Friday, July 23, 2010

शुन्य

बरयाच वेळा असं होतं की आभाळ भरुन येतं, सोसाट्याचा वारा सुटतो, विजा कडाडतात, पावसाचे सुरुवातीचे चार थेंब पडतात आणि मातीचा सुगंध दरवळायला लागतो. पण एवढं होऊनही पाऊस मात्र येत नाही. काळे ढग न बरसताच तसेच पुढे निघून जातात. आपण त्या ढगांकडे सुक्या सुक्या नजरेने पहात बसतो. कोरडेच ढग ते, त्यांना ओलावा काय समजणार ? माझंही गेले काही दिवस त्या काळ्या ढगांसारखंच होत होतं. विचार डोक्यात भरून यायचे पण लिहिण्याची उर्मीच येत नव्हती. बरसल्याशिवाय मो़कळेपण नाही आणि बरसायला वातावरण साथ देत नाही. मी दर वेळेस असाच ब्लॉग उघडून न बरसताच निघून जायचो. कधी अगदीच खाली तर कधी थोडे फार शिंपडून. मी पण त्या पावसासारखाच, आला आला म्हणून वाट पहायला लावणारा. दोघेही...कधी सुके सुके आणि कधी बरसून ओले. आज मात्र तो बेभान होऊन बाहेर बरसतोय, काळ्या डांबरी रस्त्यावर उतरून तो नाचतोय, खाच-खळग्यात भरून तो ओसंडून वाहतोय, पानां-फुला-झाडावरती थेंब बनून पसरतोय. समोरचा तो डोंगरमाथा काल उघडाबंब होता, आज मात्र तो स्वताचं हिरवं रुपडं सगळ्यांना दाखवत फिरतोय. त्या पावसाचं पाहून मग मी ही ठरवलं की आपण ही आज असंच मनसोक्त, मनमुरादपणे बरसायचं, मनाच्या तंबोरयाच्या तारांना आज हलकंच छेडायचं, कानाच्या पडद्यांना थोडावेळं बंद करून जे काही सुर निघतील त्यांना अलगदच कागदावर उतरावयचंय, शब्दावाटे पसरायचं आणि एक विचार म्हणून रुजायचं. काल तो कुठेच नव्हता, आज मात्र सगळीकडे तोच तो आहे. माझंही असंच आहे, काल माझं काहीच अस्तित्व नव्हतं, आज सुद्धा अगदी ते नावालाच आहे पण असं जरी असलं तरी उद्याच्या दिवसावर फक्त माझंच नाव कोरायचंय. तळपणारया सुर्याला झेलताना धरणी फाटली तरी पावसाची वाट पाहताना ती कधी थकत नाही, ढग इथे येतात तेव्हा ते कधी हजारो मैलांचा विचार करत नाही, वाहणारी नदी कधी समोरच्या अडथळ्यांना घाबरत नाही, मग मी कशाला कुणाला घाबरू ? आव्हानांशिवाय आयुष्याला मजा नाही हे अगदी खरं. देवापुढे मी जेव्हा डोळे मिटून, हात जोडून उभा राहतो तेव्हा मी कधीच मला गाडी, बंगला, ए॑शोआराम असलं काहीच मागत नाही. माझं नेहमीचं एकच मागणं असतं आणि ते म्हणजे देवा मला दररोज नवनवीन आव्हानं दे. प्रगती जर साधायची असेन तर आव्हानांचा मुकाबला करण्याशिवाय पर्याय नाही. मला बाकी काही नको, तू मला फक्त दररोज एक शुन्य दे, त्यातून पुन्हा सगळं काही उभारायचं काम माझं. देवा, ए॑कतोयस ना तू ?

-अजय

(...डायरीच्या पानांतून)

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.काटकोन
२.च्या आयला
3.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

15 comments:

Meera said...

खूप सुंदर लिहीलं आहेस !!!
हे अगदी खरं आहे की आव्हानांशिवाय जगण्याला मजाच नाही.

आनंद पत्रे said...

जोरदार कमबॅक....
जवळपास तीन महिण्यांनंतर...
अतिशय सुंदर लिहिलं आहेस.

Anuja Khaire said...

हा खूप वेगळ्या विषयावरचा ललितलेख आहे! छान लिहील आहे!शेवटच वाक्य तर खूप सुरेख!!

Anuja Khaire said...

हा खूप वेगळ्या विषयावरचा ललितलेख आहे! छान लिहील आहे!शेवटच वाक्य तर खूप सुरेख!!

Anuja Khaire said...

हा खूप वेगळ्या विषयावरचा ललितलेख आहे! छान लिहील आहे!शेवटच वाक्य तर खूप सुरेख!!

yog said...

mast..

Ajay Sonawane said...

मीरा, आनंद , योग : धन्यवाद
अनुजा: त्रिवार धन्यवाद :-)
लवकरच मी काहीतरी नवीन प्रकारचा लेखन ब्लॉगवर टाकायचा विचार करतोय. असं काही जे मी कधीच या अगोदर लिहिलेलं नाही.

-अजय

मीनल said...

अरे वा, तुझं लिखाण परत ब्लॉगवर बघून बरं वाटलं.. लवकर नविन पोस्ट येऊ देत!

मनमौजी said...

जबर्या....खुप सुंदर लिहलय...अप्रतिम!!

Pankaj said...

अजय, खुपच छान लिहलय..शेवटचा वाक्य खुपच छान...आणि तू शून्यातून खूप काही मिळवला आहेस..ऑल द बेस्ट...

Ajay Sonawane said...

मनमौजी : धन्यवाद्,
पंकजः तुला तर माहितच आहे की मी शून्यातून सगळं काही पुन्हा पुन्हा सुरु करण्याच्या बाबतीत किती वेडा आहे ते आणि माझं नशीब पण असं आहे ना की मला ते नेहमीच अशी संधी वारंवार देत असतं. मी न थकता पुन्हा पुन्हा शून्यातून सगळं काही सुरु करणार कारण माणूस स्वप्नावर जगतो, पाहिलेली स्वप्न पुर्ण करण्यासाठी तो झटतो. मी त्याला अपवाद कसा असणार ना. गुलजार चे काही बोल आठवले यानिमित्ताने...

जागे है रात भर हमें, कुछ और सोने दो
थोडी सी रात और है सुबह तो होने दो
आधे अधुरे ख्वाब जो पुरे ना हो सके
एक बार फिर से निंद में वो ख्वाब बोने दो...

-अजय

GanesH said...

Ajay Khhop chan.........

Ujwala Jadhav said...

hupach chan lihil ahes..Prattek diwasakade mothya umidena pahayala hava, nahitari tohi diwas jivanatun nighun janarach asato.. Lekhatun vachnaryansathi chan msg thewala ahes.. thanks!

Ajay Sonawane said...

Uj: hmm, pratyek diwas kahina kahi shikvatach asto. barech diwsanantar blogvar yene kelas, pratikriyekarita ani shubhechekarita dhanywad !

-Ajay

prasanna said...

dosta tu manapasun ki rhadayapasun lihitos kalat nahi pan lekhan apratim ahe. jiyo mere bhai!