टा' नाही तो 'ष्ठा' आहे. 'ष्ठा' चा उच्चार म्हणजे जीभ सरळ पुढे नेऊन, तोंड वासून, 'ष' साठी तोंडातून हवा सोडणं, सगळं कसं एकापाठोपाठ एक. मुलाची जन्मवेळ सुद्धा लोक मिलीसेकंदा मध्ये मोजतात. हा आता डोकं बाहेर आलं..आता एक हात..एक पाय. हा आताच्या ह्या मिलीसेकंदाची वेळ म्हणजे याची जन्मवेळ , सकाळचे ९.१२.३०.२५६. बोललं तर ते पण जीभ टाळ्याला न लागता मोजूनमापूनच बोलणं. त्यात एकदा दोनदाच हसणं, हसणं सुद्धा असं की दाताचं आणि गालावरच्या खळीच दर्शन दुर्मिळ व्हावं. चहा घेतला तर तो पण अर्धा कपच...तो पण कपानेच पिणं. बशी आपली कपाच्या बुडाला लावायला फक्त. जेवलंच तर ते पण कॅलरीज पाहून. जेवणातही अर्धी वाटी भात, १ वाटी डाळ, भाजी आणि २ चपाती, पापड, डाव्या बाजूला लोणचं आणि उजव्या बाजूला मीठ, बाजूला ठेवलेला तांब्या, त्याच्यावर ठेवलेला पेला. जेवताना पापड खाताना आवाज न येण्याची घेतलेली काळजी. अहो एवढंच काय संडासला बसल्यावर सुद्धा 'आवाज' येणार नाही म्हणून सोडलेला फ्लश. मनमोकळेपणाने लोक काहीच का बरं करत नाहीत ? एवढं कसं काय लोक मन मारुन, नियमातच जगतात अगदी काटकोनासारखं, ९० अंशाच्या कोनातच वळणारं !
त्याच्यामुळेच मला सरळ रस्त्यापेक्षा वळणावळणाचे, घाटातले नाहीतर नदीच्याच कडेकडेचे रस्ते आवडतात, त्यांना माहीत नसते रेघ. अशोक किंवा निलगिरी पेक्षा मला आवडतो तो वड, सगळीकडे उभा आडवा पसरलेला आणि पारंब्याने भरलेला. एका रेषेतच जाणारया सुर्यकिरणांपेक्षा मला आवडतो तो वारा, मन वाटेल ति़कडे पळणारा, भिरभरणारा. सरळ पडणारया पडणारया पावसाच्या थेंबापेक्षा जागा मिळेन तिथे वळणारी, डोंगरावरुन खळखळत वाहणारी नदीच मला जास्त वेड लावते.
माझं आयुष्यही मला असंच जगायच. उधळलं तर उधळून द्यायचय, बेभान होऊन जसं ते नेईन तस मला त्याच्याबरोबर जायचंय, अगदी मोकाट, सुसाट, बेधुंद होऊनच !

Monday, January 11, 2010
संवाद म्हणजे...
माणसाचा चेहरा बरयाच वेळेला खुप काही सांगून जातो. कोण म्हणतं की संवाद फक्त बोलूनचं साधता येतो. बोलके डोळे, बोलका चेहरा एवढंच काय स्पर्श ही सारी संवादाचीच तर माध्यमं आहेत. ज्या गोष्टी शब्दांद्वारे पुढच्याला सांगता येत नाहीत त्या चेहरयावाटे कुठेतरी बोलून जातात. चेहरयावरची एखादी सू़क्ष्म छ्टासुद्धा एखाद्याच्या मनातला काय चाललाय हे सांगते. संवाद साधणं ही एक कला आहे असं लोक म्हणतात, मी मात्र याच्याकडे एक अनुभव म्हणूनच पाहतो. आयुष्यभर घेतच रहावा असा अनुभव. प्रभावी संवाद साधणं याला मी कला म्हणेन. नुसतंच भारमभार बोलणं म्हणजे संवाद नाही. आपलं म्हणण दुसरयाच्या मनाला जाऊन थेट भिडणं आणि समोरच्याला अजुन काही ए॑कण्यासाठी आतुर करणं म्हणजे संवाद. संवाद म्हणजे फुलणं, संवाद म्हणजे मोहरणं आणि संवाद म्हणजेच विरघळणं !
मी जेव्हा कधी एखाद्या नवीन व्यक्तीशी बोलतो तेव्हा माझा पहिला प्रयत्न हाच असतो की ते बोलणं म्हणजे एक सहजसुंदर साधलेला संवादच ठरेन. बोलून बोलायचंच आहे तर गोडच बोलावं ना मग. आपलं आयुष्य ते किती इन मिन ५० वर्षे. त्यातली निम्मी तर गेली. मग इथून पुढचा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी एक शेवटचा दिवस आहे असं मानून मी प्रत्येकाशी अगदी मनमो़कळेपणाने बोलण्याचा, थोडक्यात संवाद साधण्याचाच प्रयत्न करतो. एखाद्याच्या मनातलं ओळखणं कुणाला कधीच शक्य नसतं. पण निरीक्षण करुन अंदाज बांधणं सहज शक्य आहे. माझ्याशी बोलायला एखादा जण समोर बसला की मी माझी सारी हत्यारं काढून माझं काम सुरु करतो. समोरच्याचे सगळे हावभाव टिपण्यापासून ते बोलताना त्याच्या शरीराची होणारी हालचाल या सारया गोष्टी मी माझ्या मेंदूत अगदी साठवून ठेवतो. समोरच्याच्या विश्वात मग माझी त्याच्या नकळतच एन्ट्री होते. तो माझ्याशी जेव्हा बोलत असतो तेव्हा मी त्याच्या चेहरयामागच्या चेहरयाशी खेळत असतो. तो चेहराच मला जाणून घ्यायचा असतो. एकाचवेळेस असे कित्येक 'मी' तयार होतात आणि समोरच्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात डोकावत राहतात. संवाद साधताना या सारया गोष्टी कराव्याच असं नाही पण समोरच्या व्यक्तीबद्दल जर तुम्हाला कुतुहल असेन तर तुम्ही हे सारं नकळत करता आणि माझं कुतुहल प्रत्येक चेहरयासाठी जागं होऊन मला हे करायला लावतं.
काल अशाच काही नवीनच भेटत असलेल्या लोकांशी बोलत असताना माझ्या मनात उमटलेल्या तरंगांना कागदावर उमटण्याचा केलेला हा एक प्रयत्न. समोरच्याला व्यक्ती आपल्यात हरवून जाण्यासाठी अगोदर तुम्हाला त्याच्या विश्वात हरवून जावं लागतं. अशा कित्येक व्यकतींमध्ये जेव्हा तुम्ही हरवून जाता, छोट्याशा का होईना पण त्या दोन मिनीटांच्या संभाषणामध्ये जेव्हा तुम्ही त्यांचं आयुष्य जगता तेव्हाच संवाद हा एक अनुभव आहे असं मी का म्हटलो ते समजेन.
(...डायरीच्या पानांतून)
-(निशब्द!) अजय
---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१. च्या आयला
२. फुंकर
३. मी आणि माझी फिल्लमबाजी
४. मी 'पुरुष' बोलतोय !

Thursday, January 7, 2010
....
