Wednesday, December 30, 2009

च्या आयला

'च्या आयला' ही काही शिवी नाही; ते एक एक्सप्रेशन आहे. जसं तुम्ही आई गं, बापरे किंवा आईशप्पथ म्हणता तसंच 'च्या आयला' असं म्हणणं शिवी नसून ते एक एक्सप्रेशनच आहे. आणि समजा बोलता बोलता एखाद्यानेच दिलीच शिवी तर कुठं बिघडलं? मिळमिळीत जेवण असेन तर आपण ठेचा किंवा चटणी मागवतोच ना तसंच शिवीचंही आहे. माझ्या मते तर शिवी हा भाषेचा एक दागिना आहे. होय , 'शिवी भाषेचा एक दागिनाच आहे' हे विधान भल्याभल्यांना भाषातज्ञांना चकीत करु शकतं. भाषेला जर कशाने शोभा येत असेल तर त्यात शिवी सुद्धा येते. कुठलीही भाषा ही शिवीविना अपुरी आहे. जगाच्या पाठीवर अशी एकही भाषा तुम्हाला शोधून सापडणार नाही ज्यात शिवी नाही. शिवी कुठेही लिखीत स्वरुपात नसते म्हणजेच जसं पाककूतीच पुस्तक, योगासनांचं पुस्तक, रांगोळ्याचं पुस्तक असतं तस शिवीचं पुस्तक कुठे असतं का ? नाही, मग तरीही या शिव्या एका जनरेशनकडून दुसरया जनरेशन कडे जातातच ना, त्यापण अगदी जशाच्या तशा. कधीकधी तर त्या अधिकच अ‍ॅडव्हान्सही होतात. शिवी हा प्रकार कुठल्याही पुस्तकात लिखीत स्वरुपात नसतानासुद्धा अगदी प्रत्येकाच्या तोंडी रुळतो यातच शिवीचं साधेपण आहे. शिव्या कुणालाही शिकवाव्या लागत नाही एवढ्या त्या सोप्या असतात. लहान मुलाला जर थोडावेळ मुलांच्यात खेळायला सोडल तर तो बाहेर जाऊन एखादा श्लोक शिकण्याअगोदर एखाद्याने दिलेली शिवीच लवकर शिकतो. पाण्यात पडल्यावर जसं पोहायला येतं तसंच मूल बाहेर गेलं तर ते शिवी शिकूनच परत येतं. याचाच अर्थ शिवी शिकण अगदी सोपी गोष्ट आहे. जसंजसं वय वाढतं तसतसं ह्या शिवीमधले कर्ते, क्रियापदं आणि विशेषण बदलतात. वयाबरोबर शिवीमधली धार जर वाढली नाही तर आजुबाजुचे लोकांकडुन टिंगळटवाळी होऊ शकते.

