Thursday, December 31, 2009

उलटा प्रवास

काल मुग्धाचं पोस्ट वाचलं आणि क्षणभर मुग्धा आणि तिची आई, ज्यांना मी आयुष्यात कधीच पाहिलं नाही त्यांचं चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं. माझा आत्मा हा थोड्यावेळ माझा राहीलाच नव्हता. तो कधीच उडुन गेला होता. कुणाच्या तरी शरीरात जाऊन तो विराजमान झाला होता. इथे राहिलं होतं ते फक्त माझं शरीर, एक निर्जीव शरीर. त्या निर्जीव शरीरालासुद्धा मुग्धाची तगमग समजत होती. आत्म्याविन पोरकं झालेलं माझं शरीर त्या पोरक्या झालेल्या मनाची स्पंदन झेलत होतं. ती स्पंदन झेलता झेलता त्याचे निर्जीव डोळे कधी भरुन आले समजलंच नाही. तिने लिहिलेल सारे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. ते सारं मीच काही त्यांच्या घरातलाच एखाद्या असल्याप्रमाणे पहात होतो, अनुभवत होतो. माझ्या डोळ्यांपुढे हे सारं घडत आहे असाच भास होत होता. समवेदना म्हणजे काय याचा अनुभव मी घेत होतो. कुणाचं तरी, थोड्यावेळासाठी का होईना मी आयुष्य जगत होतो. ही भावनाच मुळी खुप वेगळी होती. स्वताची दु: या शरीराने खुप झेलली पण दुसरयासाठी हे शरीर हळहळताना मी पुन्हा एकदा पहात होतो. "आत्म्याविन पोरकं झालेलं शरीर आणि आईविना पोरक झालेल मुलं यांच्यात फरक तो काय ? " आई म्हणजेच आपला आत्मा, तो नसेन तर हा देह कसा चालणार !

मुग्धाचं पोस्ट वाचुन झालं आणि थरथरत्या हाताने आईला फोन लावला...
"आई, अजय बोलतोय. बरी आहेस ना तू ? तुझं इन्सुलिनचं इंजेक्शन आज घेतलंस का ? "
"घेतलं मी, उद्या जाऊन पुन्हा एकदा शुगर टेस्ट करणार आहे. पण तू असा अचानक का फोन केलास?"
"काही नाही , सहजचं...." , मी,

पुढचं काहीच बोलवलं नाही कारण मी आता तो राहिलो नव्हतो. आईच्या लहानग्या बाळाकडे जाण्याचा उलटा प्रवास माझा केव्हाच सुरु झाला होता...

-अजय


---------------------------------------------------------------------------------
या ब्लॉग वरचे सर्वात आवडीने वाचले गेलेले लेख वाचा.
. यंदा कर्तव्य आहे ?
. फुंकर
३. मी आणि माझी फिल्लमबाजी
४. मी 'पुरुष' बोलतोय !

---------------------------------------------------------------------------------

10 comments:

  1. वाचताना आतून गलबलून आलं!

    ReplyDelete
  2. अजय मुग्धाचा ब्लॉग वाचून मी पण खूप रडवेली झाले होते रे....आई दुसर्याच खोलीत बसली होती...आणि मी कालच तिचं परतीचं तिकिट बुक केल्याने तसंही विचित्रपणा आलाच होता...काही नाही...तसंच अश्रुभरल्या डोळ्यांनी तिला म्हटलं की तू गेल्यावर करमणार नाही मला...तिने का कोण जाणे मला विचारलं नाही की मी का रडते...नशीब माझं.....बापरे...जाऊदे मी इथेच थांबते...पुन्हा एकदा कसंतरीच होतंय.....
    ही पोस्ट वाचताना फ़ार connected होते म्हणून लिहिलं....

    ReplyDelete
  3. छान लिहीलंस..
    अशीच काळजी करत जा आईची..every mom expects it..
    HAPPY NEW YEAR!!!

    ReplyDelete
  4. आनंद व अपर्णा: गलबलून येण्यासारखंच सारं प्रकरण आहे.
    येणारया वर्षाच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा !!!

    -अजय

    ReplyDelete
  5. मुग्धा: आतापासून आईची जास्तच काळजी घेईन गं.
    हे नवीन वर्ष तुला सुखाचं समूद्धीच आणि भरभराटीचं जावो.
    ही पोस्ट आजच टाकली घाईघाईत कारण नवीन वर्षापासून ब्लॉग वर लेख लिहीण मी बरंच कमी करणार आहे, महिन्यातून जमलं तर ते ही एकदाचं.

    -अजय

    ReplyDelete
  6. अजय, छान लिहिलं आहेस. आणि खरंच ते मुग्धाचं पोस्ट वाचता वाचता स्क्रीनवरचे शब्द कधी धुसर झाले ते कळलंच नाही. माझ्या कडे तिथे प्रतिक्रिया द्यायला त्यावेळी शब्दच नव्हते. तसं मी पण आईशी आठवड्यात बर्‍याचवेळा बोलतो, पण काल बोललो तेव्हा खरंतर खूप गलबलून आलं होतं... काय बोलावं तेच सुचेना म्हणून लगेच फोन ठेवला.

    -अनामिक

    ReplyDelete
  7. अनामिकः बरोबर आहे तुझं, मुग्धाने सगळ्यांनाचं रडवलं. मुग्धाने म्हटल्याप्रमाने आईची काळजी घे, मी सुद्धा आणि तू ही. बाकी काय...आल इज वेल !

    -अजय

    ReplyDelete
  8. http://anukshre.wordpress.com/2009/10/31/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%96/

    माझी पोस्ट वाच. मी पण बाबा नसल्याने आईची खूप काळजी घेते.

    ReplyDelete
  9. अनुश्री: खुप सुंदर आणि भावस्पर्शी पोस्ट, आताच वाचली.
    -अजय

    ReplyDelete
  10. अजय, मुग्धाची पोस्ट वाचताना डोळे कधी भरुन आले समजलच नाही. "स्वामी तिन्ही जगाचा आइविना भिकारी" हे अगदी खर आहे. काय लिहू मित्रा. . .शब्द नाही!!!

    ReplyDelete