शिकण्याची वूत्ती जर तुमच्यात असेन तर या जगातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला काही ना काही तरी शिकवते. लहान मुलाकडून निरागसता तर आईकडुन माया शिकावी. समुद्राची विशालता तर किनारयाची झेलण्याची ताकद पहावी. मग मला प्रश्न पडतो की एखाद्या मुलीकडून काय शिकावं ? आपल्या मनाचा ठाव समोरच्याला लागू न देणं ही एक कला मुलींकडून शिकली पाहीजे. मनात हो असतानाही तोंडात 'ना','नाही','नको ना' पासुन सुरु झालेली गाडी 'आता नको','कुणी बघेन ना' चा स्टॉप घेत 'इश्य','हम्मम','मी नाही जा' पर्यंत कधी व कशी येते ते पुढच्यालाही समजत नाही. पुढचा मात्र आपला 'मी मैदान मारलं' अशा उत्साहात असतो.
"मी बा़कीच्यांसाठी खुप काही करते पण माझ्यासाठी कुणीच काही करत नाही" हे वाक्य जगातली प्रत्येक स्त्री कधी ना कधी तरी म्हणतेच. 'दुसरयासाठी खुप काही करणं' ही भावनाच मुळी निस्वार्थी असावी, त्यातही जर तुम्ही अपेक्षा ठेवत असाल तर स्वार्थीपणाची सुरुवात तुम्हीच करता. मग दुसरयाने जर तो स्वार्थ थोडाफार जोपासला तर वाईट का वाटायला हवं ?
स्त्री व पुरुषांमधला एक मुख्य फरक म्हणजे म्हणजे स्त्री ही 'मनाने' विचार करते आणि पुरुष हा 'तनाने' विचार करतो. दचकू नका पण हे खरं आहे. या जगातला प्रत्येक नर हा थोडाफार का होईना असाच आहे. कोंबडीला कधी कोंबड्याच्या पाठी पळताना कुणी पाहीलं आहे का? नेहमी आपला कोंबडाच एक पाय ताणून कोंबडीभोवती फेरे मारत असतो. दोघेही भिन्न आहेत म्हणूनच दोघांच्यातलं आकर्षण टिकून आहे.
या जगात समजण्यास अवघड असा कुठला विषय असेन तर तो म्हणजे ' माणूस'. समोरची व्यक्ती एखाद्या क्षणी कशी वागेन याचा उलगडा करणं किंवा अंदाज बांधण हे एक अवघडच काम आहे. त्यात जर ती व्यक्ती स्त्री असेन तर अंदाज बांधण्याची काठीण्य पात़ळी अधीकच वाढते. त्यामुळेच बायकांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेणं प्रत्येक पुरुषाचं स्वप्न असावं.
-अजय
---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१. यंदा कर्तव्य आहे ?

Tuesday, January 5, 2010
खेळ मांडला
पिंजरा नंतर बरेच दिवसानंतर एक चांगला तमाशाप्रधान सिनेमा पाहिल्याचा आनंद मला झाला जेव्हा मी 'नटरंग' मध्ये न्हाऊन निघालो. कदाचीत हा आतापर्यंत पाहिलेला मी असा एकमेव मराठी सिनेमा आहे जो शेवटच्या सेकंदापर्यंत लोक पहात होते. सिनेमा संपला, सारे जण जायला निघाले आणि तितक्यात समोर 'नटरंग'च गाणं सुरु झालं. गाणं पुढं सरकत गेलं, स्क्रीन वर गणपत पाटील ( ते गणपत पाटीलच असावेत असा माझा अंदाज) आणि त्यांचा जीवनपट उलगडणारे प्रसंग फोटोजच्या रुपात स्क्रीन वर आले. लोक क्षणभर जिथे आहेत तिथेच उभे राहीले. चित्रपटाचा प्रभाव लोकांच्यावर एवढा होता की चित्रपट संपूनही लोक पहात उभे होते. शेवटचं नाव पडलं आणि लोकांनी उत्स्फुर्त टाळ्या वाजवल्या. नटरंग च्या टीमला चित्रपट आवडल्याची याच्याहून मोठी पावती दुसरी कुठली असू शकेल ?
नटरंगाची सुरुवातच जेव्हा 'मला जाऊ द्या ना घरी..आता वाजले की बारा.." या लावणी ने झाली तेव्हाच समजलं की हा कुठल्या वळणावरचा सिनेमा आहे.
" ए.. कशापाई छळता..मागं मागं फिरता..असं काय करता..दाजी ही ला भेटा की येत्या बाजारी..
ए.. सहा ची बी गाडी गेली नवाचीबी गेली आता बाराची गाडी निघाली...
ही ला जाऊ द्या ना घरी ...आता वाजले की बारा.."
ही लावणी एवढी सुंदर रचलेली आहे की ती ए॑कताना मला उगाचच फेटा नसतानासुद्धा फेटा वर उडवायची इच्छा झाली होती. गुणा कागलकर (अतुल कुलकर्णी) जो शरीराने पैलवान पण खरा कलावंत असतो. परिस्थीतीमुळे तो आणि त्याचे सोबती तमाशा काढायचं ठरवतात. तमाशामध्ये बाई हवी म्हणुन नैना नैना कोल्हापुरकरीण ( सोनाली कु. ) ची एंन्ट्री होते. तिच्या एंन्ट्रीच्या डान्सवर 'आयच्यान' मी फिदाच झालो. पण तिची एक अट असते ती म्हणजे तमाशामध्ये नाच्या हवाच. जेव्हा कुणीच नाच्या म्हणून काम करायला तयार होत नाही तेव्हा गुणावर ही जबाबदारी टाकली जाते आणि मग सुरु होतो त्या कलावंताचा संघर्ष. इथुन पुढे या सिनेमाची कथा हळुहळु उलगडत गेली आणि लोक त्यात गुंतत गेले. सिनेमाची दमदार कथा, दिग्दर्शकाची त्याच्यावरची जबरदस्त पकड, गुरु ठाकूर चे संवाद व गाणी, दमदार अभिनय आणि अजय अतुलचं अफलातुन संगीत. अतुल कुलकर्णी ने जी मेहनत घेतली आहे त्याला सांगण्यासाठी माझ्याकडे खरंच शब्द नाहीत. अतुल बरोबरच किशोर शिंदे ही खुप भाव खाऊन जातो. नुसत्या संगीताने हा चित्रपट वेगवान झाला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 'अप्सरा आली' आणि 'नटरंग' ही दोन्ही गाणी जबरदस्त आहेत. 'खेळ मांडला' जेव्हा चालू होतं तेव्हा प्रत्येकाच्याच डोळ्यातुन पाणी येतं.
" करपलं रान देवा जळलं शिवार तरी नाही धीर सांडला...खेळ मांडला
खेळ मांडला....देवा....खेळ मांडला...."
नटरंगाची गाणी गेले काही दिवस मी दररोज ए॑कत आहे पण माझं अजून कान तूप्त झाले नाहीत. पुन्हा पुन्हा ही सारी गाणी ए॑कावीशी वाटतात.
असा हा नटरंगाचा खेळ पुन्हा पुन्हा जाऊन पहावा असाच आहे, काही प्रसंग अगदी डोळ्यांत आयुष्यभरासाठी साठवून ठेवावेत असेच आहेत, कदाचीत म्हणूनच मी तरी या बारी ला पुन्हा एकदा जाणार आहे.

