Tuesday, January 5, 2010

खेळ मांडला

पिंजरा नंतर बरेच दिवसानंतर एक चांगला तमाशाप्रधान सिनेमा पाहिल्याचा आनंद मला झाला जेव्हा मी 'नटरंग' मध्ये न्हाऊन निघालो. कदाचीत हा आतापर्यंत पाहिलेला मी असा एकमेव मराठी सिनेमा आहे जो शेवटच्या सेकंदापर्यंत लोक पहात होते. सिनेमा संपला, सारे जण जायला निघाले आणि तितक्यात समोर 'नटरंग'च गाणं सुरु झालं. गाणं पुढं सरकत गेलं, स्क्रीन वर गणपत पाटील ( ते गणपत पाटीलच असावेत असा माझा अंदाज) आणि त्यांचा जीवनपट उलगडणारे प्रसंग फोटोजच्या रुपात स्क्रीन वर आले. लोक क्षणभर जिथे आहेत तिथेच उभे राहीले. चित्रपटाचा प्रभाव लोकांच्यावर एवढा होता की चित्रपट संपूनही लोक पहात उभे होते. शेवटचं नाव पडलं आणि लोकांनी उत्स्फुर्त टाळ्या वाजवल्या. नटरंग च्या टीमला चित्रपट आवडल्याची याच्याहून मोठी पावती दुसरी कुठली असू शकेल ?

नटरंगाची सुरुवातच जेव्हा 'मला जाऊ द्या ना घरी..आता वाजले की बारा.." या लावणी ने झाली तेव्हाच समजलं की हा कुठल्या वळणावरचा सिनेमा आहे.

" ए.. कशापाई छळता..मागं मागं फिरता..असं काय करता..दाजी ही ला भेटा की येत्या बाजारी..
ए.. सहा ची बी गाडी गेली नवाचीबी गेली आता बाराची गाडी निघाली...
ही ला जाऊ द्या ना घरी ...आता वाजले की बारा.."

ही लावणी एवढी सुंदर रचलेली आहे की ती ए॑कताना मला उगाचच फेटा नसतानासुद्धा फेटा वर उडवायची इच्छा झाली होती. गुणा कागलकर (अतुल कुलकर्णी) जो शरीराने पैलवान पण खरा कलावंत असतो. परिस्थीतीमुळे तो आणि त्याचे सोबती तमाशा काढायचं ठरवतात. तमाशामध्ये बाई हवी म्हणुन नैना नैना कोल्हापुरकरीण ( सोनाली कु. ) ची एंन्ट्री होते. तिच्या एंन्ट्रीच्या डान्सवर 'आयच्यान' मी फिदाच झालो. पण तिची एक अट असते ती म्हणजे तमाशामध्ये नाच्या हवाच. जेव्हा ­कुणीच नाच्या म्हणून काम करायला तयार होत नाही तेव्हा गुणावर ही जबाबदारी टाकली जाते आणि मग सुरु होतो त्या कलावंताचा संघर्ष. इथुन पुढे या सिनेमाची कथा हळुहळु उलगडत गेली आणि लोक त्यात गुंतत गेले. सिनेमाची दमदार कथा, दिग्दर्शकाची त्याच्यावरची जबरदस्त पकड, गुरु ठाकूर चे संवाद व गाणी, दमदार अभिनय आणि अजय अतुलचं अफलातुन संगीत. अतुल कुलकर्णी ने जी मेहनत घेतली आहे त्याला सांगण्यासाठी माझ्याकडे खरंच शब्द नाहीत. अतुल बरोबरच किशोर शिंदे ही खुप भाव खाऊन जातो. नुसत्या संगीताने हा चित्रपट वेगवान झाला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. 'अप्सरा आली' आणि 'नटरंग' ही दोन्ही गाणी जबरदस्त आहेत. 'खेळ मांडला' जेव्हा चालू होतं तेव्हा प्रत्येकाच्याच डोळ्यातुन पाणी येतं.

