Monday, February 8, 2010

परीस की सोनं

आई सोडून सर्वात पहिल्यांदा जर मी कुठल्या स्त्रीकडे स्वताहून आकर्षित झालो असेन तर त्या म्हणजे माझ्या तिसरी इयत्तेतल्या बाई. तेव्हा माझं वय ते काय होतं फक्त ८ वर्षे. ते प्रेम नव्हतच मुळी ते होतं फक्त एक आकर्षण. प्रेम वगैरे समजायचं माझं तेव्हा वय ही नव्हतं. मला मात्र त्या बाई फार आवडायच्या. मला अजून ही आठवतंय त्यांच्या पिरीयडला मी अगदी मन लावून वर्गात बसत असे. त्यांचं एकेनएक वाक्य मी कानात साठवून ठेवत असे. त्यांच्या पुढे मागे करणं, पिरीयड संपल्यावर त्यांच्या मागे मागे जाऊन त्यांना उगाचच प्रश्न विचारण, त्यांनी दिलेला अभ्यास वेळेवर पुर्ण करण, त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी मन लावून करणं असे सगळे प्रकार मी त्यावेळी केले होते. अजुनही, खुप वेळा अगदी डोक्याला ताण देऊनही मला त्यांचा चेहरा आठवत नाही. आठवतं ते त्यांचे मंजुळ बोलणं, त्यांची ती शिकविण्याची पद्धत आणि त्यांचं ते प्रेमानं समजवून सांगणं. म्हणजेच मला त्यांच्या चेहरयाने कधीच भुरळ घातली नव्हती, त्यांच्या वागण्या बोलण्यानेच मला खूप इम्प्रेस केलं होतं. त्यामुळेच 'लव्ह अ‍ॅट फस्ट साईट' वर माझा कधीच विश्वास नाही. एका नजरेत जे होतं ते खरंच प्रेम असू शकतं का ? प्रेम निर्माण होण्यासाठी सहवासाची आवश्यकता नसते का ? आकर्षण आणि प्रेम या दोन तरल भावनांना वेगळं करणारी अजून एक अशीच भावना असते आणि तिला 'ओढ लागणे' असं म्हणतात. काही लोक या ओढीलाच प्रेम समजतात. माझ्या मते आकर्षणाचं रुपांतर अगोदर ओढीत आणि मग सहवास लाभल्यावर प्रेमात होतं.

या जगात देवाने सर्वात सुंदर अशी कुठली गोष्ट बनवली असेन तर ती म्हणजे 'स्त्री', 'नारी'. या माझ्या विधानावर समस्त पुरुषमंडळी एकसाथ हात वर करुन मला अनुमोदन देतील यात शंकाच नाही. स्त्री म्हणजे सौंदर्य आणि सौंदर्य म्हणजेच स्त्री असं आतापर्यंतच समाजात रुळलेलं समीकरण. पण एखादी स्त्री जेव्हा तुम्हाला आकर्षित करते तेव्हा तिचं शरीर, तिचा चेहरा यापेक्षा अजून काही गोष्टी तुमच्या मनात नक्कीच घर करून बसतात. माणुस हा समोरच्याचा शरीराबरोबर जगतो की विचारांबरोबर ? समोरच्याचं शरीर त्याला आकूष्ट करतं की त्याची विचारसरणी, त्याचा स्वभाव ? चेहरयाबरोबर जगणारे मला माहीत नाही, मी विचारांबरोबर जगतो. ज्याचे विचार सडलेले आहेत त्याचं शरीर कितीही टवटवीत असला तरी काय फायदा ? कडुलिंब कितीही कडु असला तरी तो गुणकारी असतो, कोकीळ कितीही काळी असली तरी तिचा गोड गळाच लोकांना वेड लावतो, चकाकणारं सोनं प्रत्येकानेच पाहिलय पण परीस कसा दिसतो हे अजून कुणालाच माहित नाही. तरी पण त्याच्या अंगी असलेल्या गुणधर्मामुळेच तो सगळ्या जगात ओळखला जातोच ना. माणसाच्या अंगी असलेल्या कलागुणांमुळेच तो ओळखला जातो, ना की त्याच्या बाहयरुपावरुन. समोरच्याला नीट ओ़ळखायचं असेन तर त्याच्या बाह्यररुपावर जाऊच नये, त्याच्या चेहरयामागचा रंग पहावा. उगाचच संत म्हणून गेले का "का रे भुललासी वरलीया रंगा...". अंगभर घालून मिरवायचं असेन तर सोनं घ्यावं आणि आपलं आयुष्यच बदलून टाकायचं असेल तर परीस जवळ बाळगावा. शेवटी चॉईस तुमची, तुम्हाला काय हवंय परीस की सोनं ?

-अजय

16 comments:

सचिन जोशी said...

वा छान, १४ फेब. ची स्पेशल पोस्ट म्हणायची का ही?

Anonymous said...

वाह...छान आहे पोस्ट. प्रत्येकाला असे अनुभव असतातच, माझ्या बाबतीत पण होता एक :)

Anonymous said...

खूप छान!! असे विचार म्हणजे प्रगल्भ व्यक्तिमत्वाची निशाणी आहे. तुमचे मनापासून अभिनंदन.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

अजय, तुझ्या विचारांशी मी पूर्णपणे सहमत आहे. पहिल्या नजरेत होतं, ते प्रेम नसतंच मुळी! ती असते त्या व्यक्तीबद्दल वाटणारी ओढ. सहवासातूनच प्रेम निर्माण होतं. प्रेम म्हणजे दुस-याच्या निव्वळ चांगुलपणावर प्रेम करणं नाही, तर दुस-याच्या दुर्गुणांना सुद्धा मान्य करून, त्या व्यक्तीला आहे तसं स्विकारणं म्हणजे प्रेम.

linuxworld said...

apratim....!!!!