Monday, January 4, 2010
धन्यवाद
चार गोष्टी चा एवढा प्रभाव आणि तो पण एवढ्या लवकर होईन असं मला वाटलंच नव्हतं पण आज जेव्हा मी माझं इनबॉक्स उघडलं तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. बेधुंद ब्लॉग आवडल्याची कमीत कमी २५-३० इमेल माझ्या इनबॉक्स मध्ये होती. ब्लॉगवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा इमेल लिहीणंच बरयाच जणांनी पसंद केलं. काही लोकांना यंदा कर्तव्य आहे तर काहींना मी आणि माझी फिल्लमबाजी हे लेख आवडले. काहींना फुंकर ने हळवं केलं तर काहींना च्या आयला ने खुप हसवलं. मला असे इमेल अधूनमधून येतच असतात पण गेले ४ दिवसांतले आलेले इमेल पाहता असं दिसून येतंय की मागच्या काही दिवसांत ट्रॅफीक जास्तच वाढलय. इमेल पाठविणारया मध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे ही एक आनंदाची गोष्ट. अशा या मुलींच प्रेम (?) उत्तरोत्तर वाढत जावो हीच अपेक्षा :-). भारताबाहेर राहणारे लोकांचे मराठी ब्लॉगवर जरा जास्त प्रेम आहे एक छोटंसं निरीक्षण. अचानक एवढे मेल पाहून मला खरं तर आनंदच वाटला पण त्यापेक्षा जास्त मी एका जबाबदारीने झुकला गेलो. इथुन पुढे ही असेच लेख/विचार/भावना मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन.
आपल्या प्रतिक्रियांबद्दल खुप खुप धन्यवाद !!!

Thursday, December 31, 2009
उलटा प्रवास
काल मुग्धाचं पोस्ट वाचलं आणि क्षणभर मुग्धा आणि तिची आई, ज्यांना मी आयुष्यात कधीच पाहिलं नाही त्यांचं चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं. माझा आत्मा हा थोड्यावेळ माझा राहीलाच नव्हता. तो कधीच उडुन गेला होता. कुणाच्या तरी शरीरात जाऊन तो विराजमान झाला होता. इथे राहिलं होतं ते फक्त माझं शरीर, एक निर्जीव शरीर. त्या निर्जीव शरीरालासुद्धा मुग्धाची तगमग समजत होती. आत्म्याविन पोरकं झालेलं माझं शरीर त्या पोरक्या झालेल्या मनाची स्पंदन झेलत होतं. ती स्पंदन झेलता झेलता त्याचे निर्जीव डोळे कधी भरुन आले समजलंच नाही. तिने लिहिलेल सारे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. ते सारं मीच काही त्यांच्या घरातलाच एखाद्या असल्याप्रमाणे पहात होतो, अनुभवत होतो. माझ्या डोळ्यांपुढे हे सारं घडत आहे असाच भास होत होता. समवेदना म्हणजे काय याचा अनुभव मी घेत होतो. कुणाचं तरी, थोड्यावेळासाठी का होईना मी आयुष्य जगत होतो. ही भावनाच मुळी खुप वेगळी होती. स्वताची दु:ख या शरीराने खुप झेलली पण दुसरयासाठी हे शरीर हळहळताना मी पुन्हा एकदा पहात होतो. "आत्म्याविन पोरकं झालेलं शरीर आणि आईविना पोरक झालेल मुलं यांच्यात फरक तो काय ? " आई म्हणजेच आपला आत्मा, तो नसेन तर हा देह कसा चालणार !
मुग्धाचं पोस्ट वाचुन झालं आणि थरथरत्या हाताने आईला फोन लावला...
"आई, अजय बोलतोय. बरी आहेस ना तू ? तुझं इन्सुलिनचं इंजेक्शन आज घेतलंस का ? "
"घेतलं मी, उद्या जाऊन पुन्हा एकदा शुगर टेस्ट करणार आहे. पण तू असा अचानक का फोन केलास?"
"काही नाही , सहजचं...." , मी,
पुढचं काहीच बोलवलं नाही कारण मी आता तो राहिलो नव्हतो. आईच्या लहानग्या बाळाकडे जाण्याचा उलटा प्रवास माझा केव्हाच सुरु झाला होता...
-अजय
---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१. यंदा कर्तव्य आहे ?
२. फुंकर
३. मी आणि माझी फिल्लमबाजी
४. मी 'पुरुष' बोलतोय !
---------------------------------------------------------------------------------
मुग्धाचं पोस्ट वाचुन झालं आणि थरथरत्या हाताने आईला फोन लावला...
"आई, अजय बोलतोय. बरी आहेस ना तू ? तुझं इन्सुलिनचं इंजेक्शन आज घेतलंस का ? "
"घेतलं मी, उद्या जाऊन पुन्हा एकदा शुगर टेस्ट करणार आहे. पण तू असा अचानक का फोन केलास?"
"काही नाही , सहजचं...." , मी,
पुढचं काहीच बोलवलं नाही कारण मी आता तो राहिलो नव्हतो. आईच्या लहानग्या बाळाकडे जाण्याचा उलटा प्रवास माझा केव्हाच सुरु झाला होता...
-अजय
---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१. यंदा कर्तव्य आहे ?
२. फुंकर
३. मी आणि माझी फिल्लमबाजी
४. मी 'पुरुष' बोलतोय !
---------------------------------------------------------------------------------
Wednesday, December 30, 2009
च्या आयला
'च्या आयला' ही काही शिवी नाही; ते एक एक्सप्रेशन आहे. जसं तुम्ही आई गं, बापरे किंवा आईशप्पथ म्हणता तसंच 'च्या आयला' असं म्हणणं शिवी नसून ते एक एक्सप्रेशनच आहे. आणि समजा बोलता बोलता एखाद्यानेच दिलीच शिवी तर कुठं बिघडलं? मिळमिळीत जेवण असेन तर आपण ठेचा किंवा चटणी मागवतोच ना तसंच शिवीचंही आहे. माझ्या मते तर शिवी हा भाषेचा एक दागिना आहे. होय , 'शिवी भाषेचा एक दागिनाच आहे' हे विधान भल्याभल्यांना भाषातज्ञांना चकीत करु शकतं. भाषेला जर कशाने शोभा येत असेल तर त्यात शिवी सुद्धा येते. कुठलीही भाषा ही शिवीविना अपुरी आहे. जगाच्या पाठीवर अशी एकही भाषा तुम्हाला शोधून सापडणार नाही ज्यात शिवी नाही. शिवी कुठेही लिखीत स्वरुपात नसते म्हणजेच जसं पाककूतीच पुस्तक, योगासनांचं पुस्तक, रांगोळ्याचं पुस्तक असतं तस शिवीचं पुस्तक कुठे असतं का ? नाही, मग तरीही या शिव्या एका जनरेशनकडून दुसरया जनरेशन कडे जातातच ना, त्यापण अगदी जशाच्या तशा. कधीकधी तर त्या अधिकच अॅडव्हान्सही होतात. शिवी हा प्रकार कुठल्याही पुस्तकात लिखीत स्वरुपात नसतानासुद्धा अगदी प्रत्येकाच्या तोंडी रुळतो यातच शिवीचं साधेपण आहे. शिव्या कुणालाही शिकवाव्या लागत नाही एवढ्या त्या सोप्या असतात. लहान मुलाला जर थोडावेळ मुलांच्यात खेळायला सोडल तर तो बाहेर जाऊन एखादा श्लोक शिकण्याअगोदर एखाद्याने दिलेली शिवीच लवकर शिकतो. पाण्यात पडल्यावर जसं पोहायला येतं तसंच मूल बाहेर गेलं तर ते शिवी शिकूनच परत येतं. याचाच अर्थ शिवी शिकण अगदी सोपी गोष्ट आहे. जसंजसं वय वाढतं तसतसं ह्या शिवीमधले कर्ते, क्रियापदं आणि विशेषण बदलतात. वयाबरोबर शिवीमधली धार जर वाढली नाही तर आजुबाजुचे लोकांकडुन टिंगळटवाळी होऊ शकते.