" करपलं रान देवा जळलं शिवार तरी नाही धीर सांडला...खेळ मांडला
खेळ मांडला....देवा....खेळ मांडला...."

नटरंगाची गाणी गेले काही दिवस मी दररोज ए॑कत आहे पण माझं अजून कान तूप्त झाले नाहीत. पुन्हा पुन्हा ही सारी गाणी ए॑कावीशी वाटतात.

असा हा नटरंगाचा खेळ पुन्हा पुन्हा जाऊन पहावा असाच आहे, काही प्रसंग अगदी डोळ्यांत आयुष्यभरासाठी साठवून ठेवावेत असेच आहेत, कदाचीत म्हणूनच मी तरी या बारी ला पुन्हा एकदा जाणार आहे.


-अजय

---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
१. यंदा कर्तव्य आहे ?
२. फुंकर
३. मी आणि माझी फिल्लमबाजी
४. मी 'पुरुष' बोलतोय !

---------------------------------------------------------------------------------

27 comments:

  1. खरंय अजय, नटरंगचे गाणे मस्त आहेत, अजय-अतुल यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
    मी महाराष्ट्रात जाइन तेव्हा पहातो सिनेमा...

    ReplyDelete
  2. नटरंगची सर्व गाणी ही खुप श्रवणीय आहेत. ही सर्व गाणी १९७० चाच काळ डोळ्यासमोर उभं करतात हे एक त्यांचं वैशिष्ट्य. माझ्याकडे ही सर्व गाणी आहेत. दररोज आयपॉड वर ही गाणी ए॑कून मी वेडा होईन. कुणाला हवी असल्यास मी नक्की शेअर/इमेल करेन. मी याच्या व्हिडीओ सॉन्ग्स कुठेही मिळतील हे पहात आहे.

    आनंद सिनेमा 'मस्ट वॉच' आहे.

    -अजय

    ReplyDelete
  3. नटरंग पाहायचा कधी योग येईल माहीत नाही. इथे बंगलोरमध्ये मराठी चित्रपट शक्य वाटतं नाही. मला "गैर" पाहायचा होता, ती इच्छा अजुन ही अपूर्ण आहे. "शिवाजीराजे..."ची प्रिंट ४-५ महिन्यांनी मिळाली व इच्छा नसूनही तो लॅपटॉप वर पाहावा लागला. असो त्याला काही इलाज नाही.

    नटरंगबद्दल सध्या जोरदार हवा आहे. अतुल कुलकर्णी आहे म्हणजे काही तरी खासं असणारच. झी मराठीमुळे नटरंगची गाणी ऐकायला मिळतात. गेल्या आठवड्यात सारेगमपमध्ये अभिलाषा चेल्लमंने "मला जाऊ द्या ना घरी, आत्ता वाजले की बारा.." लावणी म्हटली होती. जबरदस्त गायली ती. तसेच झी मराठीवर नव वर्षाच्या कार्यक्रमात देखील नटरंगची गाणी झाली. अजय-अतुलला सलाम!!!

    ReplyDelete
  4. अरे चित्रपटाबद्दल तुफान उत्सुकता होती. आता तर तू पावती दिलीयेस कधी पहायला मिळेल असं झालंय.
    गाणी तर तुफान आहेत. मी दिवसरात्र ऐकत आहे. अप्सरा आली काय गाणं आहे बॉस. मानलं अजय अतुलना. बाय द वे जमत असेल तर गाणी विकत घ्या. आणि भारताबाहेर असाल तर www.esnips.com वर उपलब्ध आहेत.

    ReplyDelete
  5. Are tuzya post war comment takayacha prayatna kela, jamle nahi .kahitari problem asel may be.

