Monday, December 28, 2009

चार गोष्टी

१. लग्नाला उभे राहिलेले लोक हे लवकरच एक थट्टेचा विषय बनतात. शेंबुड न पुसता येणारया पोरासोरापासुन ते नव्वद वर्षाच्या आजोबापर्यंत सारयांचा एकच प्रश्न असतो..."काय मग कुठंपर्यंत आलंय लग्नाचं ? यंदा उरकरणार की नाही ? अहो बघुन बघुन असं कसलं स्थळ पाहताय ते तरी सांगा." किंवा "उरकुन टाक आता लवकर, बस्स झालं". लग्नाला उभे राहिलेयापेक्षा जास्त घाई यांनाच असते. अशा लोकांची जमात ही प्रत्येक समाजात आणि सर्व वयोगटात पहायला मिळते.

२. नवरा-बायकोमध्ये संवाद असणं फार गरजेचं असतं. आपला जोडीदार हा आपला सर्वात जवळचा मित्र असावा. त्याच्याशी गप्पा मारणं हे अगदी सहजतेनचं घडलं पाहिजे. त्यासाठी विषय किंवा वेळ शोधावी लागत असेन तर समजावं की कोणीतरी कमी पडतंय. बरेच वेळा नवरा बायको बाहेर जेवायला जातात आणि सुतक पाळल्यासारखं दोघंही शांत बसुन, एकमेकांकडे न पाहता जेवण करत असतात. ज्या टेबलावर चमचेच आवाज करतात अशा टेबल्यावरच्या लोकांची लग्न टिकतील ही पण त्याला यशस्वी झाली असं म्हणायचं का?

३. काही लोकांच्या मते मुल झाल्यावर बायको मधला 'चार्म' संपतो. मला अशा लोकांची खरंच किव येते. मुल झाल्यावर स्त्री कुणाची बायको, मुलगी किंवा बहीण रहात नाही. ती तेव्हा फक्त एका बाळाची 'आई' असते. तिच्या मनात त्यावेळेस फक्त ममत्वाचीच भावना असते. देवानेच स्त्री ला तसं बनवलंय त्याला आपण कोण होतो नावं ठेवणारे ?

४. एकसारखं एखाद्या मुलीकडे पाहण्याने ती मुलगी तुम्हाला पटेन ही खुळी समजूत आहे. खरं तर तिच्याकडे एकदाच पहा, नजरानजर होऊद्यात आणि नजरानजर झाली की तिला एक छोटीशी स्माईल द्या. पुन्हा त्या मुलीकडे बराच वेळ पाहूच नका पण थोडासा अंदाज घ्या की तिचं तुमच्याकडे लक्ष आहे का. आणि मग जाता जाता बराच वेळाने पुन्हा एकदा तिच्याकडे स्माईल देऊन जा. काही काही जण उगाचच लाळ गाळत एकसारखं मुलीकडे पहात असतात. मुलीसुद्धा अशा लोकांना किती भाव देतात त्याच जाणे.

५. ब्लॉग वर एक लेख लिहिण्यापाठीमागे ब्लॉगरची किती मेहनत असते हे एकदा स्वता एखादा लेख मराठीत लिहून पहा. एखादं पुस्तक वाचायचं म्ह्टलं तरी तुम्हाला पैसे देऊन ते पुस्तक विकत घ्यावं लागत. मग एखाद्याच्या ब्लॉगवर जाऊन जेव्हा तुम्ही त्याचे लिखाण फुकट वाचता तेव्हा फक्त 'छान लिहीलयंस' अशी एक प्रतिक्रिया द्यायला काय हरकत आहे ? मराठीचा कैवार घेणारे किंवा स्वताला 'तारणहार' म्हणविणारयांची भाषणं जर तुम्ही तासनतास ए॑कत असाल तर हीच मराठी जगण्यासाठी उत्तमोत्तम लिखाण करुन प्रयत्न करणारयांसाठी तुम्ही साधा एक मिनीट देऊ शकत नाही. एखादा लेख चांगला वाटला तर त्याला प्रोत्साहित करा, फायदा तुमचाच आहे कारण ब्लॉगर अजुन मेहनत घेऊन याहीपेक्षा चांगलं काही देण्याचा प्रयत्न करेन.