आता तुम्ही म्हणाल मी शिवी शिकलो पण त्याचा उपयोग काय ? अहो शिवी ही मल्टीपरपज असते. कुठल्याही भांडणाची सुरुवात आणि शेवट शिवीशिवाय होऊच शकत नाही. भांडणात समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात जो राग असतो तो साध्या शब्दात व्यक्त करणं एवढं सोपं नसतं, त्यासाठी शिवीसारखंच हत्यारच हातात घ्यावं लागतं. अहो शिव्या जर दिल्या नाहीत तर भांडणं भांडण वाटणार नाहीत. १०० वाक्य सुद्धा भांडणात जो इफेक्ट साधु शकणार नाहीत तो इफेक्ट एका ओळीची शिवी साधते. शिवी जशी रागाने शत्रू ला देतात तसं मित्राला दिली तरी चालते. म्हणजे तुम्ही जर खुप लाडात आलात तर मित्राला प्रेमाने शिवी देऊन संवाद सुरु करु शकता. कोल्हापुर मध्ये हा प्रकार भारी लोकप्रिय आहे. भांडणाच्या आणि प्रेमाच्या शिव्या कधीकधी सारख्या सुद्धा असु शकतात फक्त त्यावेळचं आवाजातलं टोनींग आणि एक्सप्रेशन वेगळे असतात. शिवी देऊन तुम्ही दु:ख, आश्चर्य, प्रेम अशा सारया भावना व्यक्त करु शकता. फक्त समोरच्या व्यक्तीला सुद्धा शिवीमागचा 'तो' अर्थ ज्ञात असावा. शिवीचा अर्थ समजुन घेण्यापेक्षा त्याच्यामागच्या भावना ओळखण अधीक महत्त्वाचं. शिव्या या सर्व वर्गातील आणि वयोगटातील लोक देतात. शिव्या या गावच्या चावडीपासुन ते अगदी विधानभवन, संसदभवन ते फुटबॉल आणि क्रिकेट्च्या मैदानावरही दिल्या जातात. आजकाल शिव्यांचा उपयोग सिनेमामध्येही होऊ लागलेला आहे. आजकाल कुठलाही सिनेमा घ्या त्यात सीन प्रभावी वाटावा म्हणून मुद्दाम शिव्या पेरल्या जातात. गदर मधला सनी देओलचा पाकिस्तानातला सीन असुद्यात किंवा नाना पाटेकराचा अब तक छप्पन असुद्यात, शिवीचा वापर सिनेमामध्ये सर्रासपणे केला जात आहे. एवढंच काय मध्यंतरी मराठीमध्ये मध्ये शिवीवरुन सुरुवात होणारं गाणं सुद्धा मी ए॑कलं होतं. इथुन पुढे जाऊन एखादी शिवी हेच टायटल असलेला सिनेमा आला तर त्यात आश्चर्य वाटु नये. माननीय ठाकरेंसारखे नेतेसुद्धा आपल्या भाषणामध्ये शिव्यांचा वापर करुन लोकांच्या टाळ्या मिळवतात. याच्यामुळेच शिवीकडे सध्या एक प्रभावी माध्यम म्हणून लोक बघायला लागलेत की काय अशी मला शंका येऊ लागली आहे.
शिवीचे तसे अनेक प्रकार आहेत. काही शिव्या ह्या सौम्य प्रकारात मोडल्या जातात तर काही उग्र तर काही अति उग्र. जेव्हा जशी गरज तेव्हा तसा उपयोग. शिव्या मध्ये नेहमी बापाला मध्ये न आणता आईलाच का आणलं जात हे मला माहित नाही. शिव्या देण्याचा सेन्स हा प्रत्येकामध्येच असतो. कोणी मनातल्या मनात शिव्या देतो तर कोणी खुलेआम. कोणी रागात असताना दात ओठ खाऊन शिवी देतो तर कुणी एखाद्याच्या अंगावर धाऊन जात शिवी देतो. शिव्या देणे ही सुद्धा एक कला आहे. उगाचच संदर्भहीन शिव्या देऊन जमत नाही. शिवी दिल्यावर जर अपेक्षित अर्थ साधला गेला नाही तर शिवी देण्याचा काय फायदा ? शिवी देणे ह्या प्रकारामध्ये मुलींपेक्षा मुलेच जास्त वरचढ असतात असं आतापर्यंतच्या अभ्यासावरुन लक्षात येत आहे. मुलीं सुद्धा शिव्या देतात पण त्या मुलांएवढ्या तिखट नसतात. मुलींच्या शिव्या ह्या चिंचा, बोर आणि आवळ्याप्रमाणे आंबट, तुरट आणि काहीवेळेस बेचव असतात. ग्रामिण भागातल्या स्त्रिया मात्र याला अपवाद असतात असं म्हणता येईन. त्यांची शिव्यांमधली जाण भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावणारी असते. दारु पिल्यावर माणसाच्या जिभेवर शिवी अवतरते किंवा त्याला शिवी प्रसन्न होते असंही दिसुन आलेलं आहे. बहुतेक दारुचा अन शिवीचा कुठेतरी, काहीतरी संबंध असावा. काही लोक ही शिवीअॅडीक्ट असतात म्हणजे त्यांचं कुठल्याही वाक्य शिवीविना पुर्ण होत नाही. आजकाल शिवीमध्ये पुढच्याला कामही सांगण्याची प्रथा पडलेली आहे. ही शिवी देण्याची नवीन प्रथा सामान्यता शेतकरी आणि कोळी लोकांकडुन लोकांच्यामध्ये पसरली असावी असा माझा तरी कयास आहे.
