Thursday, July 30, 2009

पाण्याने भरलेले तुझे डोळे

पाण्याने भरलेले तुझे डोळे
नेहमीच काहीतरी सांगत असतात
पण एवढा शहाणा नाही मी
ज्याला डोळ्यांच्याही भाषा कळतात

Wednesday, July 29, 2009

एक चारोळी

किती वेळ उभा मी
पण तू वळून नाही पाहिलस
बहुधा...लक्षात नसेन राहिलं...
का...मुद्ददामच नाही ठेवलस ?

चारोळी आवडली तर आपला अभिप्राय जरूर कळवा आणि नवीन चारोळयासाठी प्रोत्साहित करा, नाही आवडली तर पुढच्या चारोळी साठी वाट पहा :-)

Thursday, July 23, 2009

अगदी ...सहजचं !

गेले दोन-तीन दिवसांपासून डोक्यात विचार चालू होता की ब्लॉग साठी काहीतरी लिहायच. खर तर मी दररोज (?) डायरी लिहण्याचा प्रयत्न करतो, पण ब्लॉग आणि तो पण मराठीत लिहण्याची प्रेरणा मला 'प्राजक्त' नावाच्या एका सुंदर ब्लॉग वरुन मिळाली , धन्यवाद ...'प्राजक्त' च्या लेखिकेला ! :-)
अडचण एकच होती ...मराठीत टाइप करणे...जे खूप वेळखाऊपणाचं काम आहे. मी त्यावर ही उपाय शोधून काढला आहे. डायरीची पानं स्कॅन करून ब्लॉग वर पोस्ट करायची...बघू..सुरूवात तर मोठ्या उत्साहात केली आहे ...उत्साह किती दिवस टिकतो ते पाहू.
आज दिवसभर डोक्यात खुप विचारांची गर्दी झाली होती. खूप कोलाहल माजला होता, वाटलं की जाता जाता सारसबागेतल्या गणपतीचं दर्शन घ्यावं. पाय आपोआप तिकडे वळले. मागच्या वेळेस जेव्हा मी गणपतीला गेलो होतो तेव्हा माझा नवाकोरा नायके चा शूज (खुप महागडा होता हो..उगी उगी) कुणीतरी उचलून नेला. असं म्हणतात की मंदिरात पाद्त्रने जाणं म्हणजे एक कटकट गेली असं होत आणि खरं सांगतो ते मला माझ्याबाबतीत तरी पटलं माझ्यामागची एक कटकट दूर झाली.
गणपतीचं दर्शन घेतलं ...मनं अगदी प्रसन्न झालं. येताना थोडं पावसातही भिजलो. एकाच वेळेस माझ्या मनात कितीतरी विचार चालू असतात. नाना प्रश्न मला सतावत असतात. काही प्रश्नांची उत्तर मिळतात...काही प्रश्न आपोआप सुटले जातात...पण काही प्रश्न मात्र अनूतरित्त राहतात. अनूतरित्त प्रश्न हे अनूतरित्त राहण्यासाठीचं जन्माला आलेले असतात, तुम्ही ते कितीही सोडवायचा प्रयन्त केला तरी ! आपल्या हातात काही नसतं कारण आपल्या दोरया कुणाच्या तरी हातात असतात...तो आपल्याला खेळवित असतो, त्याला कुणी 'परमेश्वर' तर कुणी 'नियती' म्हणतं. मी फक्त एक प्यादा...एकावेळेस एकच घर चालणारा...नाही का ?

Wednesday, July 22, 2009

प्रवास

ब्लाग ची सुरुवात एका कवितेने करतो,

प्रवास

असाच प्रवास करावा लागतो...

वाटेतल्या प्रवाशांना वाटेवर ठेवुन...
आठवणींच्या हिंदोळ्यावर एकटंच बसुन...
नियतीच्या सुरात सुर मिसळुन...
भुतकाळाला भुतकाळातचं पाहुन...
विलोभनीय सत्याला फक्त स्वप्नातच पाहुन...
अविचलीत किनार्याशी नातं तोडुन...
नात्यांचे सारे पाश तोडून...
सोबत्यांचा दुरावा सहन करुन...
विश्वासार्हतेला संगे धरुन...
स्वत:चं मनं घुसमटत ठेवुन...
क्षितीजाची फक्त आस धरुन...
दिशांचसुदधा अस्तित्व जपुन...
वादळांशी सुदधा युदध पुकारुन...
आयुष्याचि दोरी कापुन...
पणं उद्याची सारी स्वप्नं कवटाळुन...