    Movie mastch ahe pan. zee talkies ni changle pawul uchalale ahe asa movie banawun :)

    -Abhijit Vaidya

    ReplyDelete
  6. अजय भाऊ,
    पिंजरा सिनेमा मी आत्तापर्यंत बर्‍याच वेळा पाहिलाय. तद् नंतर आठवणीत राहण्यासारखा लावणीदार - तमाशा प्रधान - सिनेमा कदाचितच पहायला मिळाला.
    हां आता 'एक गाव बारा भानगडी', 'केला इशारा जाता जाता', 'सांगते ऐका', 'सवाल माझा ऐका' हे सुध्दा मनाला भिडणारेच होते. डॉ. श्रीराम लागु अरूण सरनाइक, गणपत पाटील , चंद्रकांत, सुर्यकांत वा..! काय कलाकार.. काय अभिनय!

    आता उत्सुकता झालीय ती "नटरंग" पाहण्याची... आणि तो मी पाहणारच!

    ReplyDelete
  7. mi gela mahinabhar natrang chi gani aiktoy ani facebook var tyache promotion kartoy... cd release jhalyapasun kinva agodarpasunch mala mahiti hote yat kahitari vegla ahe. mhanoon natrang kadambari pan vachun kadhli...gani aikun mi tyavar calligraphy arwworks hi banavlet. tu majya orkut profile var baghu shaktos.kharach ved lavlay ya sangitane. mala tar ajay atul paiki atul chi face book var hi comment ali. kay ali ti mi sangnar nahi ti tula pahavi lagel. ;)

    ReplyDelete
  8. सिद्धार्थः सिनेमा जरुर बघ, वन्स इन अ लाइफटाईम सिनेमा आहे. मी हा सिनेमा पाहिल्यापासून त्याच्यातून बाहेरच आलेलो नाही. मला ते संगीत, त्या लावण्या एवढ्या आवडायला लागलेत ना की बस्स ! खरंच असा सिनेमा खूप दिवसानंतरच येतो.

    -अजय

    ReplyDelete
  9. I live in Delhi..I would like to listen Natrang songs,but helpless....I will definitly watch the movie once i come to pune..
    Btw,ur writing is very good..Pls write something other than ur experiences,I mean some story kind of thing...
    keep it up..
    I would be happy if u mail me Natrang songs on atulsdeshmukh@gmail.com

    ReplyDelete
  10. hi ajay! nuktach 3 idiots baghitlay. tyamule aata nawaroba punha kuthalya cinemala sobat yenar nahit. pan tuza lekh wachun natrang pahayalach hawa ase watayala lagale ahe. baghu kase jamate te.

    ReplyDelete
  11. माधुरी: नवरोबांना हा रिव्हयू वाचायला दे आणि जमलंच तर गाणी ही ए॑कायला दे, बघू कसं नवरोबा नेत नाहीत ते :-)

    ReplyDelete
  12. अतुल देशमुखः स्वागत आणि धन्यवाद प्रतिक्रियेसाठी. नक्की सिनेमा पहा हा, एक मेमोरेबल सिनेमा असेन हा. गाणी तुमच्या इमेल आयडी वर इमेल केली आहेत.

    ReplyDelete
  13. अभिजीत: हर्षल तू मला ऑर्कूट वर अ‍ॅड केल्याबद्दल धन्यवाद. फेसबुक ची ही लिंक दे ना म्हणजे मला पाहता येईन अतुल काय म्हणालेत ते. तूझ्यामुळेच मी नटरंगची गाणी डाऊनलोड केली होती.

    धन्यवाद !

    -अजय

    ReplyDelete
  14. साधकः सर्वच गाणी चांगली आहेत. अप्सरा आली, नटरंग, खेळ मांडला, जाउ द्या ना घरी. मला सारी गाणी, त्यांच संगीत आणि गुरु ठाकुर चं लिरीक्सने प्रेमातच पाडलय.

    -अजय

    ReplyDelete
  15. अभिजीतः झी टॉकीज ला सलाम. त्यांच्यामुळेच एवढे चांगले सिनेमे पहायला मिळतात. पण मराठी लोकांनी घरातून निघून मराठी सिनेमे पाहीले पाहिजेत तर हे सारं टिकेन ना.