इतिहासात डोकावला असता, चाकाचा, विमानाचा किंवा फोन चा शोध कधी लागला हे जसं निश्चीतपणे सांगता येतं तसं शिवीचा शोध नक्की कधी लागला हे सांगता येणं अवघड आहे. पण जेव्हा कुठलीही भाषा विकसीत होत असते तेव्हा त्याच्या अगदी सुरुवातीच्याच टप्याला शिवीचा शोध लागली असण्याची शक्यता आहे. पहिली शिवी कोणी कोणास दिली असावी याच्यावर आपल्या इतिहाससंशोधकांनी संशोधन करणे गरजेचं आहे. शिवीचा विकास कसा झाला, या विकासाला कोणी कसा हातभार लावला, शिव्या कशा पद्धतीने लोकांच्या मध्ये रुळल्या गेल्या आणि त्या तितक्याच लवकर प्रसिद्ध कशा झाल्या ही माहिती लोकांसमोर येणं गरजेची आहे. जसे साहित्यसंमेलन वा कवितांचे संमेलन होतात तसेच शिव्यांचे संमेलन होणं गरजेचे आहे. याच्याहीपुढे जाऊन शिव्यांसाठी खास स्पर्धा भरवल्या जाव्यात. शासन दरबारी शिव्यांची नेहमीच उपेक्षा झाली आहे. त्यामुळे शासनाने शिव्यांच्या आणि पर्यायाने भाषेच्याच विकासासाठी खास लक्ष देणं गरजेचं आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, अशीच विविधता शिव्यांच्या बाबतीतही आपल्याला इथे पहायला मिळते. कोल्हापुरी शिव्या आणि विदर्भातल्या शिव्या यामधला भाव जरी सारखा असला तरी त्यात वापरलेले शब्द, टोनींग किंवा शोधलेले वीक पॉईंट यात भिन्नता आढळते. सरकारने यासाठी लोकांना एक व्यासपीठ देणं गरजेचं आहे जिथे येऊन लोक आपल्या शिव्या एकमेकांशी शेअर करतील आणि आपल्या ज्ञानात भर टाकतील. महाराष्ट्राच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षात महाराष्ट्र शासनाने किमान हे एक तरी लोकोपयोगी काम करुन स्वताला लोकांच्या शिव्यांपासुन वाचवावं एवढीच एक छोटी अपेक्षा.
-अजय
(या वेळेस शिव्यांवर लिहीण्याचं धाडस मी केलेलं आहे. शिवीवर निबंध लिहीतानासुद्धा कुठेही शिवीचा वापर न करण्याची काळजी मी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक वाक्यामध्ये शिवी वा शिव्या हा शब्द आणुन एक वेगळाच परिणाम साधण्याचा प्रयत्नही मी इथे केला आहे.)
---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.चार गोष्टी.
२.उद्धव ठाकरेंना पाठविलेले पत्र, जसेच्या तसे.
३.मी आणि माझी फिल्लमबाजी

Monday, December 28, 2009
चार गोष्टी
१. लग्नाला उभे राहिलेले लोक हे लवकरच एक थट्टेचा विषय बनतात. शेंबुड न पुसता येणारया पोरासोरापासुन ते नव्वद वर्षाच्या आजोबापर्यंत सारयांचा एकच प्रश्न असतो..."काय मग कुठंपर्यंत आलंय लग्नाचं ? यंदा उरकरणार की नाही ? अहो बघुन बघुन असं कसलं स्थळ पाहताय ते तरी सांगा." किंवा "उरकुन टाक आता लवकर, बस्स झालं". लग्नाला उभे राहिलेयापेक्षा जास्त घाई यांनाच असते. अशा लोकांची जमात ही प्रत्येक समाजात आणि सर्व वयोगटात पहायला मिळते.
२. नवरा-बायकोमध्ये संवाद असणं फार गरजेचं असतं. आपला जोडीदार हा आपला सर्वात जवळचा मित्र असावा. त्याच्याशी गप्पा मारणं हे अगदी सहजतेनचं घडलं पाहिजे. त्यासाठी विषय किंवा वेळ शोधावी लागत असेन तर समजावं की कोणीतरी कमी पडतंय. बरेच वेळा नवरा बायको बाहेर जेवायला जातात आणि सुतक पाळल्यासारखं दोघंही शांत बसुन, एकमेकांकडे न पाहता जेवण करत असतात. ज्या टेबलावर चमचेच आवाज करतात अशा टेबल्यावरच्या लोकांची लग्न टिकतील ही पण त्याला यशस्वी झाली असं म्हणायचं का?
३. काही लोकांच्या मते मुल झाल्यावर बायको मधला 'चार्म' संपतो. मला अशा लोकांची खरंच किव येते. मुल झाल्यावर स्त्री कुणाची बायको, मुलगी किंवा बहीण रहात नाही. ती तेव्हा फक्त एका बाळाची 'आई' असते. तिच्या मनात त्यावेळेस फक्त ममत्वाचीच भावना असते. देवानेच स्त्री ला तसं बनवलंय त्याला आपण कोण होतो नावं ठेवणारे ?
४. एकसारखं एखाद्या मुलीकडे पाहण्याने ती मुलगी तुम्हाला पटेन ही खुळी समजूत आहे. खरं तर तिच्याकडे एकदाच पहा, नजरानजर होऊद्यात आणि नजरानजर झाली की तिला एक छोटीशी स्माईल द्या. पुन्हा त्या मुलीकडे बराच वेळ पाहूच नका पण थोडासा अंदाज घ्या की तिचं तुमच्याकडे लक्ष आहे का. आणि मग जाता जाता बराच वेळाने पुन्हा एकदा तिच्याकडे स्माईल देऊन जा. काही काही जण उगाचच लाळ गाळत एकसारखं मुलीकडे पहात असतात. मुलीसुद्धा अशा लोकांना किती भाव देतात त्याच जाणे.
५. ब्लॉग वर एक लेख लिहिण्यापाठीमागे ब्लॉगरची किती मेहनत असते हे एकदा स्वता एखादा लेख मराठीत लिहून पहा. एखादं पुस्तक वाचायचं म्ह्टलं तरी तुम्हाला पैसे देऊन ते पुस्तक विकत घ्यावं लागत. मग एखाद्याच्या ब्लॉगवर जाऊन जेव्हा तुम्ही त्याचे लिखाण फुकट वाचता तेव्हा फक्त 'छान लिहीलयंस' अशी एक प्रतिक्रिया द्यायला काय हरकत आहे ? मराठीचा कैवार घेणारे किंवा स्वताला 'तारणहार' म्हणविणारयांची भाषणं जर तुम्ही तासनतास ए॑कत असाल तर हीच मराठी जगण्यासाठी उत्तमोत्तम लिखाण करुन प्रयत्न करणारयांसाठी तुम्ही साधा एक मिनीट देऊ शकत नाही. एखादा लेख चांगला वाटला तर त्याला प्रोत्साहित करा, फायदा तुमचाच आहे कारण ब्लॉगर अजुन मेहनत घेऊन याहीपेक्षा चांगलं काही देण्याचा प्रयत्न करेन.
६. लोक देवाकडे हवं नको ते सारं मागायला जातात अगदी परीक्षेत चांगले गुण मिळुदेत पासुन मुलगा होऊदेत यापर्यंत सारंच. मी सुद्धा कित्येक वेळा मंदीरात गेलो आहे, दरवेळेस काही मागण्यासाठीच. देव सुद्धा प्रत्येकाच्याच अडचणी ए॑कत असतो. या जगातील प्रत्येक गोष्ट ही त्याच्या मर्जीप्रमाणेच चालली आहे याच्यावर माझा ठाम विश्वास. पण एखादी गोष्ट जशी आपण मागायला मंदीरात जातो त्याप्रमाणे ती गोष्ट मिळाल्यावरसुद्धा मंदीरात जावं आणि त्या विश्वविनायकाचे आभार मानावे. प्रयत्न आपले जरी असले तरी त्याला कुणाच्यातरी आशिर्वादाची गरज असतेच ना ! उगाचच का आपण आई-वडीलांच्या नतमस्तक होतो?