आता तुम्ही म्हणाल मी शिवी शिकलो पण त्याचा उपयोग काय ? अहो शिवी ही मल्टीपरपज असते. कुठल्याही भांडणाची सुरुवात आणि शेवट शिवीशिवाय होऊच शकत नाही. भांडणात समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात जो राग असतो तो साध्या शब्दात व्यक्त करणं एवढं सोपं नसतं, त्यासाठी शिवीसारखंच हत्यारच हातात घ्यावं लागतं. अहो शिव्या जर दिल्या नाहीत तर भांडणं भांडण वाटणार नाहीत. १०० वाक्य सुद्धा भांडणात जो इफेक्ट साधु शकणार नाहीत तो इफेक्ट एका ओळीची शिवी साधते. शिवी जशी रागाने शत्रू ला देतात तसं मित्राला दिली तरी चालते. म्हणजे तुम्ही जर खुप लाडात आलात तर मित्राला प्रेमाने शिवी देऊन संवाद सुरु करु शकता. कोल्हापुर मध्ये हा प्रकार भारी लोकप्रिय आहे. भांडणाच्या आणि प्रेमाच्या शिव्या कधीकधी सारख्या सुद्धा असु शकतात फक्त त्यावेळचं आवाजातलं टोनींग आणि एक्सप्रेशन वेगळे असतात. शिवी देऊन तुम्ही दु:ख, आश्चर्य, प्रेम अशा सारया भावना व्यक्त करु शकता. फक्त समोरच्या व्यक्तीला सुद्धा शिवीमागचा 'तो' अर्थ ज्ञात असावा. शिवीचा अर्थ समजुन घेण्यापेक्षा त्याच्यामागच्या भावना ओळखण अधीक महत्त्वाचं. शिव्या या सर्व वर्गातील आणि वयोगटातील लोक देतात. शिव्या या गावच्या चावडीपासुन ते अगदी विधानभवन, संसदभवन ते फुटबॉल आणि क्रिकेट्च्या मैदानावरही दिल्या जातात. आजकाल शिव्यांचा उपयोग सिनेमामध्येही होऊ लागलेला आहे. आजकाल कुठलाही सिनेमा घ्या त्यात सीन प्रभावी वाटावा म्हणून मुद्दाम शिव्या पेरल्या जातात. गदर मधला सनी देओलचा पाकिस्तानातला सीन असुद्यात किंवा नाना पाटेकराचा अब तक छप्पन असुद्यात, शिवीचा वापर सिनेमामध्ये सर्रासपणे केला जात आहे. एवढंच काय मध्यंतरी मराठीमध्ये मध्ये शिवीवरुन सुरुवात होणारं गाणं सुद्धा मी ए॑कलं होतं. इथुन पुढे जाऊन एखादी शिवी हेच टायटल असलेला सिनेमा आला तर त्यात आश्चर्य वाटु नये. माननीय ठाकरेंसारखे नेतेसुद्धा आपल्या भाषणामध्ये शिव्यांचा वापर करुन लोकांच्या टाळ्या मिळवतात. याच्यामुळेच शिवीकडे सध्या एक प्रभावी माध्यम म्हणून लोक बघायला लागलेत की काय अशी मला शंका येऊ लागली आहे.

शिवीचे तसे अनेक प्रकार आहेत. काही शिव्या ह्या सौम्य प्रकारात मोडल्या जातात तर काही उग्र तर काही अति उग्र. जेव्हा जशी गरज तेव्हा तसा उपयोग. शिव्या मध्ये नेहमी बापाला मध्ये न आणता आईलाच का आणलं जात हे मला माहित नाही. शिव्या देण्याचा सेन्स हा प्रत्येकामध्येच असतो. कोणी मनातल्या मनात शिव्या देतो तर कोणी खुलेआम. कोणी रागात असताना दात ओठ खाऊन शिवी देतो तर कुणी एखाद्याच्या अंगावर धाऊन जात शिवी देतो. शिव्या देणे ही सुद्धा एक कला आहे. उगाचच संदर्भहीन शिव्या देऊन जमत नाही. शिवी दिल्यावर जर अपेक्षित अर्थ साधला गेला नाही तर शिवी देण्याचा काय फायदा ? शिवी देणे ह्या प्रकारामध्ये मुलींपेक्षा मुलेच जास्त वरचढ असतात असं आतापर्यंतच्या अभ्यासावरुन लक्षात येत आहे. मुलीं सुद्धा शिव्या देतात पण त्या मुलांएवढ्या तिखट नसतात. मुलींच्या शिव्या ह्या चिंचा, बोर आणि आवळ्याप्रमाणे आंबट, तुरट आणि काहीवेळेस बेचव असतात. ग्रामिण भागातल्या स्त्रिया मात्र याला अपवाद असतात असं म्हणता येईन. त्यांची शिव्यांमधली जाण भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावणारी असते. दारु पिल्यावर माणसाच्या जिभेवर शिवी अवतरते किंवा त्याला शिवी प्रसन्न होते असंही दिसुन आलेलं आहे. बहुतेक दारुचा अन शिवीचा कुठेतरी, काहीतरी संबंध असावा. काही लोक ही शिवीअ‍ॅडीक्ट असतात म्हणजे त्यांचं कुठल्याही वाक्य शिवीविना पुर्ण होत नाही. आजकाल शिवीमध्ये पुढच्याला कामही सांगण्याची प्रथा पडलेली आहे. ही शिवी देण्याची नवीन प्रथा सामान्यता शेतकरी आणि कोळी लोकांकडुन लोकांच्यामध्ये पसरली असावी असा माझा तरी कयास आहे.

