Monday, December 14, 2009

फुंकर

"जीवन म्हणजे ऊन पावसाचा खे़ळ आहे. जसं उन्हामागुन पावसाळा येतो तसंच दु:खामागुन सुख येतं,,," हे वाक्य मी शाळेत असताना नेहमी ए॑कायचो. कधी हे वाक्य सुविचाराच्या फळयावर लिहिलं असायचं तर कधी ते कुठल्यातरी निबंधाच्या पुस्तकात असायचं. त्या काळी मला या जीवनाबद्दलच्या वाक्यांमधले शब्द भारी भारदस्त वाटायचे पण कधी अर्थ समजला नाही. अर्थ समजावुन घ्यावं असही कधी त्या कोवळ्या वयात वाटलं नाही. आयुष्यातली एकेक वर्ष जसजशी कमी होत गेली तसतसं या शब्दांचा अर्थ मला गवसत गेला पण जीवनाबद्दलच गुढ मात्र वाढतच गेलं. आज ही जेव्हा मी मागे वळुन फळ्यावरचं ते वाक्य डोळ्यासमोर आणतो तेव्हा मला काहीतरी नवाच अर्थ गवसलेला असतो. हे जीवन अजुनही मला दररोज काहीतरी नवीन शिकवायचा प्रयत्न करतं.

जीवन हेच मुळी खुप संमीश्र असतं. कधी ते तुम्हाला खुप हसवेन तर कधी अचानक डोळ्यातुन पाणीही काढेन. 'जगी सर्वसुखी असा कोण आहे..?", सर्वसुखी असा कुणीच नाही, भोग हे प्रत्येकाच्याच वाटयाला असतात. फरक एवढाच की त्यांचा काळ वेगळा असतो. कुणाला मुल होत नाही याचं दु:ख तर कुणाला मुलगा होत नाही याच दु:ख तर कुणाला मुलगा सांभाळत नाही म्हणुन काळजी. कुणी प्रियकर किंवा प्रेयसी शी भेट होत नाही म्हणुन दु:खी तर कुणी लग्न होत नाही म्हणुन चिंतातुर तर कुणी लग्न झाल्यावर नवरा/बायको पहिल्यासारखं प्रेम करत नाही म्हणुन खट्टु. कुणी संसारात नवरयामुळे सुखी नाही तर कुणी सासुमुळे. कुणाला एकट जगण नकोसं झालय तर कुणाला एकत्र कुटुंबात राहण मान्य नाही. कुणी नोकरी नाही म्हणुन वणवण भटकतोय तर कुणी खुप काम आहे म्हणुन अस्वस्थ तर कुणी नोकरी करुन कंटाळलेला. प्रत्येकजण कशात ना कशात तरी अडकलेला. विवंचना पत्येकालाच आहेत कारण वेगवेगळी फक्त.

लहान असतानाची लवकर मोठं होण्याची इच्छा जेव्हा पुर्ण झाली तेव्हा त्या आनंदाला एक दु:खाचीही किनार होती. जसजस वय वाढत गेलं तसतसा मी मोठा झालो पण या मोठ्या लोकांचे प्रश्न ही मोठेच ना. बरयाच वेळेला माझ्याही आजुबाजुला वादळं घोंघावली. कधी कधी मी त्यात सापडलो, धडपडलो तर कधी सहीसलामत बाहेर ही पडलो. जेव्हा खाली पडलो त्यानंतर एका नवीन उमेदीने उभाही राहीलो. अशाच वादळांनी मला शिकवलं पाय रोवुन उभं रहायला. आजुबाजुला सगळ्या गोष्टी जेव्हा जमीनदोस्त होत असतात तेव्हा डोकं शांत ठेवुन पुढची वाटचाल करायला आणि पुन्हा आपल्या जहाजाचं शीड उभारुन नवीन किनारा शोधायला. नवनवीन आव्हान असली तर मजा येते जगण्याला नाहीतर मिळमिळीत आयुष्य काय कामाचं ? परीक्षा नसेन तर आपण कधी पायरी चढुच शकणार नाही. आव्हान येतात ते आपल्या बाहुतलं बळ पहायला. त्या आव्हानाला परतुन लावण्यासाठी तुमचे बाहु तेव्हा फुगले पाहिजेत. त्यांना घाबरुन जो पळतो त्याच्याचमागे ते हात धुऊन लागतात.