७. मागच्या आठवड्यात मी बिग बझार मध्ये गेलो होतो. तेथे घडलेला खराखुरा प्रसंग. मी तिथे खाण्यापिण्याच्या वस्तु घेत असताना एक मुलगा आला आणि म्हणाला की तुम्ही बेधुंद ब्लॉगवाले ना ? मला थोडंस आश्चर्य वाटलं पण थोड्याफार गप्पा मारुन मी तिथुन निघालो. देसाई आंबवाले किंवा चितळे बंधू मिठाईवालेसारखं 'अजय सोनवणे ब्लॉगवाले' असं आता नाव लावावं लागेन बहुतेक मला. ब्लॉगवालेच्या ए॑वजी ब्लॉगवाला असं मुस्लीम नावही आवडेन.:-)
-अजय
---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.उद्धव ठाकरेंना पाठविलेले पत्र, जसेच्या तसे.
२.मी आणि माझी फिल्लमबाजी
३. यंदा कर्तव्य आहे ?

Thursday, December 24, 2009
'शिवाजी' म्हणजे काय ?
'शिवाजी' म्हणजे काय हे समजावून घ्यायच असेन तर ही ५ मिनिटांची क्लिप जरुर ए॑का. ( शिवाजी महाराज न म्हणता शिवाजी म्हटल्याबद्दल क्षमस्व. पण तिथे शिवाजी असंच म्हणायच आहे. )
बोला शिवाजी महाराज की जय !
वि.सु : इथुन पुढे मी माझ्या ब्लॉगवरुन कुठल्याही प्रकारच्या ऑडीओ फाईल्स शेअर करणार नाही. या ब्लॉग वरुन मी फक्त माझे अनुभव, विचार, भावना आणि लेखच प्रसिद्ध करेन असं ठरवलं आहे.
-अजय
---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.मी आणि माझी फिल्लमबाजी
२.फुंकर
३.मी 'पुरुष' बोलतोय !
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------
बोला शिवाजी महाराज की जय !
|

उद्धव ठाकरेंना पाठविलेले पत्र, जसेच्या तसे.
उद्धवजी,
माझं नाव अजय सोनवणे, वय २७, मुळचा पुण्याचा. पुण्यातच एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो. काही दिवसांपुर्वी माझी कार मी एका शोरुम मध्ये सर्व्हींसींग साठी दिली असताना त्यांच्या हातुन ती ठोकली गेली व त्याची भरपाई न मिळता त्यांच्याकडुन उलट मला बरेच दिवस मनस्तापच भोगावा लागला. बरेच प्रयत्न करुनही त्या शोरुमचा मालक, जो एक उत्तर भारतीय आहे त्याच्याकडुन काहीच भरपाई न मिळाल्याने शेवटचा पर्याय म्हणुन मी शिवसेनेची मदत घेण्याचं ठरवलं. शिवसेनेच्या कॉल सेंटर ला फोन लावला आणि तक्रार नोंदविली. या तक्रारीचं काय होईल अशी मनात शंका होतीच. आतापर्यंत राजकिय पक्षांचा अनुभव तसा फारसा काही चांगला नव्हताच आणि राजकीय पक्ष एका सामान्य व्यक्तीची तक्रार किती गांभीर्याने घेतील असा सवाल होता. पण शिवसेनेच्या कॉल सेंटर ने मला तातडीने नगरसेवक सागर माळकरांचा फोन नंबर दिला आणि तिथुनच सगळी चक्र पटापटा फिरू लागली. एक नगरसेवक, ज्यांचा नी माझा कधीही काही संबंध आला नव्हता, ना मी त्यांच्या मतदारसंघातला मतदारही नव्हतो, तरीही त्यांनी अत्यंत जबाबदारीने आणि कुशलतेने हे प्रकरण हाताळलं आणि मला योग्य तो न्याय मिळवुन दिला. भरपाई आणि त्याचबरोबर माझी गाडी ही मला मिळवुन दिली. एका सामान्य व्यक्तीसाठी एक नगरसेवक स्वत:चा वेळ आणि पैसा खर्च करुन एवढं काही करतो याच्यावर खरंच विश्वास बसत नव्हता. लोकशाहीमध्ये लोकांसाठी लोकप्रतिनिधीं असतो हे मला आज पहायला मिळालं.
ज्या पद्धतीने शिवसेनेच्या कॉल सेंटरच्या लोकांनी आणि नगरसेवक सागर माळकरांनी हे प्रकरण शेवटपर्यंत लावुन धरत मार्गी लावलं त्याला तोड नाही. शिवसेनेच्या कॉल सेंटरच्या लोकांनी दररोज मला स्वताहुन फोन करुन हा प्रश्न सोडविण्यासाठी मोठी भूमिका बजावली. असा अनुभव मला कदाचित पहिल्यांदाच येत होता. सत्तेत नसताना एखादा पक्ष सामान्य लोकांची एवढी कामे करत असेन तर सत्तेत आल्यावर काय करु शकेन याचा आता लोकांनाही विचार करावा. माझ्या ब्लॉगच्या माध्यमातुन मी लोकांपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवेन.
या कॉल सेंटरमागच्या कल्पनेला, सगळ्या अॅडमीनीस्ट्रेशनला, लो़कांची कामं करण्याच्या तुमच्या भावनेला आणि सागर माळकरांसारकख्या लोकप्रतिनिधींना माझा सलाम.
उद्धवजी, शिवसेनेचा भगवा तुमच्या हातुन असाच फडकत राहो. या कामी आमची तुम्हाला सदैव साथ राहीनच. आता तरी माझ्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा !
आपण या इ-मेल ला रिप्लाय देऊन मला याची पोचपावती द्यावी ही विनंती.
जय महाराष्ट्र !
-अजय सोनवणे
+९१-९८९०३०००४७

Wednesday, December 23, 2009
टॅग...
अपर्णा ने टॅग केलं म्हणुन हा सारा खटाटोप ...
1.Where is your cell phone?
कालपासुन बंद पडलाय. या सेल फोनने माझे आतापर्यंत ७ चार्जर बंद पाडलेत. आजचा ८ वा ही चार्जर बंद पाडलाय पा पठ्याने. पण मी ही काही कमी नाही. आज जाउन मी नववा चार्जर जाऊन आणणार पण फोन नाही बदलणार.
2.Your hair?
एकदम मोकळे मोकळे वाटतायत आज, आज जेलफिल नाही लावणार.
3.Your mother?
खुप प्रेमळ
4.Your father?
संत एकनाथासारखे शांत
5.Your favorite food?
वरण भात वरुन तुप, फीश, प्रांझ, महाराष्टीयन काहीही द्या !
6.Your dream last night?
मी माझ्या ड्रीम गर्ल बरोबर एखाद्या जंगल सफारीवर
7.Your favorite drink?
कॉफी
8.Your dream/goal?
एकदा तरी आयुष्यात केनियाची सफारी आणि इटलीला भेट
9.What room are you in?
बेड रुम
10.Your hobby?
चित्रपट पाहणे
11.Your fear?
मला एक भयानक स्वप्न नेहमी पडतं त्याचीच भीती वाटते.
12.Where do you want to be in 6 years?
जमिनीवरच...
13.Where were you last night?
घरीच
14.Something that you aren’t diplomatic?
जवळचे लोक
15.Muffins?
खुप
16.Wish list item?
कॅटरीना कैफ, आयेशा टाकीया ( दोघी भारी आहेत राव :-) )
17.Where did you grow up?