इतिहासात डोकावला असता, चाकाचा, विमानाचा किंवा फोन चा शोध कधी लागला हे जसं निश्चीतपणे सांगता येतं तसं शिवीचा शोध नक्की कधी लागला हे सांगता येणं अवघड आहे. पण जेव्हा कुठलीही भाषा विकसीत होत असते तेव्हा त्याच्या अगदी सुरुवातीच्याच टप्याला शिवीचा शोध लागली असण्याची शक्यता आहे. पहिली शिवी कोणी कोणास दिली असावी याच्यावर आपल्या इतिहाससंशोधकांनी संशोधन करणे गरजेचं आहे. शिवीचा विकास कसा झाला, या विकासाला कोणी कसा हातभार लावला, शिव्या कशा पद्धतीने लोकांच्या मध्ये रुळल्या गेल्या आणि त्या तितक्याच लवकर प्रसिद्ध कशा झाल्या ही माहिती लोकांसमोर येणं गरजेची आहे. जसे साहित्यसंमेलन वा कवितांचे संमेलन होतात तसेच शिव्यांचे संमेलन होणं गरजेचे आहे. याच्याहीपुढे जाऊन शिव्यांसाठी खास स्पर्धा भरवल्या जाव्यात. शासन दरबारी शिव्यांची नेहमीच उपेक्षा झाली आहे. त्यामुळे शासनाने शिव्यांच्या आणि पर्यायाने भाषेच्याच विकासासाठी खास लक्ष देणं गरजेचं आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, अशीच विविधता शिव्यांच्या बाबतीतही आपल्याला इथे पहायला मिळते. कोल्हापुरी शिव्या आणि विदर्भातल्या शिव्या यामधला भाव जरी सारखा असला तरी त्यात वापरलेले शब्द, टोनींग किंवा शोधलेले वीक पॉईंट यात भिन्नता आढळते. सरकारने यासाठी लोकांना एक व्यासपीठ देणं गरजेचं आहे जिथे येऊन लोक आपल्या शिव्या एकमेकांशी शेअर करतील आणि आपल्या ज्ञानात भर टाकतील. महाराष्ट्राच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षात महाराष्ट्र शासनाने किमान हे एक तरी लोकोपयोगी काम करुन स्वताला लोकांच्या शिव्यांपासुन वाचवावं एवढीच एक छोटी अपेक्षा.

-अजय

(या वेळेस शिव्यांवर लिहीण्याचं धाडस मी केलेलं आहे. शिवीवर निबंध लिहीतानासुद्धा कुठेही शिवीचा वापर न करण्याची काळजी मी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक वाक्यामध्ये शिवी वा शिव्या हा शब्द आणुन एक वेगळाच परिणाम साधण्याचा प्रयत्नही मी इथे केला आहे.)


---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.चार गोष्टी.
२.उद्धव ठाकरेंना पाठविलेले पत्र, जसेच्या तसे.
३.मी आणि माझी फिल्लमबाजी
४. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

40 comments:

अपर्णा said...

अजय, आज एकदम च्यामारी धरून फ़ट्याक....अनिकेतच्या निबंधांच्या ब्लॉगमध्ये नेऊन ठेव ही पोस्ट.....

आनंद पत्रे said...

अजय, तुझ्या...तर..
एकदम मस्त जमलयं :)

Yawning Dog said...

Haha bharee :D

Gouri said...

ekhadya bhashet shivya deta yene mhanaje tya bhashevarachya prabhutvachee pavatee :)

Anonymous said...

sahee.......अपर्णाला दुजोरा......बाकि च्यामारी वगैरे(कोणते ते स्पेसिफाय करत नाही)साधे सुधे शब्द आम्ही पण वापरतो बरं का!!!!!!!!!!!