६. लोक देवाकडे हवं नको ते सारं मागायला जातात अगदी परीक्षेत चांगले गुण मिळुदेत पासुन मुलगा होऊदेत यापर्यंत सारंच. मी सुद्धा कित्येक वेळा मंदीरात गेलो आहे, दरवेळेस काही मागण्यासाठीच. देव सुद्धा प्रत्येकाच्याच अडचणी ए॑कत असतो. या जगातील प्रत्येक गोष्ट ही त्याच्या मर्जीप्रमाणेच चालली आहे याच्यावर­ माझा ठाम विश्वास. पण एखादी गोष्ट जशी आपण मागायला मंदीरात जातो त्याप्रमाणे ती गोष्ट मिळाल्यावरसुद्धा मंदीरात जावं आणि त्या विश्वविनायकाचे आभार मानावे. प्रयत्न आपले जरी असले तरी त्याला कुणाच्यातरी आशिर्वादाची गरज असतेच ना ! उगाचच का आपण आई-वडीलांच्या नतमस्तक होतो?

७. मागच्या आठवड्यात मी बिग बझार मध्ये गेलो होतो. तेथे घडलेला खराखुरा प्रसंग. मी तिथे खाण्यापिण्याच्या वस्तु घेत असताना एक मुलगा आला आणि म्हणाला की तुम्ही बेधुंद ब्लॉगवाले ना ? मला थोडंस आश्चर्य वाटलं पण थोड्याफार गप्पा मारुन मी तिथुन निघालो. देसाई आंबवाले किंवा चितळे बंधू मिठाईवालेसारखं 'अजय सोनवणे ब्लॉगवाले' असं आता नाव लावावं लागेन बहुतेक मला. ब्लॉगवालेच्या ए॑वजी ब्लॉगवाला असं मुस्लीम नावही आवडेन.:-)

-अजय


---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१.उद्धव ठाकरेंना पाठविलेले पत्र, जसेच्या तसे.
२.मी आणि माझी फिल्लमबाजी
३. यंदा कर्तव्य आहे ?
---------------------------------------------------------------------------------

23 comments:

Deepak said...

@अजय,
सॉलिड पोस्ट भाऊ! चाराच्या सात गोष्टी झाल्यात मात्र एकपेक्षा एक!
बिग-बाजारच्या घटनेवरुन तरी हेच दिसुन येतं की, लोक तुझ्या पोस्ट वाचताहेत... तुला ओळखताहेत... त्यासाठी/ त्यांच्यासाठी 'अजय ब्लॉगवाला' बननंही सही!

आनंद पत्रे said...

अजय,
एकदम सही लिहिले आहेस...पहिली गोष्ट तर मलाही लागु पडते आहे, त्याच चक्रातुन जात आहे.
५वा मुद्दा पण पटला, सद्ध्या ’संस्कार’ नावाचं पुस्तक वाचतो आहे, त्यातला एक मुद्दा पटला, लेखक म्हणतात की माणसाला दोन प्रकारचा शब्द्संग्रह असतो, एक वाचन आणि दुसरा लिखान. म्हणुनच वाचताना अनेक शब्द समजत्तात आणि पेन हातात धरली की त्यातले काहिच अठवतात.
त्यामुळे लिहिण्याची मेहेनत खरच अवघड असते.

Yogesh said...

अजय मित्रा. . .एकदम मस्त रे!!! सही पोस्ट झाली आहे!!

विशाल तेलंग्रे said...

>>> ग्रेट पोस्ट... "बेधुंद ब्लॉगवाल्या" दादा...! ;)
>>> "एखादा लेख चांगला वाटला तर त्याला प्रोत्साहित करा, फायदा तुमचाच आहे कारण ब्लॉगर अजुन मेहनत घेऊन याहीपेक्षा चांगलं काही देण्याचा प्रयत्न करेन." हे एकदम सहीच... लय बेस्ट!

- विशल्या!

Anonymous said...

अप्रतिम भाष्य अजय. खूप मोलाच्या गोष्टी शेअर केल्यास. मनापासून अभिनंदन "बेधुंद ब्लॉगवाले" :)

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

अजय, ही पोस्ट खूप छान आहे. मला फार आवडली. तू मांडलेल्या सर्वच मुद्‍द्‍यांशी मी सहमत आहे. मीही ब्लॉगर असल्याने मुद्दा क्रमांक ५ जिव्हाळ्याचा वाटला. कुणास ठाऊक ह्या ब्लॉगींगमुळे ’ब्लॉगवाला’ हे नवीन आडनाव उदयाला येईलसुद्धा. पण सगळेच ’....वाला’ आडनाव असलेले मुस्लिम नसतात हं. पारसीसुद्धा आहेत.

Atul Yadav said...
This comment has been removed by the author.
Atul Yadav said...