मुंबई (दादर) , भोर
18.Last thing you did?
आंघोळ
19.What are you wearing?
फॉर्मल ड्रेस
20.Your TV?
बातम्या शिवाय नाही पहात मी
21.Your pets?
काहीच नाही.
22.Friends
खुप, एकदम जवळचे मोजकेच
23.Your life?
इनज्याईंग
24.Your mood?
आज थोडा उदास आहे, मीटींग आहे ऑफीसात ना
25.Missing someone?
हो ( विचारलं नाही म्हणुन नाव सांगत नाही :-) )
26.Vehicle?
टू व्हिलर
27.Something you’re not wearing?
शुज
28.Your favorite store?
फिश करी जो चांगला देईन ते
Your favorite color?
जांभळा
29.When was the last time you laughed?
आज सकाळीच, एक सिनेमा पहात होतो
30.Last time you cried?
५ महिन्यापुर्वी, खुप कठीण काळ होता माझ्यासाठी तो. अंगावर पांघरून घेऊन खुप खुप रडलो, आयुष्यात पहिल्यांदाच एवढा रडलो असेन.
31.Your best friend?
लॅपटॉप
32.One place that you go to over and over?
टॉयलेट :-)
33.One person who emails me regularly?
कूणीच नाही तसं, मला फॉरवर्ड ईमेल आणि ब्लोग प्रतिक्रिया सोडुन काहीच ईमेल येत नाहीत :-(
34.Favorite place to eat?
पूण्यातल एक महाराष्टीयन थाळी देणारं
अगदी विक्रमी वेळात आजची ही पोस्ट लिहली. मजा आली पण.
मी मिनल, रोहीणी , भाग्यश्री ताईंना टॅग करतोय.

Monday, December 21, 2009
मी आणि माझी फिल्लमबाजी
फार पाठीमागे नाही अगदी २० वर्षापुर्वी गोष्ट. तेव्हा आमच्या घरी एक क्राऊन चा जुना ब्लॅक अॅड व्हाईट टी व्ही होता. त्या काळी ब्लॅक अॅड व्हाईट टी व्ही ला थोडाफार कलर चा फिल यावा म्हणुन निळी काच लावलेली असे. आमच्यासाठी फिल्मी जग त्यावेळी फक्त त्या काळया, पांढरया आणि निळया या तीन रंगातच सामावलेलं होतं. रंगीत टी व्ही तेव्हा प्रत्येकाच्या घरी नसायचे. आमच्या घरी रविवारी भल्या पहाटेपासुन लवकर उरकण्याची घाई सुरु असायची. माझ्या आईला रविवारची 'रंगोली' फार आवडायची आणि तिच्यामुळेच मला सुद्धा. मग सकाळी सातच्या आत आमची आंघोळ वगैरे उरकुन आम्ही चारजण टी व्ही समोर अगदी अगदी ठाण मांडुन बसे. देवाच्या पुजेसाठी आम्ही एवढे भक्तिभावाने कधी बसलो नाही पण रंगोली साठी मात्र एक मिनीटभर सुद्धा जागचे हलत नव्हतो. त्या वेळी आठवड्यात एक दिवसच गाणी पहायला मिळत असे. त्यामुळे रंगोलीचं महत्त्व काही औरच होतं. मला त्यावेळेस राज कपुर आणि देवानंद फार आवडायचे. देवआनंदचं एका बाजुला तिरका तिरका होत पळणं पाहुन मला एकदा वाटलं होतं की आता हा नक्कीच खाली पडणार. तेव्हा मला आईने समजावलेलं की ही तर त्याची स्टाईल आहे. राज, रणधीर आणि राजीव, राज कपुर च्या एका गाण्यात लहान मुलं म्हणुन होती, रेखाला अमिताभशी लग्न करायच होतं, मीना कुमारी कॅन्सर मुळे मरण पावली आणि अशा बरयाच गोष्टी मला लहानपणीच समजल्या होत्या. मला त्यावेळी 'एक दोन तीन .." हे तेजाब मधलं गाणं पाठ होतं. मग कुणी नविन माणूस घरी आलं की आमचा न चुकता गाण्याचा कार्यक्रम होत असे. त्यासाठी कुणालाही मला 'अजय ते गाणं गाऊन दाखव बरं' असं म्हणण्याची मी वेळ येऊ दिली नाही. माझा आवाज चांगला नसतानाही फक्त या आवडीपोटीच मी शाळेच्या स्नेहसंमेलनात सुद्धा गायलो होतो. एवढंच काय आयुष्यात मी पहिलं कुठलं पुस्तक हातात घेतलं असं जर मला कुणी विचारलंच तर मी 'चांदोबा' सोडुन एखाद्या फिल्मी मासिकाचच नाव घेईन, याच्यावरुन तुम्हाला अंदाज आलाच असेन की मी किती फिल्मी आहे ते :-)
त्या वेळी टी व्ही म्हणजे म्हणजे डी डी नॅशनल वा ते एकच असं चॅनेल आम्हाला माहित होतं. शुक्रवार व शनिवारी हिंदी आणि रविवारी मराठी सिनेमा टी व्ही वर लागत असे. आठवड्यातुन इन मिन तीन सिनेमे म्हणजे आमच्यासाठी मोठा अर्पुप प्रकार होता. शुक्रवारच्या सिनेमाची तयारी सकाळपासुनच सुरु होई. आमच्या शेजारी राहणारा निलेश सिनेमा पाहण्यासाठी माझ्या सोबतीला असे. शुक्रवारचा सिनेमा कुठला या पासुन त्यात कोण कोण आहेत याची चर्चा आम्ही शाळेच्या कट्यापासुन ते मुतारी पर्यंत, सर्व जागी करत असे.
"आजच्या पिक्चर मध्ये कोण कोण आहेत ? हिरो किती आहेत त्यात ?"..मी, जेवढे जास्त हिरो तेवढी जास्त मजा असं साधं समीकरण असे आमचं.
"धर्मेद,जितेंद्र आणि बरीच गॅग आहे त्यात. आयच्या ...भारी पिक्चर दिसतोय".. निलेश. 'आयच्या' हा त्याचा भारी आवडता शब्द. हा शब्द तो प्रत्येक भाव व्यकत करणासाठी वापरी. म्हणजे आनंद झाला तरी आयच्या, दु:ख झालं तरी आयच्या, विस्मयचकीत झाला तरी आयच्या आणि राग आला तरी आयच्याच.
"फा़ईटींग आहे का राव...", मी, फाईटींग हा आमच्यासाठी सिनेमाचा आत्मा असे. पिक्चर मधील फाइटींग बघुन आम्ही खरया खुरया मारामारीत सुद्धा ढिशुम ढिशुम असा तोंडानेच आवाज करत असे. :-)
"हो मस्त फाईटींग दिसतेय, तुला माहितेय का त्यात हेलीकॉप्टर मध्ये सुद्धा फाईटींग आहे. त्यात हिरो कडे कुत्रा आणि माकड सुद्धा आहे...", निलेश. कुत्रा आणि माकड सिनेमात असणं म्हणजे जास्तच एंटरटेनमेंट.
