उद्धवजी,
माझं नाव अजय सोनवणे, वय २७, मुळचा पुण्याचा. पुण्यातच एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो. काही दिवसांपुर्वी माझी कार मी एका शोरुम मध्ये सर्व्हींसींग साठी दिली असताना त्यांच्या हातुन ती ठोकली गेली व त्याची भरपाई न मिळता त्यांच्याकडुन उलट मला बरेच दिवस मनस्तापच भोगावा लागला. बरेच प्रयत्न करुनही त्या शोरुमचा मालक, जो एक उत्तर भारतीय आहे त्याच्याकडुन काहीच भरपाई न मिळाल्याने शेवटचा पर्याय म्हणुन मी शिवसेनेची मदत घेण्याचं ठरवलं. शिवसेनेच्या कॉल सेंटर ला फोन लावला आणि तक्रार नोंदविली. या तक्रारीचं काय होईल अशी मनात शंका होतीच. आतापर्यंत राजकिय पक्षांचा अनुभव तसा फारसा काही चांगला नव्हताच आणि राजकीय पक्ष एका सामान्य व्यक्तीची तक्रार किती गांभीर्याने घेतील असा सवाल होता. पण शिवसेनेच्या कॉल सेंटर ने मला तातडीने नगरसेवक सागर माळकरांचा फोन नंबर दिला आणि तिथुनच सगळी चक्र पटापटा फिरू लागली. एक नगरसेवक, ज्यांचा नी माझा कधीही काही संबंध आला नव्हता, ना मी त्यांच्या मतदारसंघातला मतदारही नव्हतो, तरीही त्यांनी अत्यंत जबाबदारीने आणि कुशलतेने हे प्रकरण हाताळलं आणि मला योग्य तो न्याय मिळवुन दिला. भरपाई आणि त्याचबरोबर माझी गाडी ही मला मिळवुन दिली. एका सामान्य व्यक्तीसाठी एक नगरसेवक स्वत:चा वेळ आणि पैसा खर्च करुन एवढं काही करतो याच्यावर खरंच विश्वास बसत नव्हता. लोकशाहीमध्ये लोकांसाठी लोकप्रतिनिधीं असतो हे मला आज पहायला मिळालं.
ज्या पद्धतीने शिवसेनेच्या कॉल सेंटरच्या लोकांनी आणि नगरसेवक सागर माळकरांनी हे प्रकरण शेवटपर्यंत लावुन धरत मार्गी लावलं त्याला तोड नाही. शिवसेनेच्या कॉल सेंटरच्या लोकांनी दररोज मला स्वताहुन फोन करुन हा प्रश्न सोडविण्यासाठी मोठी भूमिका बजावली. असा अनुभव मला कदाचित पहिल्यांदाच येत होता. सत्तेत नसताना एखादा पक्ष सामान्य लोकांची एवढी कामे करत असेन तर सत्तेत आल्यावर काय करु शकेन याचा आता लोकांनाही विचार करावा. माझ्या ब्लॉगच्या माध्यमातुन मी लोकांपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवेन.
या कॉल सेंटरमागच्या कल्पनेला, सगळ्या अॅडमीनीस्ट्रेशनला, लो़कांची कामं करण्याच्या तुमच्या भावनेला आणि सागर माळकरांसारकख्या लोकप्रतिनिधींना माझा सलाम.
उद्धवजी, शिवसेनेचा भगवा तुमच्या हातुन असाच फडकत राहो. या कामी आमची तुम्हाला सदैव साथ राहीनच. आता तरी माझ्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा !
आपण या इ-मेल ला रिप्लाय देऊन मला याची पोचपावती द्यावी ही विनंती.
जय महाराष्ट्र !
-अजय सोनवणे
+९१-९८९०३०००४७
---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.मी आणि माझी फिल्लमबाजी
२.फुंकर
३.मी 'पुरुष' बोलतोय !
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------
42 comments:
लोकशाहीमध्ये लोकांसाठी लोकप्रतिनिधीं असतो यावर खरे तर विश्वास बसत नाहीच आहे. पण तुझे नशीब जोरावर आहे अजय.... चक्क हे प्रत्यक्षात घडलेय. अभिनंदन!
अजयजी...