Anonymous said...

sahee.......अपर्णाला दुजोरा......बाकि च्यामारी वगैरे(कोणते ते स्पेसिफाय करत नाही)साधे सुधे शब्द आम्ही पण वापरतो बरं का!!!!!!!!!!!

aativas said...

"शिव्या मध्ये नेहमी बापाला मध्ये न आणता आईलाच का आणलं जात हे मला माहित नाही." या तुमच्या वाक्यावरून या विषयामागे बरच काही दडलेल आहे हा अंदाज तुम्हालाही आहे हे लक्षात येतय.

असो. लेख चांगला जमलाय पण त्यामागच तत्त्व मला जरा ’चिंताजनक’ वाटल - अस मी म्हटल तर तुमची हरकत नसावी.

साधक said...

मस्तच रे अजय चा ब्लॉग जोर पकडू लागलाय.

अभिजीत said...

फार छान आणि संयमाने लिहिलेला लेख आहे.

Deepak said...

आणखी एक सॉलिड पोस्ट... शिवीच्या बाबतीत एवढा इतिहासपुर्वक विचार कधी केलाच नव्हता.. ;)

Pankaj - भटकंती Unlimited said...

च्या मायला, अज्या***, भारीच जमलंय रे शिवी पुराण. तुला भाषाबहाद्दर आणि ’शिवीपंडित’ अशाच पदव्या द्यायला पाहिजेत. एका ट्रेकला आम्ही शिव्यांच्या भेंड्या खेळल्याचे मला आठवतंय :-) फार मजा आली होती.
पण पहिली शिवी तोंडातून बाहेर पडली तेव्हा बसलेली थप्पड अजूनही आठवते राव.

Anonymous said...

छान पोस्ट, बराच विचार केलास बाबा.

बाकी ही पोस्ट आता बायकोला दाखवतो, मी जरा कुठे चुकुन च्यायला म्हणले की लगेच तिच्या दृष्टीने आमच्या मुलावर माझ्यामुळे वाईट परीणाम होत आहेत.

विक्रम एक शांत वादळ said...

'च्या आयला' हे माझ पेटेंत वाक्य बर का !
याचा सरस वापर आमच्या बोलण्यातून होतो काहीना आवडतो काहीना नाही आवडत हा भाग वेगळा
बाकी पोस्त एकदम झाक बर का :)

विक्रम एक शांत वादळ said...

hi link pahach

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE

Harshal said...

barr jhala tu ya vishayala tond phodalas te. Mi shivyana kadhich chuk manat nahi. shivya mhanje rag kinva bhavna tivr padhatine vyakt karnyacha marg ahe. ani bharpur rag ala astana jar aapan khup changlya changlya, mirchi jhobnarya shivya dilya tar aaple BP kami hote. tan susahya hoto ase sanshodhan mi paper madhe vachle ahe. majha ek mitr tar te katran wallet madhe theun asto.

Mi kaslahi dharbandh na balgta vattel tya shivya deto.

pan kharach kunala personally nahi det, paristithi la deto. tyane rag shant hoto. ashi majha anubhav ahe.

veerendra said...

लई भारी राव ... तुमी तर कमालच केली !

Mandar Joshi said...

च्या आयला.. एकदम फक्कड लिहील आहेस अजय भाऊ..

अनिकेत वैद्य said...

च्या मायला
अन बिस्कूट बापाला.

अनिकेत वैद्य said...

पु. ल. च्या रावसाहेबांची आठवण झाली.

मला एका मित्राने सर्व भारतीय भाषातल्या शिव्या असलेली excel sheet पाठवली होती. त्यात सर्व भाषातल्या शिव्या अन त्यांचे अर्थ आहेत.
कुणाला ती sheet हवी असल्यास मला मेल करा. पाठवतो.
माझा मेल आयडी vaidyaDOTaniATgmailDOTcom

Yogesh said...