तुम्ही कधी वर्तमानपत्रातली 'वाघाला बकरी जवळ घेउन जाणारा रस्ता शोधा" हे कोडं सोडवलंय का ? त्यात एका टोकाला वाघ, एका टोकाला बकरी आणि मध्ये रस्त्यांचं जंजाळ असतं. त्यात बरेच रस्ते हे फसवे असतात तर काही मध्येच संपणारे. काही रस्ते आपल्या जिथुन सुरुवात होते तिथेच पुन्हा घेऊन येतात. त्यातला एकच रस्ता असा असतो जो आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जातो. तुम्हाला नेमका तोच रस्ता शोधायचा असतो. तुम्ही जर अशी कोडी उलटी सोडविलीत म्हणजे उत्तरापासुन सुरुवात करुन प्रश्नाकडे पोहोचायचं तर तुम्ही लवकर कोडं सोडविण्यात यशस्वी होता. आपल्या आयुष्यात अशीच कोडी आपल्याला सोडवायची असतात. एक कोड सुटलं की दुसरं मग तिसरं. उसंत मिळाली तर ठीक नाहीतर चालुच. देव आपल्याला असे प्रश्न सोडवायला देऊन आपली परीक्षाच घेत असतो. उत्तराकडुन जर प्रश्नांच्या दिशेने प्रवास केला तर असे आयुष्यातले मोठे प्रश्न ही सुटू शकतील.

जेव्हा जेव्हा असे कठीण पसंगातुन तुम्ही जात असता तेव्हा आपलीच माणसं कधीतरी खुप दुर गेल्यासारखी वाटतात तर कधी तो एकदम परकी आहेत अस भास होतो. माणुस म्हणजे तर्‍हेवाईकपणा आलाच. काहींचा तो स्वभावगुण असतो तर काहींचा तो कावा. जेव्हा तुमचं दु:ख कधी अनावर होईन, सगळे जवळचे परके वाटायला लागतील, जेव्हा देवाने टाकलेला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेनासं होईन, जेव्हा तुम्हाला असं वाटेन की आता मी अगदीच एकाकी पडलोय किंवा अगदीच अगतिक झालोय तेव्हा ... तेव्हा आपलं दु:ख कुणाजवळ तरी मो़कळ करावं, त्याला वाट करुन द्यावी. अशावेळेस बोलावं, भरपुर बोलाव अगदी मोठमोठ्याने ओरडावं आणि आतला ज्वाला बाहेर आणावा. काहीही झालं तरी बोला, सांगा, शेअर करा.

२-३ दिवसापुर्वी एका मैत्रीणीशी बोलत असताना तिने असंच तिचं मन मोकळं केलं आणि मग मला तिची होणारी फरफट, तिचा त्रागा समजला. एखादी व्यक्ती आयुष्यात एवढं कसं काय सगळ सहन करु शकते ? एखाद्याला इतकं सहनशील होता येतं ? कधी कधी वाटतं की मी माझ्या आयुष्यात अजुन काहीच वादळ झेलली नाहीत. लोकांची दु:ख पाहिली की माझी दु:ख मला खुप छोटी वाटु लागतात. लोकांची दु:ख समजुन घेण्याबरोबरच ती कमी कशी करता येतील याचा मी बराच वेळा विचार करतो पण उत्तर मात्र सापडत नाही.

"भाजलेल्या जागेवर फुंकर मारुन वेदना कमी करता येतात पण एखाद्याच्या पोळलेल्या मनावर कशी फुंकर मारायची, कुणी सांगेन का मला...?"