उद्वव ठाकरेंचे नियोजन खरचं खुप शिस्तबद्ध आहे. त्यांच्या मध्ये प्रत्येक कार्यकर्त्याची कुंडली आहे, सेनाभवनात काय चालू आहे ते ते कुठेही बसून त्यांच्या फोन मधून पाहू शकतात. सेनेचे कॉल सेंटर म्हंजे अन्यायावर "उत्तर" असेच आहे.. नवी मुंबई, धुळे, मुंबैई येथिल अस्याच कैक प्रश्नांना या सेंटर मुले उत्तर मिलाले आहे. आपण ही घटना इथे लिहून लोकांचा सेनेच्या कॉलसेंटर वरचा विश्वास वाढविन्यास मदत करत आहात... ध्न्यवाद त्याबद्दल....
आणि हो, मीही असाच एकदा उद्वव साहेबांना मेल केला होता, त्यांनी स्वतः त्या मेलला रिप्लाय दिला होता...
आपन मस्त लिहले आहे.
आप्ला.
साळसूद पाचोळा.
अजय माझं सध्या कुठच्याच विशेष करुन मराठीचा सो कॉल्ड कैवार घेणार्या पक्षावर विश्वास नाहीये..पण ही घटना आता तू म्हणतोस खरी आहे तर मराठी माणसासाठी काही तरी होतंय असं निदान वाटायला लागलंय....तुझं नशीब चांगलं...
अजय माझा यावर विश्वास बसत नाहीये. पण हा तुझ्यासाठी एक सुखद अनुभव असणार हे नक्की. मला असे कॉल सेंटर आहेत हे देखील माहीत नव्हते. ह्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. अश्या गोष्टींची नक्कीच मदत होईल.
ही खरच चांगली सुरवात आहे.
सिध्दार्थ म्हणतो त्याप्रमाणे मलाही असे कॉल सेंटर असतात हे माहीत नव्हते.
BTW thanks 4 tagging, I hav continued the thread
Uddhav sahebancha kay reply yeto te nakki kalaw ha!
@भाग्यश्री: तुम्ही असं का म्हणता ? एखाद्याने जर चांगल काम केल तर त्याला चांगलं म्हटलच पाहीजे. कदाचीत माझा ही राजकीय पक्षावर विश्वास नाही. पण उद्धवजीच कामाची एक चुणुक पाहुन मी बराच भारावुन गेलो आहे.
धन्यवाद !
-अजय
@पाचोळा : तु पहिल्यांदाच भेट देत आहेस म्हणुन स्वागत. उद्धवजीच्या नियोजनाची मला याच्याअगोदर्च माहिती होती पण अनुभव आला आणि खुप बरं वाटल. नुसत तोंडाने आक्रमक असण्यापे़क्षा तो आक्रमकपणा कॄतीत आणणं महत्त्वाचं. कित्येक लोकांना असे कॉल सेंटर असतात हेच माहित नसतं. माझ्या या पोस्ट चा उद्देश तोच आहे.
बाय द वे, तुम्ही त्यांना कुठ्ल्या इमेल आयडी वर मेल केला होतात ते सांगाल का ? मला अजुन रिप्लाय आलेला नाही म्हणून विचारलं.
-अजय
@अपर्णा : राजकीय पक्षावर विश्वास नाही हे ठीक आहे पण एखाद्याने जर काही चांगलं काम केल तर ला चांगल म्ह्टलच पाहिजे ना. मला याचा अनुभव आला म्हणून मी इथे तो शेअर केला. यात मराठी विरुद्ध अमराठी हा वाद नाही. माझं काम त्यांच्या माध्यमातुन झालं याचंच मला आनंद आहे.
-अजय
@सिद्धार्थ: जे काही लिहिलेलं आहे ते सारं खरं आहे. शिवसेनेने एक कॉल सेंटर स्थापन केलय. आपल्या भागातील कुठलीही समस्या असेन तर त्यांना फोन करन सांगा. तो प्रश्न सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जातो. शिवसेनेच्या वेबसाईट ला भेट द्या, तिथे त्यांचा फोन नंबर आहे.
धन्यवाद.
-अजय
मीनलः तुझा टॅग वाचला, छान आहे. असे कॉल सेंटर आहेत. शिवसेनेच्या साईट ला व्हिजीट कर मग तुला बरयाच गोष्टी समजतील. आजकाल नवीन काही लिखाण चालु आहे की नाही ?
-अजय
@सचिन : अजुन आला नाही रिप्लाय, आल्यावर इथे पोस्ट करेन जरुर.
धन्यवाद !
-अजय
काही दिवसापूर्वी लोकप्रभा/चित्रलेखा मध्ये वाचले होते, हाई-टेक शिवसेना आणि उद्धव ठाकरे च्या ऑफिस बद्दल. लोकांचे अनुभाव पण लिहिले होते...
त्यावेळेस एवढे काही खरे वाटले नाही, पण आता तू म्हणतोयस म्हणजे खरच असणार.