च्यायला. . .१ नंबर आहे. . शिवी पुराण लय भारी झालय बघ!!!

Atul Yadav said...

Mitra....U just mentioned about Kolhapur....tikadchya 2-4 Shivya taklya astyas tar.....Dhaasu lihila aahes....:)

हेरंब said...

शिव शिव शिव... ;) .. हा हा हा .. लय भारी जमलय शिवी-महात्म्य

Ajay Sonawane said...

अपर्णा, आनंद, गौरी: धन्यवाद, माझ्या घरी च्या आयला म्हटलेलं चालत नाही, म्हणून मग हा सारा त्रागा. :-)

-अजय

Ajay Sonawane said...

वाय डी: आपल्या ब्लॉग आणि लिखानाच्या पुढे आम्ही काहीच नाही. मी स्वता तुझ्या ब्लॉग चा फॅन आहे. नवीन पोस्ट लवकरच टाका आता.

तन्वी: मुली च्या मारी म्हणताना ए॑कलय मी पण ते पण अगदी मंजुळ आवाजात. बा़की तु स्पेसिफाय न करता ही मला कळलं बरं का !

साधकः हो ब्लॉग जोर पकडतोय पण नवीन वर्षापासून लेखण बरंच कमी करेन असं ठरवलंय. वेळ नाही मिळणार तेवढा.

Ajay Sonawane said...

अभिजीतः हो रे खुप संयम बाळगला. बाकी माझी भाषा शिवराळ नाही पण चार पाच मोजक्या शिव्या तोंडात असतातच. घरी जो बोलताना संयम बाळगतो तोच इथे बाळगला. :-)

भुंगा: शिवी ला इतिहास आणि भुगोल दोन्ही आहे :-). जगाच्या कानाकोपरयात शिवी आहे आणि फार दिवसांपासुन.

अतिवासः चिंताजनक का वाटला याचं चिंतन सुद्धा करु आपण ? अगदी निर्भेळ आनंद लुटण्यासाठी लेख लिहीला. कॉमेडी मुव्हीतुन कुठला बोध मिळतो का, नाही ना ? तसंच.

Ajay Sonawane said...

पंकजः स्वागत आहे पंकज - भटकंती अनलिमीटेड महाराजांचं बेधूंद वर !

पंक्या :-), भेंडीची आयडीया सॉलीड बरं का, एकदा ट्राय करणार मी पण. बा़की आपल्या फोटो अल्बमचा मी फॅन आहे. एखाद्या भटकंतीमध्ये तुमच्याबरोबर जाण्याचा चान्स मिळाला तर भारी मजा येईन.

अनिकेतः बायकोला दाखव पोस्ट, पण माझ्यासहीत तुलाही याच्यामुळे चार शिव्या बसतील हे अगोदरच सांगतोय :-)
कुठल्या ***** हा बेधुंद ब्लॉग लिहीला वगैरे...

अनिकेत वैद्य said...

अजय,
बायकोला माहित्ये हे सगळ.
ज्या शिव्यांचे अर्थ तिला कळत नव्हते ते मी समजावून सांगितले.
बयकोला आधी शिव्या येत नव्हत्या. मी शिकवल्यात.


आपला,
(शिवराळ) अनिकेत वैद्य.

Ajay Sonawane said...

विक्रमः लिंक भारी आहे, मजा आली विकी वाचताना. ब्लॉग वर स्वागत आणि धन्यवाद.

हर्षलः शिवी देणे प्रत्येक माणसाचा मुलभुत अधिकार आहे असं मी पुढे जाऊन म्हणणार होतो पण इथे बाकीचेच कसले अधिकार असुन मिळत नाही. हा कधी मिळणार ना. शिव्या दे पण जरा आजुबाजुला पाहुन :-) नाहीतर पंचाईत ही होते.


वीरेंद्रः स्वागत आणि धन्यवाद.