-अजय


---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१. मी 'पुरुष' बोलतोय !
२. यंदा कर्तव्य आहे ?
३. ब्राईड-हंट
---------------------------------------------------------------------------------

26 comments:

Ajay Sonawane said...

Mrs. Sonali kadun aleli comment, kahi karnastav tya ithe comment post karu shaklya nahit mhaunun....
---------------------------------
Tumcha blog vachla me, bedundha. khup chan lihita tumhi. sagle lekh vachle, mazyakade shabd nahit tumcha kautuk karnyasathi. asech lihit raha.

mala blogvar pratikriya (comment ) takta aali nahi mhanun ha prapancha. vachun pratikriya dilich pahije asa manapasun vatla.


Regards,
Sonali

Unknown said...

Life hi ashi ka aste?
manvi manache he asech chalayche.
kharach aaplya duhkavar Funkar marnar konitari hav aahe ka?
Kitihi problems asale tari aapan reality pasun dur javu shakat nahi mag manala ekch dilasa dyaycha.
Ek question vicharaycha.
" Why God has selected Me? "
I am capable so god is giving so many challenges to me.
ani mag yatunch soln kadhi milat te kalat hi nahi.
when i read this post i remember 1 marathi Poem "KANA" of poet " KUSUMAGRAJ".
AND I remember one line
" Modun padala sansar tari modala nahi kana
Pathivarti hat thevun nusate ladh manha "
so Dukhavar "Funkar" marun "LADHA" ase sangnare tari asavet.

Unknown said...

Hi Ajay,
I dont know marathi much..i can understand little bit of it....fir bhi aap jo likhte he, use me thoda bahot samjti leti hu.i must say it touches heart directly.Not possible for u to write in Hindi....???taki hum jaise log bhi use padh kar ache se samaj paye.....

अपर्णा said...

अजय तू लिहीलंस ते अगदी बरोबर आहे पण कधीकधी निराशेच्या क्षणावर मात करण्याची ताकद फ़क्त आपल्याच कडे असते असं मला खूपदा वाटतं. दुसरा फ़ार फ़ार तर थोडंफ़ार आशादायी बोलुन बळ वाढवु शकतो पण मुळात ते बळ गोळा करायचं काम आपलं आपणंच करायचं...कदाचित चुकीचं वाटेल पण मागचे काही प्रसंग ज्यातुन तू निभावला असशील ते आठव तुझं तुलाच पटेल..
आणि हो लेख खूप छान...

भानस said...

अजय जेव्हांजेव्हां दु:ख समोर येतं आपण त्यात इतके बुडून जातो की यापेक्षा मोठी वेदना नाहीच असे वाटते. निराशेने वेढलेले मन कधीकधी मार्ग शोधण्याएवजी हताशपणे माझ्या नशिबाचे भोग म्हणत बसूनच राहते. मग कधी आपसुक उत्तर सापडते. दु:ख विरळ होत पुन्हा सुखाची चाहूल लागते. मागे वळून पाहता, " अरे, उगाच मी इतका हातपाय गाळून बसलो होतो. कठीण असले तरी अशक्य नव्हते." हे वाटणे पुन्हा दु:ख आले की लक्षात राहायला हवे. बास. दुस~याचे दु:ख आपल्याला शक्य असेल तर नक्कीच हलके करायचा प्रयत्न आपण करतोच. पण अनेकदा ते शक्यच नसते. मात्र त्याला जड होणार नाही...खोटे वाटणार नाही... कटकट होणार नाही अशा रितीने धीर देता येईल. प्रामाणिक भाव त्या मनापर्यंत पोचतातच.बस तेवढेच नेटाने करावे.
मला आवडली पोस्ट.सुसंगत.

Anuja said...