Ayee Blogwalya....Point No 2 and 4....Mast re Bhava :)

Deepti said...

bhari post ahe!!
mast lihtos tu

Mugdha said...

hmm...chhanach lihilays re..
comments baghun navin lihinyacha prayatna kharach karata yeto ka??
majhyamate blogging he svaantasukhay asaava...
aso..
blog tar chhan aahech..he post hi chhanach aahe..

अनामिक said...

ब्लॉगवाले अजय... सहीच लिहिलंयेस तु!

-अनामिक

Ajay Sonawane said...

भुंगा, आनंद, मनमौजी, विशाल, सुहास, कांचन, अतुल, दिप्ती, अनामिक : आज पुर्ण दिवस खुप बिझी असल्यामुळे आता सर्वांना मिळुन एकच रिप्ल्याय देत आहे. खरं तर प्रत्येकाला वेगळा रिप्लाय देणे हे मलाही खुप आवडतं आणि तेच ब्लॉग च्या एटीकेट्स ला धरुन आहे. पण वेळेअभावी मी आज घाईघाईत असा रिप्लाय देत आहे. त्याबद्दल क्षमस्व. आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद.

मुग्धा: प्रतिक्रिया नेहमीच आनंद देतात आणि बरंच काही शिकवतात सुद्धा. एखाद्या नविन व्यक्ती जेव्हा ब्लॉग ला पहिल्यांदाच भेट देतो आणि स्वताहुन मेल लिहून ब्लॉग आवडल्याची पोचपावती देतो तेव्हा खरंच खुप छान वाटतं.

-अजय

sharayu said...

मी मंदिरात जातो ते पूजक म्हणून, याचक म्हणून नव्हे.

अपर्णा said...

सही आहे ब्लॉगवाला...:)

GanesH said...

Ajay,
Khoop chan lihale aahe...
Mala marathi yete pan keyboard vaprun marathi madhe lihata yet nahi ..samjun ghe..halu halu shikta aahe...pudchya veles matathi madhech comment lihaycha prayatn karen :)

Anonymous said...

अजय छान लिहलयेस.....मस्त मनापासून....
खरं तर या सातही मुद्द्यात तुझी विचारधारा दिसतेय.....नवरा बायकोमधला संवाद हा मुद्दा असो की आशिर्वादावरचे मत असो....सगळं पटलं!!!नवरा बायकोच्या बाबत किंवा एकुणातच नात्यांबाबत मी नेहेमी म्हणायचे की याचा चावून चोथा नकोय व्हायला उसासारखा, चोथा फेकावा लागतो, या नात्यांमधली गोडी कायम टिकली पाहिजे ज्यासाठी ते नातं ज्यांच आहे त्यांनी ते रसरशीत ठेवावं लागतं....खुपसं कठीण नसतं ते पण ईच्छा हवी!!!!
बाकि अजय ब्लॉगवाला सही!!! लवकरच तुला पुण्यातला बच्चा बच्चा जानने लगो हा आशिर्वाद.....

अभिजीत said...

छान लेख आहे. सगळेच मुद्दे मनापासून पटले.

btw, तुला "बेधुंद ब्लॉगवाले " म्हणून वाहतूक पोलिसाने ओळखले तर फायदा होईल तुला :P (just kidding)

Mandar Joshi said...

अप्रतिम चार(सात) बेधुंद गोष्टी अजय ब्लॉगवालांचे...
मी माझ्या TAG मध्ये शिवाजी व्हायचे आहे हे तुमच्याकडून ऐकल..

सिद्धार्थ said...

मुद्दा १ आणि ५ शी १००% सहमत कारण ते दोन्ही फार जवळचे, मनाला भिडणारे मुद्दे आहेत. बाकी मी पण ब्लॉगवर माझा फोटो टाकून बिग बझारच्या वार्‍या सुरू करतो. :-)

Ajay Sonawane said...

सिद्धार्थः फोटो लावण्याचा टोमणा होता का मला :-)

सगळेच मुद्दे अगदी माझ्या जवळचे होते, जे वाटलं ते अगदी रोखठोक.

-अजय

Unknown said...

kup kup chan lihita tumhi, tumche vichar kup avadle mala. devachi dengi labhli ahe tumala, ti japa. ani kup motte vha.

Ajay Sonawane said...

स्मिता: तुमच्यासारखे ब्लॉग ला पहिल्यांदाच भेटी देणारे उत्साह वाढवतात म्हणूनच आतापर्यंत लिहीत आलेलो आहे. आपण भेट देऊन आवर्जुन प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा !!!

-अजय

sudarshan said...

Hi, I always read your blogs.
Really .. you write so beautifully....direct heart touching....!!! All the best for your next blogs....