Tuesday, February 2, 2010

२ फेब्रुवारी

कालपासून पोटात फक्त मोसंबी ज्युस, एक कप कॉफी, नाना तह्रेचे प्रश्न व एक हुरहुर यांचंच वास्तव्य होतं. अजूनही त्या उपवासाचा शेवट झालेला नाही. आजचा दिवस हा बराच संमीश्र भावनांनी भरलेला होता. सकाळी पाच पासून मी अगदी आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कुणा ना कुणाशी बोलत होतो. लोकांना उत्तर द्यायची जबाबदारी नेहमी माझ्यावरच का येते ? मी खुप सारं खरं बोलतो हा माझा गुण की वैगुण्य ? पुरुषाला मन, भावना नसतात असं लोकांना का वाटतं ? मनाच्या कुठल्यातरी कोपरयात दडून बसलेले असले प्रश्न मग माझ्या मनाच्या पूष्ठभागावर येऊन हातात हात घालून नाचायला लागतात. मी ही त्यांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत नाही. काही गोष्टी अनुतरीत्तरच राहिलेल्या चांगल्या, उत्तर शोधायचा प्रयत्न केल्यावरच किंवा सापडल्यावरच जास्त त्रास होतो असा माझा अनुभव. या जगात सर्वात मोठं जर कुठलं दु:ख असेन तर ते अपेक्षाभंगाच हे मी कुठतरी वाचलं होतं. पण त्यापेक्षाही जास्त मोठं दु:ख हे सदभावनेने केलेल्या कामावर, घेतलेल्या निर्णयावर शंका घेतली जावी (वपुंनी म्हटल्याप्रमाणे) हेच आहे असं आज वाटून गेलं. समोरच लोक असे चटकन बदलताना, त्यांचे स्वभाव इतक्या लवकर बदलताना पाहिल्यावर मी विश्वास ठेवलेला तो हाच का असं कुठंतरी वाटू लागतं. मी मात्र समोरच्यावरचा माझा विश्वास मात्र कधीच डळमळीत होऊ दिला नाही. ज्याला जीव लावला त्याला शेवटपर्यंत जीवच लावेन, ज्याच्यावर विश्वास ठेवला तेवढाच विश्वास कायम ठेवेन. म्हणूनच मला पराभूत होण्यापेक्षा हतबल होण्याचीच जास्त भीती वाटते. पराभव जिव्हारी लागतो आणि हतबलता माणसाला निराश करते. पराभव जिव्हारी लागलेला चांगला,माणूस जिंकण्यासाठी पुन्हा तयारीला तरी लागतो. पण हतबलता नैराश्य आणते. आणि आज मी असाच हतबल आहे.

(...डायरीच्या पानांतून)

-अजय

7 comments:

snehal said...

apeksha bhang ani parithiti mansala badalte. te thodyavela purte aste tyamule jast tension n ghetele bare. (software engineers la heart cha tras hoto barr ka future madye) manun kalji gyavi. ;p

sarva kahi sanik aste.

Unknown said...

विचार कसे रे इतके व्यवस्थित शब्दात पकडतोस......

Anonymous said...

स्वता:च्या मनाशी ठाम रहा. खूप प्रामाणिक आहेस. आपल्या मताशी, विचारांशी आपणच सहमत असावे म्हणजे कसे ऑल इज वेल होते. सबुरी ही मनाच्या स्वतःवर असलेल्या श्रद्धेचेच रूप आहे.

Anonymous said...

स्वता:च्या मनाशी ठाम रहा. खूप प्रामाणिक आहेस. आपल्या मताशी, विचारांशी आपणच सहमत असावे म्हणजे कसे ऑल इज वेल होते. सबुरी ही मनाच्या स्वतःवर असलेल्या श्रद्धेचेच रूप आहे.

Ajay Sonawane said...

स्नेहल, तन्वी आणि अनुश्री: धन्यवाद !

-अजय

linuxworld said...

अगदी मनातले बोललात ........बाकी लेख मात्र तुम्ही भन्नाट लिहता......

भानस said...

अजय,काही प्रश्नांची उत्तरे कालांतराने सापडतात. शिवाय १+१=२ इतके साधे-सरळ समीकरण सगळीकडेच नसते ना....