@आनंदः हो हे सगळं खरं आहे त्यासाठी अनुभव घेऊन पाहिला आहे मी. खुप हाईटेक आहे हे सगळं. लोकांच्या समस्या सुटल्याशी त्यांना मतलब.
धन्यवाद
अभिनंदन..
@महेंद्रजी: धन्यवाद ! शिवसेनेच्या बाबतीत तुमची मतं मी जाणुन आहे. त्यामुळे मी जास्त काही लिहीत नाही.
-अजय
अजय, हा खूप सुखद धक्का आहे. मी लोकप्रभा मध्ये कॉल सेंटर बद्दल वाचल होत. तेव्हा मला तो केवळ एक राजकीय स्टंट वाटला होता. पण तुझा अनुभव वाचून खूप बर वाटल!!!चला काही तरी चांगल घडतय!!!
@मनमौजी: होय हा एक सुखद धक्काच आहे. आपण फार अपेक्षा बाळगत नाही राजकिय प्क्षांकडून कारण एवढ्या दिवसांचा अनुभव ( वाईट अर्थात !) आपल्याला असतो. पण उद्धवजींच कौतुक करावं तेवढं थोडच आहे.
मी आताच इथे स्पष्ट करतो की या वेळी मला ही असं वाटत होतं की शिवसेनेच सरकार यावं , पण राज ठाकरे सुद्धा मला अपील करत होते. दोघेही आपापल्या जागी ग्रेट आहेत.
-अजय
अभिनंदन अजय. तुझं नशीब खरंच चांगलं आहे म्हणून तुझी चांगल्या लोकांशी गाठ पडली. नगरसेवकाकडे गेलास ते योग्य केलंस... पण अजून एक सांगावेसे वाटते, ते म्हणजे पुण्यातली ग्राहक पंचायत खूप अॅक्टीव आहे. एक ग्राहक म्हणून तू त्यांच्याकडेही तक्रार नोंदवू शकला असतास. ग्राहक पंचायतीच काम विनामुल्य आणि वेळेत होतं.
@अनामिकः ग्राहक पंचायतीचा अनुभव नसल्यामुळे मी त्या वाटेने गेलो नाही पण तिकडे ही जाणार होतो. त्याच्याअगोदर मी वकीलांची नोटीस देऊन पोलिस कम्प्लेट केली. नंतर म्हटल आता याच्या हात धुऊनच मागे लागायचं. म्हणून मी शिवसेनेला आणि मनसेलासुद्धा फोनाफोनी केली. त्या शोरुम मध्ये जाऊन सुद्धा चार पाच वेळा खुप गोंधळ घातला. याच्या पुढे गांधीगिरी सुद्धा करणार होतो. १०-१२ जण नेऊन बोर्ड हातात घेऊन येणारया जाणारया कस्ट्मरला सगळी हकीकत सांगणार होतो. अजुन वर्तमानपत्रात सुद्धात त्याच्याविरुद्ध बातमी देणार होतो. याच कारण म्हणजे त्या मालकाची गुर्मी मला जिरवायची होती.
ग्राहक पंचायतीचा अनुभव नव्हता पण इथुन पुढे नक्कीच तो मार्ग अवलंबील.
धन्यवाद !
-अजय
अजय, सगळ्यांनी म्हंटलय त्याप्रमाणेच मलाही धक्काच बसला हे वाचून. असं होऊ शकत? खूपच छान झालं !! अभिनंदन !!
हेरंबः ब्लॉगवर स्वागत आणि धन्यवाद. हे सगळं खरं आहे. राजकारणाची दिशा बदलत चालली आहे हेच खरं. लोकांना ग्रुहीत धरुन चालत नाही याची जाणीव नेत्यांना झाली तर बस्स !
Uddhavji Jindabad
Unbelievable nasla tari mala khup changla vatla...majhi hich apeksha hoti call center kadun... aaj jivant udaharan pahayala milale... Greaaaat !!!!
are mala pan aasach anubhav aala hota,
shivsena kharach aamar ahe,
jai maharashtra
@दिनेशः तुझा पण अनुभव तु आमच्याबरोबर शेअर कर ना...
-अजय
@हर्षलः एखादा राजकिय पक्ष सामान्य व्यक्तिच्या समस्या एवढ्या जोरकसपणे लावुन धरतो आणि ते प्रश्न सोडविले नाही तर लोकप्रतिनिधीना जबाबदार धरतो हा अनुभव सुखावह होता.
-अजय
@सौरभ : स्वागत आणि धन्यवाद !!!