अजय,
विचार खूप प्रगल्भ जाणवतात. लिखाणाची भाषा सहज ओघवती आहे. चटकन कळतो, लेखाचा अभिप्रेत अर्थ. एक सुचवू का? जमेल तसे अभिप्राय ना पोच दे. तुला पण मी पोच दिली आहे.
सवड झाली कि वाच. लिहितोस छान.

Ajay Sonawane said...

सोनाली:खुप खुप धन्यवाद, आपल्या सारख्यांचे ब्लॉगवरील प्रेम असेच राहो. कदाचित अशाच प्रतिक्रिया अजुन चांगल काही लिहिण्यासाठी प्रेरित करतात.

-अजय

Ajay Sonawane said...

@विशाखा: थकु नकोस, हरु नकोस. त्या कवितेप्रमाणेच कणा मोडुन देऊ नकोस.

-अजय

Ajay Sonawane said...

@ झेहरा : तुझ्या सारखे लोक ज्यांना अगदी तोडकी मोडकी मराठी समजते असे लोक ही वाचुन प्रतिक्रिया देतात हे वाचुनच दोन इंच छाती फुगली. हिंदी मध्ये मी लिहु शकेन पण स्वताला व्यकत करायच असेन तर मी मराठीत ते खुप चांगल करु शकतो म्हणुन हा सारा उपद्व्याप. अशीच भेट देत रहा.

-अजय

Ajay Sonawane said...

@ अपर्णा: बरोबर आहे तुझं. स्वताचे प्रश्न स्वतालाच सोडवायचे असतात. कुणी माझ्या मदतीला येईन अशी अपे़क्षा ठेवु नये. पण कुणाचातरी मदतीचा हात सुद्धा अशा वेळी खुप मोलाचा ठरतो.
आर्वजुन भेट देउन प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप आभार.

Ajay Sonawane said...

@ भाग्यश्री: मी जेव्हा पाठिमागे वळुन पाहतो तेव्हा मला जाणवतं की त्यावेळेसचे प्रश्न , दु:ख ही तेवढी मोठी नव्हतीच. मी उगाच हातपाय गाळुन बसलो होतो. जसं पुढच्या इयत्तेत गेल्यावर मागचा वर्गातला अभ्यासक्रम सोपा वाटु लागतो तसच ती दु:ख ते प्रश्न म्हणजे अगदी किरकोळ वाटु लागतात. कदाचित माणुस दिवसेंदिवस अधिक प्रगल्भ अनुभवी होत जातो म्हणुन. नविन आव्हान आपल्याला नविन काहीतरी शिकवुन जातात.

Ajay Sonawane said...

अनुजा: तुझ्या इनस्पायरिंग कमेंन्ट बद्दल धन्यवाद. तुझे इमेल मिळालं आणि तुझा अभिप्राय सुध्दा. २-३ दिवस मनात खुप कोलाहल माजला होता. जे काही मैत्रिणीकडुन तिच्या बद्दल ए॑कलं त्यानंतर जे काही मनात विचार आले तेच इथे चितारल्याचा प्रयत्न केला. बर्याच वेळा असं होत की आपण एखाद्याची वेदना समजावुन घेतो आणि त्यानंतर ती वेदना स्वताच अनुभवतो. कदाचित माझंही तसंच काहीस झालं. दुसर्याच दु:ख कसं कमी करावं हा प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहे पण पोळलेल्या मनावर फुंकर मारणं असंच चालु राहीन.

कदाचित कामाच्या गडबडीत प्रतिक्रियांना काल पोच देऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. प्रत्येक प्रतिक्रियेला पोच देण्याचा मला नेहमीच आवडतं. तुझं ही असंच काहीस लेखन आम्हाला लवकरच वाचायला मिळेन अशी छोटीशी अपेक्षा.

-अजय

Unknown said...