मंदारः तुमची ऑरकूट रिक्वेस्ट मी चुकुन नो म्हणालो, माफ करा. पुन्हा रिक्वेस्ट पाठवा, स्वीकारतो.

मनमौजी: धन्यवाद साहेब. आपल्या शुभेच्छा आहेत म्हणून चालू आहे बघा.

अनिकेत : ती एक्सेल फाईल द्या पाठवून, एकदा नजर फिरवतोच जरा डेटाबेसवरुन. भेंड्या खेळण्यासाठी बरं मटेरीयल सापडल. पंक्या, ए॑कतोयस ना ?

Ajay Sonawane said...

अतुल यादवः धन्यवाद राजे. उशीर झाला कमेंटायला आपल्याला. दोन चार कोल्हापुरच्या शिव्या पण त्या वेळेलाच बाहेर काढेन.

हेरंबः धन्यवाद. शिवी महात्म्य मस्त शब्द दिलात. आवडला एकदम, आजपासून माझ्या शब्दकोशात अ‍ॅड केला तर चालेन ना ? :-)

सिद्धार्थ said...

वाह वाह, श्रीमंत अजय पंत, आम्ही बेहद खुश झालो हे शिवी पुराण वाचून. आत्ता तुम्ही समोर असता तर २ अर्वाच्य शिव्या हासडून आम्ही तुमचा सत्कार केला असता.

कोकणात जोपर्यंत समोरच्या माणसाच्या बोलण्यात तुमच्याविषयी 'भ'हर येत नाही तोवर तो सलगीत आला नाही हे समजावे. आणि शिव्या देता न येणार्‍याची कोकणात "येडxx आणि गावात नवा" अशी निर्भत्सना केली जाते.

Ajay Sonawane said...

सिद्धार्थः सिद्धार्थ पंताचं या पामराच्या ब्लॉग वर स्वागत असो. राजे आम्ही असा कुठला अपराध केला की ज्याची शिक्षा म्हणून तुम्ही आम्हाला अस्सल कोंकणातील ठेवणीतील शिवी हासडण्याचा मनोदय व्यक्त केलात.

बाकी को़कणाचा संदर्भ मी या लेखात द्यायला हवा होता पण राहिलाच. आपण इथे येऊन चार शब्द लिहीलेत त्याबद्दल धन्यवाद.

आज मी कोकणातील नवीन शिवी शिकलो याचा आनंद आहे.

-अजय

pravin said...

Chan zala aahe lekh.. mee punyacha aslya mule 'च्या आयला' ha sabhda khup vela ikala aahe..!! Specially.. from elderly people.. and I liked that word somehow, i dont know why.. Sadhya punyat nahi aahe mee.. ani ithe marathi konala kalat nahi tyamule khup vela mazya kadun vaprala jato.. ekada punyat aalyavar savay kami karavi lagel.. anyways.. mast zala aahe lekh..!!

Wish u and family a happy new year..!!

~ Pravin

Unknown said...

च्या आयला लई भारी अजय

Anonymous said...

शिवाशिवी मस्त रंगली आहे...

Ajay Sonawane said...

दवबिंदू: धन्यवाद, अशीच भेट आणि प्रतिक्रिया देत रहा.

-अजय

Unknown said...

Namskar Ajay saheb, tumache lekh vachun kharach bara watala... mala vatala fakta malach shivya denyachi vait savay ahe.. pan nahi ti savay nahi to adhikar ahe,, :) :) :)

Jaswandi said...

वाह.. भारी पोस्ट आहे हे! अशक्य भारी!!

naina said...

shivi ha etka mota vishay hou shakto he aajcha kalal...baki tu ekdam zyak lihila ahes bagh...

Maithili said...

Altimate...........
Ekdam sahiye...!!!!
Agreed to Jaswandi Ashkya bharri aahe post.
Ek post vachoonach hya blog chya premat padale mi...

अनिकेत वैद्य said...

अजय हे पण बघ जरा.
http://maazedonpaise.blogspot.com/2010/02/blog-post_25.html

आपला,
(शिवराळ) अनिकेत वैद्य.