-अजय
शिवसेना कॉलसेंटर हे एका कुठल्याही मोठ्या कंपनीच्या कॉलसेंटर एवढेच प्रभावी आहे. कोणीही माणूस महाराष्ट्र आणि देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून थेट शिवसेना कार्यप्रमुखांशी संपर्क साधू शकतो. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. फक्त एकच गोष्ट ध्यानात घ्यावी कि हे राजकीय माध्यमातून होणारे काम असल्याने काम होण्यास थोडा कालावधी नक्कीच शिवसेनेला द्यावा लागेल!
अजय सोनावणेंनी आपला अनुभव चांगल्या पद्धतीने मांडला याबद्दल शिवसैनिक म्हणून मी त्यांचे आभार मानतो!
yup....tu tuzha anubhav share kela baddal Thanks....
but it's a g8 feeling (get shocked also) that some political person is helping common man.
\
mr.anamik ne grahak panchayat la janyas sangitale,harkat nahi jayla.tyani tithe vinamulya seva aste ase sangitale, ajayaji aplya madhyamatun hya anamik namak vyaktila sangu icchito shivsenene aaj paryant call center karita ek paisa kuthunahi ghetala nahi.
खरच सुखद धक्का आहे...खूप छान
>>> राज ठाकरेंनी नवा पक्ष स्थापन केल्यापासून माझा त्यांच्याकडे जरा जास्त झोक आहे... उद्धवजींच्या नेतृत्वावर माझा तसा कमी विश्वास, हेच यामागचं कारण... तसा मी अजुन विद्यार्थी आहे, त्यामुळे कोणत्याही पक्षाशी माझा कोणताही आणि कसलाही संबंध नाही, पण आवड तर असतेच ना...!
>>> पण दादा, तुझ्यासोबत घडलेल्या घटनेला एवढ्या लवकर व कसलीही तमा न बाळगता, सरकार नसतांनाही एवढी जीवा-भावाची मदत करणं, हे मात्र मराठी माणसाला तसेच शिवसेनेला शोभेल असंच कृत्य(गोष्ट) आहे... अशाच लोकांची आपल्या राज्याला गरज आहे, यातूनच आपलं महा(न)राष्ट्र उदयास येईल...
>>> उद्धवजींना पत्र पाठवण्याचे धाडस जे काय तू केलेस ना दादा, त्याबद्दल तर मी अजुनही हैराण आहे...!
- विशल्या!
उद्धवजींचा आलेला रिप्लाय ...
-------------------------------
from Uddhav Thackeray
to Ajay Sonawane
date Sun, Dec 27, 2009 at 9:41 PM
subject Re: ??????????? ??? ??????? ???? ?????
mailed-by me.com
hide details 9:41 PM (12 hours ago)
Ajay Jai Maharashtra, Apnas Shubheshchha.
Sent from my iPhone
On 22-Dec-2009, at 10:48 PM, Ajay Sonawane wrote:
>
> उद्धवजी,
>
> माझं नाव अजय सोनवणे, वय २७, मुळचा पुण्याचा. पुण्यातच एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मी सिनीअर सॉफ्ट्वेअर इंजीनिअर म्हणुन काम करतो. काही दिवसांपुर्वी माझी कार मी एका शोरुम मध्ये सर्व्हींसींग साठी दिली असताना त्यांच्या हातुन ती ठोकली गेली व त्याची भरपाई न मिळता त्यांच्याकडुन उलट मला मनस्तापच भोगावा लागला. बरेच प्रयत्न करुनही त्या शोरुमचा मालक, जो एक उत्तर भारतीय आहे त्याच्याकडुन काहीच भरपाई न मिळाल्याने शेवटचा पर्याय म्हणुन मी शिवसेनेची मदत घेण्याचं ठरवलं. शिवसेनेच्या कॉल सेंटर ला फोन लावला आणि तक्रार नोंदविली. या तक्रारीचं काय होईल अशी मनात शंका होतीच. आतापर्यंत राजकिय पक्षांचा अनुभव तसा फारसा काही चांगला नव्हताच आणि राजकीय पक्ष एका सामान्य व्यक्तीची तक्रार किती गांभीर्याने घेतील असा सवाल होता. पण शिवसेनेच्या कॉल सेंटर ने मला तातडीने नगरसेवक सागर माळकरांचा फोन नंबर दिला आणि तिथुनच सगळी चक्र पटापटा फिरू लागली. एक नगरसेवक, ज्यांचा नी माझा कधीही काही संबंध आला नव्हता, ना मी त्यांच्या मतदारसंघातला मतदारही नव्हतो, तरीही त्यांनी अत्यंत जबाबदारीने आणि कुशलपणे हे प्रकरण हाताळलं आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवुन दिला. आम्हाला भरपाई आणि त्याचबरोबर आमची गाडी ही आम्हाला मिळवुन दिली. एका सामान्य व्यक्तीसाठी एक नगरसेवक स्वत:चा वेळ आणि पैसा खर्च करुन एवढं काही करतो याच्यावर खरंच विश्वास बसत नव्हता. मला अशा नगरसेवकांचा खरंच खुप अभिमान आहे.