अजय किती प्रगल्भ लिहलयेस रे!!
खरय आपल्या दुख:वर आपणच मात करू शकतो!!!मला वाटतं स्वत:वर विश्वास असेल आणि घेतलेले निर्णय दुर्दैवाने चुकले तरी ते स्वत:चे निर्णय म्हणून स्विकारायची तयारी असेल तर life becomes really very easy....आयूष्य खुप सुंदर आहे रे आणि संकट तर येणार...कुठे तरी वाचले होते की तुमच्या सहनशक्तीच्या बाहेरचे संकट देव तुमच्यावर येउ देत नाही!!!!
बाकी लिहीत रहा रे!!!!

Ajay Sonawane said...

तन्वी:देव सुद्धा आपल्याला आपल्या सहनशक्तीच्या बाहेरच संकट देत नाही ही आज मला नविनच गोष्ट कळाली. खरंच असंच असावं. माझसुद्धा असंच होतं, मी कधीच माझ्या आयुष्यात घेतलेल्या निर्णयावर पश्चाताप करत नाही. घेताना निर्णय अगदी विचार करुन घेतो. तो निर्णय त्या वेळेला अनुसरुनच घेतलेला असतो त्यामुळे पुढे जाऊन जरी तो चुकला तरी त्याच्यावर रिग्रेट नकोत. तु ही याच मताची आहेस हे वाचुन आनंद झाला. एक माझ्याच मताची मला आज एक मैत्रीण ही मिळाली.

-अजय

Anuja said...

ajay,
me anuja mhanje anukshre blog. tula ji abhipret aahe tila pan tuzya bhavna kalu det.

aata matr anushree hi pan olkh chalel

Ajay Sonawane said...

अनुश्री/अनुजा : बापरे मी किती कन्फ्युज झालो होतो मलाच माहित. काल मला अनुजा नामक एका वाचकाकडुन इमेल मिळाल की ब्लॉग आवडला वगैरे वगैरे. त्याला मी २-३ वेळा रिप्लाय दिला. त्यानंतर अनुजा कडुन ( म्हणजे तुझ्याकडुन ) कमेन्ट मिळाल. त्यात तु पोच देत जा असं म्हटलीस. मला वाटल की कालचीच अनुजा. म्हणुन मग मी तिला ईमेल द्वारे कमेंट देऊन पुन्हा पोच दिली. मला माहित नव्हत की ती अनुजा म्हणजे तु अनुश्री आहेस. त्यानंतर पुन्हा आता जेव्हा अनुजा च कमेट आलं तेव्हा मी अस समजलो की ती अनुजा म्हणजेच अनुश्री आहे. मग मी तिला विचारलं की तुझा अनुक्षरे ब्ललॉग आहे का ..तिचा काहीच ब्लॉग नाहीये. तिला ही मी कन्फ्यूज केलं. शेवटी आता सगळा प्रकार ल़क्षात आला :-) हसुन हसुन पोट दुखतंय माझं....

तुला मी इथुन पुढे अनुश्री म्हणत जाईन आणि तिला अनुजाच :-)

Anuja said...

नावात काय आहे' लिहून टाक. मी पण खू'प हसले. किती गोंधळ!!!!!!!!!!!!. तुला प्रतिक्रिया पब्लिश करण्याचे नियंत्रण माहिती आहे का? वरची प्रतिक्रिया आहे तशी पब्लिश झाली. नसेल तर हा ऑप्शन शोधून काढ. मला ब्लॉग स्पॉट च्या विजेट्स माहिती नाहीत. असो तुझा गोंधळ वाचून पुन्हा पुन्हा हसतीय अजून...........

Unknown said...