    अजुन कुणाला याची गाणी हवी असल्यास मी इमेल करु शकेन.

    ReplyDelete
  16. मी सुध्दा गेला आठवडा नटरंगचीच गाणी ऐकतो आहे. शनिवार आणि रविवार दोन दिवस थिएटर ते थिएटर फिरलो तिकीट घेण्यासाठी, पण सगळेच शो हाऊसफुल्ल.

    बाकी सिनेमा बघणार तर एक पडदा चित्रपट गृहातच मल्टीप्लेक्स मध्ये नाही.

    हा चित्रपट शांततेत बघण्यासारखा नाहीच मुळी. त्याला टाळ्या आणि शिट्यांची जोड हवीच

    अनिकेत

    ReplyDelete
  17. अनिकेतः हो खरं आहे, मलाही शनिवारचं मंगला चं तिकीट हवं होतं पण नाही मिळालं. मग सरळ प्रभात गाठल. पण तू म्हणतोस ते बरोबर आहे टाळ्या आणि शिट्याचा सिनेमा आहे हा. काही काही संवाद ( वशाट बरं का !) अगदी शिट्या मिळवून जातात. :-)

    -अजय

    ReplyDelete
  18. भुंगा: सांगत्ये ए॑का मला वाटतं पि़ंजराच्या अगोदरचा आहे. मी जुने बरेच मराठी सिनेमे पाहीले आहेत. अगदी माणूस ते एक गाव बारा भागनडी. निळू फूले, श्रीराम लागू, सुर्यकांत, चंद्रकांत खरंच हे लोक डॉन होते. त्या काळी मराठी सिनेमा मध्ये पाटलाची भूमीका करणारा तो कलाकार मला फार आवडायचा, सांगत्ये ए॑का मध्ये आहे तो. माझ्याकडे काही दिवसापूर्वी हे सारे सिनेमे होते.

    -अजय

    ReplyDelete
  19. Ajay.. tu pathvilelya link varun gani zali download :-)..!! Thanx..

    - Pravin

    ReplyDelete
  20. @Pravin: आता गाणी एन्जॉय कर, दिवसभर तू आता नटरंगचीच गाणी ए॑कशील.

    -अजय

    ReplyDelete
  21. अजय, शेवटी काल मला बघायचा योग आला नटरंग, खूप श्रवणीय गाणी आणि उत्तम अभिनय नाच्याचा..मूवी च्या एण्डला क्रिडिट लिस्टला काय ढोलकी दिलेय...आहा आहा..लय झाक

    ReplyDelete
  22. To download complete album visit -

    http://rapidshare.com/files/330385084/Natarang.rar

    ReplyDelete
  23. सुहासः गाणी शेअर केल्याबद्दल खरंच धन्यवाद. मूव्ही छानच वाटण्यासारखी आहे. आता एक करा, माऊथ टू माऊथ पब्लीसिटी करा आणि मराठी लोकांना ही मूव्ही पाहण्यासाठी घराबाहेर काढा.

    -अजय

    ReplyDelete
  24. Than a lot Ajay for songs...
    Really nice songs..
    Do visit my recent story चक्रव्युह 1-2 on my link
    atulsdeshmukh.wordpress.com

    ReplyDelete
  25. क्रेडिट लिस्टची ढोलकी पब्लिक थांबून ऐकतं यातंच काय ते आलं. या वर्षी पहिल्या तारखेला रिलीज झालेला ’एक नंबरी चित्रपट’

    ReplyDelete
  26. कांचनः खरंय तुम्ही म्हणताय ते. नटरंग चा रंग काही वेगळाच आहे.

    -अजय

    ReplyDelete
  27. भारी पिक्चर आहे...
    कथा काय, संवाद काय, गाणी काय, अभिनय काय- सगळे एक नंबर...
    एक दुरुस्ती सुचवायची आहे-
    'किशोर कदम'चे नाव 'किशोर शिंदे' असे लिहिले आहे

    ReplyDelete