"सॉलीड सिनेमा असणार राव मग...तु लवकर उरकुन घरी ये. आज मी शेवटपर्यंत सिनेमा पाहणार.", मी. निलेशला माझ्यासारखीच सिनेमाची आवड होती फरक एवढाच की मी सिनेमा पाहताना मध्येच झोपत असे आणि तो मला
सारखा हलवुन जागा करी. मी कधीच कुठलाही सिनेमा शेवटपर्यंत पाहिला नाही आणि टी व्ही सुद्धा कधी बंद केला नाही. पण सकाळी उठल्यावर टी व्ही कुणी बंद केला यापे़क्षा मी कुठल्या सीन नंतर झोपलो याचीच जास्त उत्कंठा असायची. निलेशला बिचार्याला दरवेळेस मला राहीलेल्या सिनेमाची स्टोरी सांगावी लागत असे.
एकदा मी नाना पाटेकरचा सिनेमा पाहुन शनिवारी सकाळी शाळेत गेलो. त्या दिवशी नाना पाटेकर माझ्या अगदी अंगात भिनलेला होता. त्यात इतिहासाच्या तासाला आमचे पाटील सर हे क्रांतीवीर नाना पाटीलांचा धडा शिकवत होते. शिकवता शिकवता त्यांनी अचानक माझ्या शेजारी बसलेल्याला उभं करुन नाना पाटीलांविषयी एक प्रश्न विचारला. त्याला उत्तर येत नव्हतं म्हणुन त्याने मला खुण केली. मी ही दिलं फेकुन ...नाना पाटीलांच्या ए॑वजी नाना पाटेकर. त्याने ही दिलं तेच उत्तर नाना पाटेकर म्हणुन. सगळ्या वर्गात हशा. मग काय पाटील सरांच्या अंगात माझा नाना पाटेकर घुसला आणि त्यांनी बिचारयाला चांगलचं झोडपलं. त्या मित्राचा अगदी कालपर्यंत असा गैरसमज होता की मी त्याला नाना पाटील म्हणालो पण त्यानेच नाना पाटेकर ए॑कलं. नुकताच त्याचा हा गैरसमज जेव्हा मी दुर केला तेव्हा त्याला माझ्या इनोसंन्ट चेहर्यामागचा खरा शैतानी चेहरा दिसला.
आमच्या घराच्या बाजुला त्यावेळी व्हिडीओ वर सिनेमा दाखविण्याचा उद्योग एकाने सुरु केला होता, तो माझा मित्रच होता. मग काय सिनेमा कुठलाही असो माझी उपस्थिती तिथे सन्मानणीय असायची. एकदा त्याने 'शोले' सिनेमा दाखविला. शाळेतली झाडुन सारी मुलं सिनेमा बघायला आली यात माझा थोडाफार हात होता. शाळेत जेव्हा याचा शोध लागला तेव्हा मग काय आम्हा सर्वांना समोर घेऊन चांगल्या छड्या मारण्यात आल्या. त्यानंतर माझे मित्र कित्येक दिवस मला सारखे 'कितने आदमी थे रे शोले देखेने...?" असं विचारायचे. :-)
रविवारच्या संध्याकाळच्या सिनेमासाठी मी आणि आमच्या घरचे सारेच, अगदी चारच्या आत सगळ काही आवरुन तयार होत असे. मग चार वाजता चहा घेता घेता आम्ही सारे अशोक सराफ, लक्ष्मीकांतचे सिनेमे पाहत असु. पण आमचे एक सर मात्र मुलांनी सिनेमा पाहण्याच्या अगदी विरुद्ध होते आणि त्यासाठीच ते सगळ्यांच्या घरी या वेळेत जायचे आणि जो सिनेमा पाहताना दिसेन त्याला झोडपायचे. मला याची कुणकुण अगोदरच लागली होती. म्हणुन मी घरी बाहेर जातो म्हणुन सांगितलं आणि स्वत: दरवाजावरुन पोटमाळ्यावर चढुन कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी सिनेमा पाहत बसलो. सर खाली चहा पित आहेत आणि मी पठ्या त्यांच्या वर बसुन सिनेमा पाहतोय असं त्यावेळी चित्र होतं. सिनेमा पाहण्यासाठी मी असे बरेच प्रकार केले आहेत.
सिनेमाच्या वेडापायी बराच वेळा मी सिनेमात जे दिसेन ते करायचा प्रयत्न करायचो. शाहरुख सारखे केस पुढे आणणं, गोविंदा सारखी शिटी वाजविणे, ते सिनेमातले डायलॉग्ज म्हणणं वगैरे. माझा भाऊ सुद्धा माझ्या एवढा नाही पण बरयापैकी फिल्मी होताच. इंजीनिअरींगला असताना तो उगाचच मायनस नंबरचा चष्मा घालायचा आणि आपण खुप अभ्यास करण्यातल्या कॅटॅगरीतले आहोत अस दाखवायचा. नंतर नंतर त्याने त्याच्या पॅन्ट सुद्धा बेल बॉटम घालणं सुरु केलं होतं पण तो पर्यंत ती स्टाईल गेली होती. माझी बहिण सुद्धा फिल्मी प्रकाराला अपवाद नव्हती. तिला करीश्मा न जाणो का पण आवडायची. मग तिच्यासारखे केशरचना करणे सारखे प्रकार आलेच. थोडे पुढचे केस मुलांसारख्रे उजव्या हाताला वळविणे व ते मधुन अधुन मानेला झटका मारुन मागे सारणे असा प्रकार तिने एकदा केला होता. पण नंतर मातोश्रींनी त्याला भलतीच उपमा दिल्याने तो लगेचच बंद झाला. माझ्या स्वभावगुणानुसार मला एकच हिरो वा हिरोइन जास्त दिवस आवडले नाही. सूरुवात राज कपुर पासुन करुन मी अगदी शाहरुख पर्यंत सगळ्यांना फॉलो केलं. कोणी एके काळी मला मिथुनदा ही आवडायचा हे मी आज सर्वांसमोर मान्यही करतो. शाळेत असताना मी भलताच फिल्मी प्रेमी होतो, पण कॉलेज मध्ये माझं हे वेड बरंच कमी झालं. नोकरीला लागलो आणि या वेडाला पुन्हा पालवी फुटली. एकदा असाच एका मैत्रीणीबरोबर सिनेमा पहायला थिएटरला गेलो आणि मध्यांतराला कळलं की माझ्या पुढे दोन तीन सीटवर माझेच एक मित्र आणि वहिनी बसलेल्या आहेत. मग काय, सिनेमा संपायच्या आतच मी मैत्रीणीला घेऊन थिएटरच्या बाहेर. तसं माझं आणि तिचं काही नव्हत पण दोघेच सिनेमाला आलोय असं जर त्याला दिसलं असतं तर त्याने मला आयुष्यभर त्याच विषयावर चिडवलं असतं.
असं हे माझ चित्रपटांचं वेड, हवंहवंस पण नामानिराळं !
मी
वीस वर्षे
अंदाजे १५ भाषा
१० वा अधीक देशांचे
४००० पे़क्षा जास्त सिनेमे
ज्यात १०००० हुनी अधिक कलाकार
प्रत्येक सिनेमात हाताळलेला नविन विषय
दररोज एक तरी सिनेमा पहायचा असं समीकरण
आणि हे वेड आयुष्याच्या शेवटपर्यंत जोपासण्याचा ध्यास...
- अजय
---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१. फुंकर
२. मी 'पुरुष' बोलतोय !

Subscribe to:
Posts (Atom)