एका दमात आख्खी पोस्ट वाचली. एकदम माझ्या मनातलं लिहिल्यासारख वाटत होत. होत असं कधी तरी.
माझ्या बरोबरच का असं होत नेहमी, माझी काय चूक असं जेंव्हा मनात यायला लागत तेंव्हा मी आजुबाजुच जग बघायला लागते. मग काळात आपण किती lucky आहोत.
कधी जमलं तर पुणे-लोणावळा local नि प्रवास करून बघ. मी रोज करायचे कॉलेज मध्ये असताना. दापोडी यायच्या आधी घराची एक रांग लागते, तिथली घर आपल्या घराच्या बाल्कनी एवढी आहेत आणि घराचं दार खिडकी एवढं. तरी त्या घरात ४-५ लोक राहतात. ते बघितल कि मला नेहमी माझ दुखः त्यापुढ खुजं वाटू लागतं.
आपणच केलेल्या कृत्याचे returns घ्यायला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो हेच खर. पण दुखः विसरून जगण्यापेक्षा त्याला हसून सामोरं जाव आणि ह्याला हरवून पुढे चालावं हे जास्त योग्य ठरेल नाही का?
बाकी पोस्ट नेहमी सारखीच मस्त आहे.

Ajay Sonawane said...

अमुता: बरेच दिवसांनी भेट आणि प्रतिक्रिया दिलीस ब्लॉगला. प्रत्येक हळव्या मनाचे बोल मी इथे लिहिलेत. बरयाच वेळेला मी सुद्धा असाच विचार करतो की मीच का पण? पण नंतर कळत प्रत्येक गोष्टी मध्ये, प्रत्येक घटनांमागे काही ना काही उद्देश असतो...तो देव ..त्याच्या मनात काहीतरी चालु असतं. "मीच का ? " याचं उत्तर काही दिवसांनी जेव्हा आपण त्या दु:खातुन बाहेर पडतो तेव्हा समजतं. पण एक सांगु...अशा प्रसंगी सुद्धा स्वताला ढळु न देणं हेच खरं कौशल्याच असतं. लोणावला पुणे लोकल ने प्रवास केझ्या पण या वेळेस तो पुन्हा एकदा करेन आणि तुझ्या नजरेतुन बाहेर पाहण्याचा प्रयत्न करेन :-)

बा़की, या पोस्ट साठी फक्त 'स्त्री'जमाती कडुनच प्रतिक्रिया का मिळत आहे हे ला कोडं पडलं आहे.

Ajay Sonawane said...

अनुजा: मी प्रतिक्रिया नियंत्रीत न करताच पब्लिश करतो. तरीपण माहिती दिल्याबद्दल तुझे आभार !

-अजय

Anonymous said...

Hehe, May be becoz a woman can understand feelings better than a man.

Ajay Sonawane said...

@मनातुनः पुन्हा एका मुलीचीच प्रतिक्रिया...
तुझं म्हणणं बरोबर आहे पण फीलींग्ज पुरुषांनाही असतात बरं का ?

Ajay Sonawane said...

Navneet Dandekarakadun aleli comment

------------------------

Hey I visit your Blog I like it very much. Mala Itka sang ki "Phoonkar" is book na as per my Knowledge.
Can I get such maters from that book? Please inform me if there is any website.

----------------------

सिद्धार्थ said...

काय प्रतिक्रिया द्यावी कळतं नाही. मी ही असाच कन्फ्यूज़ असतो हल्ली. मला खरचं प्रॉब्लेम आहेत की मी उगाच बाऊ करतोय हा मोठा प्रश्न पडलाय.
असो लेख खूपचं छान आणि प्रगल्भ झालाय.

Ajay Sonawane said...

@ सिद्धार्थः ...म्हणुन म्हणतो बोला, काहीतरी बोला, स्वताची दु:ख, तो राग, ती वेदना बाहेर आणा. सांगा , कुणाजवळ तरी शेअर करा. अरे ही दु:ख हे प्रश्न काही दिवसांचेच पाहूणे असतात. नंतर पुन्हा सारं सुरळीत होईन. पुन्हा एक नवीन पहाट तुझ्या आयुष्यात येईन. माझ्या खुप खुप शुभेच्छा तुला !

अशीच भेट देत रहा.

-अजय

Ujwala Jadhav said...

Khupach chan ahe ha lekh. Jakham jar khol var asel tar ticha vran ayushyabhar rahato.. tasech manala lagaleli jakham hi kholvar asel tar tyachya vedana ayushhabhar rahatat..