>
> ज्या पद्धतीने शिवसेनेच्या कॉल सेंटरच्या लोकांनी आणि नगरसेवक सागर माळकरांनी हे प्रकरण शेवटपर्यंत लावुन धरत मार्गी लावलं त्याला तोड नाही. सत्तेत नसताना एखादा पक्ष सामान्य लोकांची एवढी कामे करत असेन तर सत्तेत आल्यावर काय करु शकेन याचा आता लोकांनाही विचार करावा. माझा स्वत:चा मराठी ब्लॉग ( http://ajaysonawane1.blogspot.com ) आहे ज्याच्या माध्यमातुन मी लोकांपर्यंत हा संदेश नक्की देईनच. या ब्लॉगला दररोज अंदाजे ५०० मराठी लोक भेट देतात त्यामुळे हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचोवला जाईन यात तिळमात्र शंका नाही.
>
> मी सलाम करतो ... या कॉल सेंटरमागच्या कल्पनेला, सगळ्या अॅडमीनीस्ट्रेशनला, लो़कांची कामं करण्याच्या तुमच्या भावनेला आणि सागर माळकरांसारकख्या लोकप्रतिनिधींना !
>
> उद्धवजी, शिवसेनेचा भगवा तुमच्या हातुन असाच फडकत राहो. या कामी आमची तुम्हाला सदैव साथ राहीनच. आता तरी माझ्या तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा !
>
> आपण या इ-मेल ला रिप्लाय देऊन मला याची पोचपावती द्यावी ही विनंती.
>
> जय महाराष्ट्र !
>
> -अजय सोनवणे
> पुणे, +९१-९८९०३०००४७
विशाल, सुहास,राजेश, अमित्,स्वप्नील : सर्वांच स्वागत आणि आभार. मी नुकताच उद्धवजींचा आलेला रिप्लाय इथे पोस्ट केला आहे.
-अजय
Waa... Udhhavjini reply pan kela... sahi hai... Prajadaksh waganuk ahe :)
ऐकल का? गेल्या चार पाच दिवसापासून शिवसेना भवनासमोर "जागो ग्राहक जागो" चा बोर्ड लावला आहे. यात ग्राहकांना शिवसेना ग्राहक तक्रार निवरण केंद्रात आपल्या तक्रार नोंदवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. आपण उद्धवजीना लिहिलेल्या पत्राने प्रेरित होऊनच हा बोर्ड झळकत असावा यात शंका नाही. सेनेबरोबरच आपणही जनजगृतीमधे हातभार लावल्याबदद्ल आपले अभिनंदन.
सचिन पाटीलः आपण दिलेल्या बहुमुल्य माहितीबद्दल आभार. कदाचीत माझ्या पत्रामुळे जर हे झालं असेन तर मला आनंदाच आहे. पण खरं सगळं श्रेय जातं ते उद्धवजींना आणि कॉल सेंटर च्या सर्व कर्मचारयांना. आक्रमकपणा नुसता तोंडात असुन चालणार नाही हे जगाला दाखविण्याची हीच खरी संधी आहे असं मला तरी एक सामान्य नागरीक म्हणुन वाटत. आपण कॉल सेंटरची ही कार्यक्षमता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी आणि 'जगाच्या कल्याणा' याचा अनुभव घ्यावा हिच विनंती.
-अजय
"Patil" he sambodhan mhanun waparal ka? bhari watala...btw surname joshi ahe :)
नाही ती माझी चुकच होती, पाटील पेक्षा जोशीना जोशीबुवा हीच उपाधी जास्त शोभेन :-)
-अजय
Ajay, jar tya show room cha malak UP cha nasata ani Maharashtrian/South Indian nahitar dusara koni asata tari pan ashich madat milali asati ka? Ani tya case madhe tu tari Shivsene kadech madat magayla gela asatas ka?
Varil prashananchi uttare jar ho asatil tarch Lokshahi ani Lokpratinidhinna Salam!
Post a Comment