सुभाष मायंगडे said...

Khupach Chhan, I Like It. God Bless You.

snehal said...

fakt vachyala chan ahe, real life madye anayla thode avdhad ahe.

Ajay Sonawane said...

धन्यवाद सगळ्यांना, कांचन ताई अगदी व्यवस्थित समजावल प्रेम म्हणजे काय ते ?

स्नेहलः एवढा निगेटीव्ह दूष्टीकोन का बरं ? खरया आयुष्यात आणायला अवघड आहे पण अशक्य नाही गं. बदल होण्यासाठी वेळ लागतो जरूर. समाजात आतापर्यंत जे बदल झाले ते टप्याटप्यानेच झाले ना? मग हा ही बदल होईन जरुर. नशिबाशी लढणं एकवेळ सोपं पण स्वताशीच लढण फार अवघड. म्हणून विश्वासच महत्त्वाचा आहे. मागेच म्हटल्याप्रमाणे, आपल्याला कोणी तरी इथे खेळवीत असतो, काही जण त्याला परमेश्वर म्हणतात तर काही जण नियती. आपण फक्त प्यादे...एका वेळेस एकच घर चालायचं.

-अजय

आनंद पत्रे said...

अजय, तु विचारांना योग्य शब्दांत खुप सहज पकडतोस.
लेख मला आवडला हे वेगळं सांगायची गरज नाही..असाच मस्त लिहित रहा...

भानस said...

अजय,विश्लेषण छान केले आहेस.तुझ्याशी सहमत आहे.बरेचदा चेहरा किंवा व्यक्तीचे बाह्यस्वरूप हेच प्रथमत: कुठल्याही व्यक्तीला आकृष्ट करते. मग ती गालावरची खळी असेल किंवा चेह~यावर पसरून दुस~यालाही त्याची लागण करेल असे हसू असेल. गोड आवाज असेल...कधी देहबोलीही भुरळ पाडते, थोडक्यात त्या व्यक्तीकडे वारंवार लक्ष गेल्याशिवाय तिचे इतर खरे गुण कसे दिसणार? मग कधी ते परीस निघतात तर कधी कोळसा.लक्ष जाण्यासाठी व्यक्ती सुंदर असायला हवी असे नसून तिच्यात तुम्हाला काही क्षण खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य हवे. आई-वडील-मुलं-आप्त..या सगळ्यांवर आपण चेह~यापलिकडे जाऊनच प्रेम करतो कारण त्यांचे दुर्गुण गृहित असतात.याव्यतिरिक्त नात्यात( मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी... जेव्हां प्रेमात पडतो तेव्हां सगळ्यासकट स्विकार करू शकलो तर ते प्रेम नाहितर निव्वळ वरल्या रंगास भुलणे.

अपर्णा said...

अजय छान लिहिलंस..नेहमीप्रमाणे भावनांना खूप अचुक शब्दात पकडतोस रे...
एक चूक सुधारशील कोकीळ पक्ष्यामध्ये जो गोड गळा असतो ना तो male असतो आणि मादी कोकिळ नरापेक्षा तशी कुरुप आणि गात नाही...साधारण ओरडल्यासारखा आवाजाची असते..आपल्या माणसांसारखं पक्ष्यांच्या जगात नाहीये रे तिथे सौंदर्याचं दान निसर्गाने जास्तीत जास्त ठिकाणी नराला दिलंय..असो...त्यामुळे काही तुझ्या लेखाचं मोल कमी होत नाही पण मी जरा सिरियस पक्षीनिरीक्षन करायचे नां त्यामुळे उगाच खूपलं...कळावे लोभ असावा....

Happy V Day in advance...:)

Madhuri Kulkarni said...

khoop chhan lihile aahes. mi suddha tuzya wicharanshi sahamat aahe. tuze wichar wachun phar chhan watale. Ashyach post takat raha. Happy V' Day.

Maithili said...

Khooop Chhaaan lihilay......
Mastach.......
Mala suddha vatate love @ first sight ase kahi nastech muli te tar akarshan aste phakt.....
Baki post sahiye...... :)

Prakash Ghatpande said...

लेख भावुक! पण आवडला.

Ajay Sonawane said...

आनंद, प्रकाश, मैथिली, माधुरी : धन्यवाद, भावुक आहे लेख थोडा, पण डायरीच्या पानावरच्या सगळ्याच गोष्टी या फक्त मनातल्याच असतात ना म्हणून...

भानसः तुझं बरोबर आहे. बरीच नाती अशी असतात त्यांच्यावर आपण न पहात प्रेम करता. आई वडील हे सुद्धा असेच.

अपर्णा: चूक घेतली, मग फिमेल कोकीळेला मराठीत काय म्हणतात ? की नर कोकील आणि मादी कोकीळ असं म्हणतात. तसं असेन तर मला लता मंगेशकरांना गानकोकीळ का म्हणतात. थोडा कन्फूज झालोय खरा, तुझ्या उत्तराची वाट पहातोय.

अपर्णा said...

अरे कोकीळ (मेल) आणि कोकिळा(फ़िमेल)... पण तू जेव्हा गाणारी म्हणतोस त्याऐवजी गाणारा कोकीळ असं म्हणं इतकंच...आता लता मंगेशकरांना गानकोकीळ म्हटलं पाहिजे पण फ़क्त त्या स्वतः स्त्री म्हणून गानकोकीळा केलं असावं असं वाटतं...ही ही...जाऊदे उगाच इतकंही गंभीर नको व्हायला..पण तरी....:)